Shivsena : राजकीय भूकंप! उबाठा गटाला आणखी एक धक्का; शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश

- अहिल्यानगर, पुणे, नांदेडमधील शेकडो पदाधिकारी शिंदेंच्या शिवसेनेत


मुंबई : राज्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून, अहिल्यानगर, पुणे आणि नांदेड जिल्ह्यांतील उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) (उबाठा) गटाच्या विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत आज ठाण्यात शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे संबंधित भागात उबाठा गटाला मोठा धक्का बसल्याची चर्चा असून, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाकडे होत असलेल्या राजकीय स्थलांतराची ही आणखी एक ठळक नोंद मानली जात आहे.


">खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांच्या पुढाकाराने अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूरचे उपजिल्हाप्रमुख सचिन बडदे, राधाकिशन बोरकर, राहुल रणधीर, आशिष त्रिभुवन, नेवासाचे उपजिल्हाप्रमुख हरिराम शेळके, नीरज नागरे, पंकज लांभाटे, नितीन जगताप, राहुरीचे डॉ. अजय म्हसे, राजू गुंजाळ, विजय शिरसाट, दीपक पंडित, प्रशांत शिंदे, अकोलेचे महेंद्र धुमाळ, रामहरी तिकांडे, प्रदीप हासे, शिर्डी-राहताचे अनिल बांगरे, सोमनाथ गोरे, विजय मोहोर तसेच कोपरगावचे मुकूंद सिनकर, सचिन मलिक, अशोक पवार यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. (Shivsena)



पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील उबाठा गटाचे तालुकाप्रमुख नितीन शिंदे, भीमराव भोसले, सुधीर पाटील, महादेव सोमवंशी, प्रवीण देवकर तसेच जिल्हाप्रमुख सुरेंद्र जेवरे यांच्या नेतृत्वाखाली गणेश धायगुडे, विजय थिटे, विजयकुमार देवकाते, डॉ. राहुल शंख आणि असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. (Shivsena)


दौंड विधानसभा मतदारसंघातील दत्तात्रय शितोळे, संपत शिंदे, विजय गुंड, माजी जिल्हाप्रमुख ॲड. राजेंद्र काळे, विश्वास मांढरे, निलेश मदने, शहाजी दळवी, परेश भापकर यांनीही आपल्या समर्थकांसह शिवसेनेची वाट धरली. नांदेड जिल्ह्यातील मुखेडचे जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, विजयकुमार पाटील सुगावकर, संजय रावणगावकर, गणपत पाटील मंडलापूरकर, किरण पाटील धामणगावकर या पंचायत समिती सदस्यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. (Shivsena)



उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व नवागतांचे स्वागत करत, "शिवसेना ही सर्वसामान्यांची आणि विकासाला प्राधान्य देणारी संघटना आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून पदाधिकारी आणि कार्यकर्ते स्वेच्छेने शिवसेनेत येत आहेत. जनतेचा विश्वास आणि विकासाची भूमिका हीच आमची खरी ताकद आहे," असे सांगितले. (Shivsena)


यावेळी खासदार भाऊसाहेब वाघचौरे, आमदार विजयबापू शिवतारे, विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, माजी खासदार आनंद परांजपे, आमदार रवींद्र फाटक, बालाजी पाटील खतगावकर तसेच शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags
shivsenamaharashtraUddhav ThackerayMaharashtra politicsEknath Shindemaharashtra new
Comments
Add Comment

FDA Raid On KFC and Dominos : KFCमध्ये सडलेलं चिकन, Domino’sवरही कारवाई; ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना FDA चा दणका

FDA Raid On KFC and Dominos : महागड्या दरात खाद्यपदार्थ विकणाऱ्या मोठ्या फूड ब्रँड्सच्या अन्नगुणवत्तेवर पुन्हा एकदा

Suman Kale Murder Case : पारधी समाजाच्या सुमन काळे हत्या प्रकरणात राज्य शासनाची नव्याने एसआयटी; विशेष तपास पथक गठित

अहिल्यानगर : अहिल्यानगर येथील पारधी समाजातील सुमन काळे यांच्या सन २००७ मधील संशयास्पद पोलिस कोठडीतील मृत्यू

Prakash Abitkar : आरोग्य समित्यांच्या माध्यमातून जनतेच्या आरोग्य समस्या जाणून घेणार

मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या विविध

Maharashtra Agriculture Department : महाराष्ट्राच्या कृषी विभागाची दमदार कामगिरी; केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान

- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे स्वीकारणार पुरस्कार मुंबई : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)

Ashish Shelar : दहिहंडी उत्सवाला युनेस्कोमध्ये घेऊन जाणार, सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री अँड आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्र शासनातर्फे दहिहंडी उत्सवाला युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा यादीत नेण्यासाठी प्रयत्न करीत

Chandigaon Tiranga Case : चंडीगाव ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणा, राष्ट्रध्वजाचा अवमान

डहाणू : स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वजाच्या सन्मानाबाबत डहाणू तालुक्यातील चंडीगाव ग्रामपंचायतीच्या कारभारातील