Nashik Crime News : डायल ११२च्या सतर्कतेने दरोडा उधळला; ११ संशयित जेरबंद

Nashik Crime News : त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याच्या (Trimbakeshwar Police Station) हद्दीतील तळेगाव शिवारात स्वामी समर्थ केंद्राजवळील आवारात झालेल्या दरोड्याच्या गुन्ह्याचा नाशिक ग्रामीण पोलिसांनी अवघ्या काही तासांत छडा लावत ११ आरोपींना अटक केली आहे. डायल ११२ वरून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईत चोरीस गेलेला ६ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. (Nashik Crime News)



नेमकं काय घडलं ?


२६ जुलै रोजी पहाटे सुमारे ३ वाजता तळेगाव शिवारातील स्वामी समर्थ केंद्राजवळील आवारात १० ते १२ जणांच्या टोळीने प्रवेश केला. आरोपींनी साइट सुपरवायझर ज्ञानेश्वर सुळे आणि इतर कर्मचाऱ्यांना तलवार, कुऱ्हाड, लोखंडी रॉड, कटर व कोयत्याचा धाक दाखवत मारहाण केली. त्यानंतर मोबाईल फोन, इलेक्ट्रिक सबस्टेशनमध्ये वापरले जाणारे SQMM कंडक्टर वायर आणि इतर साहित्य लुटून आरोपी पसार झाले. याबाबत फिर्यादी यांनी तात्काळ डायल ११२ प्रणालीवर संपर्क करत याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच त्र्यंबकेश्वर पोलिसांनी (Trimbakeshwar Police) तपासाची चक्रे फिरवत अवघ्या काही तासात ११ संशयित आरोपींना अटक केली आहे. (Nashik Crime News)



११ संशयित जेरबंद


यामध्ये मनीष मदन सिंग (२१), रोहन खंडू पाटील (३०), योगेश कुमार सिताराम कुमार (३४), गणेश कैलास कोतारे (१९), अर्थव संजय सारुक्ते (१९), समाधान शिवाजी मालुंजकर (१८), पियुष अंबादास गवते (१८), कुणाल शरद चोथे (१९), शेखर जीवन अस्वले (१६), अजय जीवन चोथे (१९), मनोज शांताराम मुर्तडक (२०) या संशयित आरोपींकडून चोरीस गेलेले SQMM कंडक्टर वायर, ५ मोबाईल फोन, तांब्याचे वायर, तलवारी, कुऱ्हाडी, कोयते, कटर, स्क्रू ड्रायव्हर तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण ६ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Nashik Crime News)


या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात (Trimbakeshwar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली त्र्यंबकेश्वर पोलीस (Trimbakeshwar Police)  पुढील तपास करत आहेत.

Comments
Add Comment

PMSBY : प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, फक्त २० रुपयांत २ लाखांचा अपघात विमा

PMSBY : PMSBY म्हणजे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, ही भारतातील एक सरकारी अपघात विमा योजना आहे जी अपघाती मृत्यू आणि

Online Share Trading Fraud : ऑनलाईन शेअर ट्रेडिंग फसवणूक : प्रमुख बँकांना सुप्रीम कोर्टाची नोटीस

सर्वोच्च न्यायालयामुळे लाखो गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवित नवी दिल्ली : ऑनलाईन शेअर ट्रेडिंग आणि डिजिटल

Rashtriya Krishi Vikas Yojana : राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी पात्र ठरणारे महाराष्ट्र पहिले राज्य

नवी दिल्ली : ठरवून दिलेल्या वेळेत राष्ट्रीय कृषी विकास योजना निधीचा एकूण 75 टक्क्यांपेक्षा जास्त प्रभावी वापर

IndiGo Flight : धुराच्या इशाऱ्यानंतर दुबईहून मुंबईकडे येणाऱ्या इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये सुरक्षित लँडिंग

गांधीनगर : दुबईहून मुंबईकडे येत असलेल्या इंडिगोच्या विमानाचे आज अचानक आपत्कालीन लँडिंग करावे लागले. विमानाच्या

Badlapur Shaken : केकमध्ये आढळली उंदराची विष्ठा; नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या बेकरीवर एफडीएची धडक कारवाई

BADLAPUR: महाराष्ट्रातील बदलापूर शहरातून एक अतिशय संतापजनक आणि आरोग्याशी खेळणारा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. येथील

Water Cut Mumbai : येत्या मंगळवारी आणि बुधवारी संपूर्ण मुंबईतील काही भागांमध्ये तांत्रिक पाणीकपात

आधीच १० टक्के पाणीकपात, त्यात आणखी १५ टक्के कपातीचा सामना करावा लागणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई