NCP : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा काहीच संबंध नाही!

- शरद पवार; विलीनीकरणाच्या चर्चा फेटाळल्या



मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण होणार असल्याच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने झडत आहेत. विशेष म्हणजे शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतल्यानंतर या चर्चांना आणखी बळ मिळाले. मात्र, "दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा काहीच संबंध नाही," असे स्पष्टीकरण देत मंगळवारी शरद पवार यांनी विलीनीकरणाच्या सर्व शक्यता फेटाळून लावल्या. (NCP)



गेल्या काही दिवसांत दिल्लीतील राजकीय घडामोडींनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरला होता. शरद पवार यांनी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन 'नीट' आंदोलनाबाबत चर्चा केली होती. त्यानंतर लगेचच प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली. तसेच सुप्रिया सुळे यांनीही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. १० ऑगस्ट रोजी दिल्लीत होणाऱ्या कौटुंबिक विवाह सोहळ्याच्या निमंत्रणाच्या पार्श्वभूमीवर या भेटी झाल्याचे सांगण्यात आले असले, तरी या सर्व घडामोडींमुळे दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात होते. अखेर शरद पवार यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. (Sharad Pawar)


 

'आमचे बहुतांश लोक लढायला तयार' : रोहित पवार


दरम्यान, आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनीही विलीनीकरणाच्या बातम्या फेटाळून लावल्या. "शरद पवार हे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर पंतप्रधान मोदींना भेटले होते. ते कोणत्याही परिस्थितीत एनडीएसोबत जाणार नाहीत. आमच्या पक्षातील बहुतांश आमदार आणि खासदार संघर्षासाठी तयार आहेत. आम्ही विचार आणि जनतेशी बांधील असून एनडीएसोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही," असे रोहित पवार यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : 'मराठी भक्तीची भाषा, अमराठी बांधवांनी मराठी स्वीकारून सांस्कृतिक एकात्मतेचा आदर्श घालून दिला'

ठाणे : मराठी ही सक्तीची नव्हे तर भक्तीची भाषा असून, अमराठी बांधवांनी स्वेच्छेने मराठी स्वीकारणे ही

Sonia Gandhi : 'वंदे मातरम्' प्रकरणात सोनिया गांधी आणि खर्गेंच्या विरोधात मुंबईत दिंडोशी पोलीस ठाण्यात FIR

मुंबई : स्वातंत्र्यदिनी नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात 'वंदे मातरम्' गायन सुरू असताना त्यात व्यत्यय

Noel Tata : नोएल टाटा यांनी घेतली अमित शहा आणि पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकाऱ्याची भेट

नवी दिल्ली : एन. चंद्रशेखरन यांनी २०२७ मध्ये टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याच्या घेतलेल्या

Navi Mumbai International Airport : नवी मुंबई विमानतळावर पहिले आंतरराष्ट्रीय मालवाहू विमान

पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने जागतिक व्यापार आणि लॉजिस्टिक्सच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा

Pro Govinda League 2026 : दहीहंडीचा राष्ट्रकुल व ऑलिंपिकमध्ये समावेश होणार ? 'प्रो गोविंदा'बाबत मोठी अपडेट

मुंबई : प्रो गोविंदा लीगच्या चौथ्या हंगामाचा १६ ऑगस्ट रोजी दिमाखदार प्रारंभ झाला. भारताच्या टी-२० विश्वचषक

Drugs on Station : रेल्वे स्टेशनवरील पाण्याच्या कूलरमध्ये नशेची इंजेक्शन

कल्याण : चोरी, नशेखोरांचा उपद्रव आणि विविध गैरप्रकारांमुळे यापूर्वी चर्चेत आलेले कल्याण जंक्शन रेल्वे स्थानक