Pakistan Occupied Kashmir : पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलकांवर गोळीबार; १९ जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर जखमी

इस्लामाबाद : पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानी प्रशासनाविरोधात नागरिकांचा तीव्र उद्रेक झाला असून तेथील परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली आहे. रावलकोट येथे आपल्या मागण्यांसाठी शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर पाकिस्तानी सुरक्षा दलांनी अचानक अंदाधुंद गोळीबार केला. 'जॉइंट अवामी अॅक्शन कमिटी'ने दिलेल्या माहितीनुसार, या गोळीबारात १९ आंदोलकांचा मृत्यू झाला असून १२ पेक्षा अधिक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. या मानवाधिकार उल्लंघनाच्या घटनेवर भारताने कडक शब्दांत प्रतिक्रिया देत पाकिस्तानचा तीव्र निषेध केला आहे.(Islamabad)



जॉइंट अवामी अॅक्शन कमिटीने दिलेल्या माहितीनुसार, आंदोलकांचा ताफा चिनार चौकातून पुढे जात मकबूल भट शहीद चौक येथे मुक्कामासाठी थांबण्यापूर्वी डी-चौकाच्या दिशेने निघाला होता. ताफा पुढे जात असतानाच पाकिस्तानी सुरक्षा दलांनी आंदोलकांना क्रूरपणे रोखण्यासाठी थेट गोळीबार सुरू केला. या गोळीबारात जॉइंट अवामी अॅक्शन कमिटीचे संस्थापक उमर नझीर कश्मीरी यांचे धाकटे बंधू उस्मान नझीर यांच्यासह विविध भागांतील आंदोलकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन बलोच नागरिकांचाही समावेश असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.(Pakistan)



पाकव्याप्त काश्मीरमधील या हिंसक कारवाईवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र शब्दांत भाष्य केले आहे. "पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुरू असलेला नागरिकांचा आक्रोश हा इस्लामाबादने गेल्या अनेक दशकांपासून केलेल्या प्रशासकीय दडपशाही आणि शोषणाचा थेट परिणाम आहे. निःशस्त्र आंदोलकांवर केलेली लष्करी व पोलिसी कारवाई अत्यंत निषेधार्ह असून पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आला आहे," असे भारताने म्हटले आहे.



खैबर पख्तूनख्वामध्ये आत्मघाती हल्ला



दुसऱ्या एका घटनेत, पाकिस्तानच्या उत्तर-पश्चिम भागातील खैबर पख्तूनख्वा प्रांतात २४ जुलै रोजी एक मोठा आत्मघाती दहशतवादी हल्ला झाला. अफगाणिस्तान सीमेलगत असलेल्या टँक जिल्ह्यात, लष्करी आणि पोलीस सुरक्षा चौकीवर दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेले वाहन थेट चौकीच्या बाहेरील भिंतीवर आदळवले. या भीषण स्फोटात १२ पाकिस्तानी सुरक्षा जवानांसह एकूण १५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

Comments
Add Comment

Pakistan Saudi Arabia : 'सऊदी अरबमध्ये भीक मागू नका’; पाकिस्तानने हज-उमराह यात्रेकरूंना का दिली कडक ताकीद?

इस्लामाबाद : पाकिस्तान सरकारने आपल्या नागरिकांना सौदी अरेबियात भीक मागू नये आणि परवानगीशिवाय पैसे गोळा करू

Donald Trump : भारताकडून शिका!’ ट्रम्प यांचा अमेरिकेच्या निवडणूक व्यवस्थेवर निशाणा; SAVE Act साठी दबाव

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एकदा SAVE America Act मंजूर करण्यासाठी काँग्रेसवर

Hayden Panettiere Passes Away : बालकलाकार ते हॉलीवूड स्टार! 'हिरोज' फेम अभिनेत्री हेडन पॅनेटीयरचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन

लॉस एंजिलीस : हॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारी 'हेडन

Indonesia Earthquake : इंडोनेशियाला पुन्हा भूकंपाचा धक्का; 5.7 तीव्रतेच्या भूकंपाने नागरिकांमध्ये भीती

इंडोनेशिया : इंडोनेशियामध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या शक्तिशाली भूकंपानंतर सोमवारी सकाळी पुन्हा एकदा

Europe Heatwave 2026 : युरोपमध्ये उष्णतेचा कहर! जूनमध्ये १६ हजारांहून अधिक मृत्यू; पुन्हा हीटवेव्हचा धोका

नवी दिल्ली : युरोपमध्ये यंदा तीव्र उष्णतेने मोठे संकट निर्माण केले आहे. जून महिन्यात जवळपास आठवडाभर सुरू

America Iran War : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत... इराणचा इशारा

तेहरान : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या होर्मुझ सामुद्रधुनीवरील वाहतूक