ADR Report : १४ मुख्यमंत्र्यांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद; डी. के. शिवकुमार सर्वात श्रीमंत, तर भजनलाल यांच्याकडे सर्वात कमी संपत्ती

नवी दिल्ली  : 'एसोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स' (ADR) ने देशातील ३१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांची संपत्ती तसेच त्यांच्यावरील गुन्हेगारी प्रकरणांविषयीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत; त्यांच्याकडे एकूण १,४१३ कोटी रुपयांची संपत्ती आहे. देशातील ३१ मुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती ३,६६० कोटी रुपये आहे. दुसऱ्या बाजूला, सर्वात कमी संपत्ती असलेल्या मुख्यमंत्र्यांमध्ये जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला पहिल्या क्रमांकावर आहेत; त्यांच्याकडे ५५ लाख रुपयांची संपत्ती आहे. तर या यादीत तिसऱ्या क्रमांकावर राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा असून त्यांच्याकडे १.४६ कोटी रुपयांची संपत्ती आहे.अहवालानुसार, ३१ पैकी १४ मुख्यमंत्र्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात स्वतःवर गुन्हे दाखल असल्याची माहिती दिली आहे. यापैकी ११ मुख्यमंत्र्यांवर हत्येचा प्रयत्न, भ्रष्टाचार आणि लाचखोरी यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यावर सर्वाधिक ८९ गुन्हे, सुवेंदू अधिकारी यांच्यावर २९ तर डी. के. शिवकुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्यावर प्रत्येकी १९ गुन्हे दाखल आहेत. (ADR Report)



सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री


नाव - राज्य - संपत्ती (कोटी रुपयांमध्ये)

डी. के. शिवकुमार - कर्नाटक - १,४१३

चंद्राबाबू नायडू - आंध्र प्रदेश - ९३१

सी. जोसेफ विजय - तमिळनाडू - ६४८

पेमा खांडू - अरुणाचल प्रदेश - ३३२

नेफ्यू रिओ - नागालँड - ४६


सर्वात कमी संपत्ती असलेले मुख्यमंत्री


नाव - राज्य - संपत्ती (कोटी रुपयांमध्ये)


उमर अब्दुल्ला - जम्मू आणि कश्मीर - ०.५५


सुवेंदू अधिकारी - पश्चिम बंगाल - ०.८५


भजनलाल शर्मा - राजस्थान - १.४६


योगी आदित्यनाथ - उत्तर प्रदेश - १.५४


भगवंत मान - पंजाब - १.९७

Comments
Add Comment

Nagpur Gas Leak : नागपुरात मध्यरात्री खळबळ! गाढ झोपेत अचानक श्वास गुदमरला, गॅस गळतीने 40 जण रुग्णालयात

नागपूर : नागपूरमधील गोधणी परिसरात मध्यरात्री जलशुद्धीकरण प्रकल्पातून क्लोरिन वायूची गळती झाल्याने मोठी खळबळ

Breaking! अमरावतीच्या डफरिन रुग्णालयातील NICU विभागाला भीषण आग; 3 नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू

अमरावती : अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालय अर्थात डफरिन रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागाला

Mazgaon Ganpati : मुंबईत गणपती आगमन मिरवणुकीत अंडी फेकल्याचा आरोप; माझगावमध्ये तणाव, पोलिसांकडून तपास सुरू, पहा Video

मुंबई : मुंबईतील माझगाव परिसरात गणपती आगमन मिरवणुकीदरम्यान अंडी आणि दगडफेक झाल्याच्या आरोपामुळे काही काळ

Nitesh Rane : ही महादेवाची भूमी, इथे आय लव्ह महादेवच चालणार; मंत्री नितेश राणेंची गर्जना

मुंबई : ही महादेवाची भूमी, इथे आय लव्ह महादेवच चालणार; अशी गर्जना मंत्री नितेश राणे यांनी केली. ते हिंदू रक्षक

CM Devendra Fadnavis : 'भारताचे संविधान आणि लोकशाही प्रत्येक व्यक्तीला मोठी संधी देऊ शकते'

नागपूर : तरुणांना मुख्यमंत्री किंवा

Nagpur News : महाराष्ट्राची परंपरा लाभलेल्या ढोल ताशाला जागतिक नामांकन

नागपूर : शिक्षण कौशल्य, क्रीडा स्टार्टअप आदी क्षेत्रात युवा पिढीचा सकारात्मक सहभाग आहे. त्यांचा हा सहभाग