Nagpur Crime : १०.४६ लाखांची फसवणूक, जीवे मारण्याची धमकी आणि लैंगिक अत्याचार; नागपुरातील दोघांविरुद्ध गुन्हा

नागपूर : मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून एका महिलेकडून १०.४६ लाख रुपये उकळल्याचा आणि त्यानंतर तिला धमकावून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे.या प्रकरणी पाचपावली पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध फसवणूक,बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. (nagpur crime)



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मोहम्मद शाफत शेख (२८)आणि मोहम्मद नावेश शेख (२६)यांनी संबंधित महिलेचा विश्वास संपादन करत तिला मालमत्तेच्या व्यवहारातून मोठा आर्थिक लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवले.या बहाण्याने त्यांनी

"> वेळोवेळी वेगवेगळी कारणे सांगून तिच्याकडून एकूण १०.४६ लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. (nagpur crime)


तक्रारीनुसार,आर्थिक व्यवहारानंतर आरोपींनी महिलेवर दबाव आणत तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.महिलेने विरोध केल्यावर तिला तसेच तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.हा प्रकार कुणालाही सांगितल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल,अशी धमकीही आरोपींनी दिल्याचे महिलेने तक्रारीत नमूद केले आहे. (nagpur crime)


या धमक्यांमुळे महिला काही काळ गप्प राहिली.मात्र,दोन्ही आरोपींकडून वारंवार लैंगिक अत्याचार होत असल्याने अखेर तिने धाडस करून पाचपावली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. (nagpur crime)


प्राथमिक माहितीनुसार,दोन्ही आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक आहेत.महिलेसोबत झालेले आर्थिक व्यवहार,उपलब्ध पुरावे आणि इतर बाबींची पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू असून, आरोपींच्या भूमिकेचा तपास केला जात आहे. (nagpur crime)


 
Tags
Nagpurcrimecrime newsNagpur CrimeNagpur Police
Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : 'मराठी भक्तीची भाषा, अमराठी बांधवांनी मराठी स्वीकारून सांस्कृतिक एकात्मतेचा आदर्श घालून दिला'

ठाणे : मराठी ही सक्तीची नव्हे तर भक्तीची भाषा असून, अमराठी बांधवांनी स्वेच्छेने मराठी स्वीकारणे ही

Sonia Gandhi : 'वंदे मातरम्' प्रकरणात सोनिया गांधी आणि खर्गेंच्या विरोधात मुंबईत दिंडोशी पोलीस ठाण्यात FIR

मुंबई : स्वातंत्र्यदिनी नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात 'वंदे मातरम्' गायन सुरू असताना त्यात व्यत्यय

Noel Tata : नोएल टाटा यांनी घेतली अमित शहा आणि पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकाऱ्याची भेट

नवी दिल्ली : एन. चंद्रशेखरन यांनी २०२७ मध्ये टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याच्या घेतलेल्या

Navi Mumbai International Airport : नवी मुंबई विमानतळावर पहिले आंतरराष्ट्रीय मालवाहू विमान

पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने जागतिक व्यापार आणि लॉजिस्टिक्सच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा

Pro Govinda League 2026 : दहीहंडीचा राष्ट्रकुल व ऑलिंपिकमध्ये समावेश होणार ? 'प्रो गोविंदा'बाबत मोठी अपडेट

मुंबई : प्रो गोविंदा लीगच्या चौथ्या हंगामाचा १६ ऑगस्ट रोजी दिमाखदार प्रारंभ झाला. भारताच्या टी-२० विश्वचषक

Drugs on Station : रेल्वे स्टेशनवरील पाण्याच्या कूलरमध्ये नशेची इंजेक्शन

कल्याण : चोरी, नशेखोरांचा उपद्रव आणि विविध गैरप्रकारांमुळे यापूर्वी चर्चेत आलेले कल्याण जंक्शन रेल्वे स्थानक