Nashik : सतत सुरू असलेल्या पावसामुळे नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातील पाणीसाठा वाढत असल्याने बंधाऱ्यातून होणारा पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. बुधवारी (दि. २९) दुपारी ३ वाजता विसर्ग १५,६५५ क्युसेकवरून १७,२६९ क्युसेक करण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या (Water Resources Department) पूर नियंत्रण कक्षाने दिली आहे.
बीड: परळी तालुक्यातून एक अत्यंत हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. शेजारी राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिच्यावर जीवघेणा हल्ला ...
गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
जलसंपदा विभागाने जारी केलेल्या सतर्कतेच्या इशाऱ्यानुसार, पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोदावरी नदीपात्रालगत राहणाऱ्या नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे. नदीपात्रात किंवा नदीकाठावर कोणतेही साहित्य ठेवू नये, तसेच जनावरेही नदीकाठापासून सुरक्षित ठिकाणी हलवावीत, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासन आणि जलसंपदा विभागाकडून दिल्या जाणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. जलसंपदा विभाग (Water Resources Department) परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून, आवश्यकतेनुसार विसर्गात बदल करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
Nashik News : नाशिकमध्ये कायदा आणि सुव्यवस्था यासाठी पोलिसांकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिकमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ...
३ वाजता इतर धरणांतील विसर्ग ( in Cusecs)
गंगापूर - 3276
कादवा - 2319
भावली - 481
पालखेड - 722
वाघाड - 649
तिसगाव - 100
Nashik : नाशिक जिल्ह्यात भूकंपांच्या धक्क्यानंतर प्रशासन अलर्ट मोडवर आहे. दिंडोरी, सुरगाणा आणि पेठ परिसरात 24 तासात पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवल्याने ...
होळकर ब्रिज - 3348
दारणा - 5408
कश्यपी - 1000





