Supreme Court : शांततापूर्ण निदर्शने हा संविधानाने दिलेला अधिकार; सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी

नवी दिल्ली : नीट परीक्षा प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून देशभर तीव्र आंदोलन पुकारण्यात आले होते. 'कॉकरोच जनता पार्टी'(Cockroach Janata Party)च्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या आंदोलनाची व्याप्ती वाढून हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी २० जुलै रोजी संसदेवर काढण्यात आलेल्या मोर्चानरम्यान परिस्थिती अत्यंत चिघळली आणि पोलिसांनी केलेल्या लाठीमारमध्ये अनेक आंदोलक विद्यार्थी तसेच काही पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने आंदोलकांवरील पोलिसांच्या कारवाईवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत.(Supreme Court)



आंदोलकांवर झालेल्या लाठीमारविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठाने या सुनावणीदरम्यान अत्यंत महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली. खंडपीठाने स्पष्ट शब्दांत म्हटले की, "शांततापूर्ण निदर्शने करणे हा भारतीय संविधानाने नागरिकांना दिलेला मूलभूत अधिकार आहे. जोपर्यंत आंदोलन शांततापूर्ण मार्गाने सुरू आहे, तोपर्यंत हा अधिकार कोणालाही नाकारता येणार नाही. केवळ आंदोलन सुरू आहे म्हणून पोलिसांकडून बळाचा अतिवापर किंवा हिंसक कारवाई करण्याचे समर्थन कधीही केले जाऊ शकत नाही."



विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान पोलिसांकडून बळाचा अतिवापर करण्यात आल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना, पोलिसांनी केलेल्या अतिरिक्त कारवाईच्या आरोपांची स्वतंत्रपणे तपासणी व चौकशी झालीच पाहिजे, असे निर्देश न्यायालयाने दिले. तसेच, देशभरात अशा प्रकारची निदर्शने आणि आंदोलने हाताळण्यासाठी एकसमान आणि सुटसुटीत पोलीस नियमावली असण्याची नितांत गरज असल्याचेही न्यायालयाने अधोरेखित केले. सुनावणीदरम्यान एका वकिलाने विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान पोलिसांकडून झालेल्या अमानुष मारहाणीचा मुद्दा उपस्थित केला, तसेच जमावाकडून पोलिसांना मारहाण झाल्याचे व्हिडिओही समोर आल्याचे सांगितले. यावर न्यायमूर्ती बागची यांनी महत्त्वपूर्ण टिप्पणी करताना, "एखाद्या व्यक्तीला, मग ती आंदोलक असो वा पोलीस, झालेली कोणतीही दुखापत ही समान चिंतेची बाब आहे," असे म्हटले.(Viral Video)



अशा प्रकारच्या मोठ्या आणि संवेदनशील आंदोलनांना सामोरे जाताना पोलिसांसाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था आणि निश्चित कार्यपद्धती का करण्यात आली नव्हती, असा सवालही खंडपीठाने उपस्थित केला. न्यायालयाने पुढे निरीक्षण नोंदवले की, "समजा तरुणांना किंवा विद्यार्थ्यांना एखाद्या महत्त्वाच्या मुद्द्यावर आपला रोष व्यक्त करायचा असेल, तर त्यांना लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे. प्रशासनाकडून त्यांना योग्य जागा उपलब्ध करून दिली पाहिजे आणि त्यावर अनावश्यक निर्बंध नसावेत. मात्र, यादरम्यान जर एखाद्या समाजकंटकाने काही बेकायदेशीर वा हिंसक कृत्य केलेच, तर कायद्यानुसार नक्कीच योग्य ती कारवाई केली जाऊ शकते, परंतु सरसकट बळाचा वापर अयोग्य आहे."

Comments
Add Comment

Plastic Waste : भारतापुढे दररोज १९ हजार टन प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे आव्हान

नवी दिल्ली : दुधाची पाकिटे, चिप्सची वेष्टणे आणि ऑनलाइन खरेदीचे पॅकेजिंग यामुळे देशात दररोज सुमारे १९ हजार टन

UP Crime News : प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला अन् प्रियकराने मित्रांसोबत मिळून रचला भयानक खेळ; उत्तर प्रदेश हादरले!

उत्तर प्रदेश : विश्वासाला काळिमा फासणारी आणि मन सुन्न करणारी एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर

Robot Waiter Murthal : मुरथलच्या धाब्यावर रोबोट वेटरची एन्ट्री! हरियाणातील 'रेशम धाब्या'चा भन्नाट प्रयोग, व्हिडिओ व्हायरल

मुरथल : हरियाणातील मुरथल हे ठिकाण आपल्या चविष्ट आणि गरमागरम पराठ्यांसाठी तसेच पारंपरिक चवीसाठी देशभरात

Shahzad Bhatti Network : केंद्र सरकारची मोठी कारवाई : ISI समर्थित ‘शहजाद भट्टी नेटवर्क’चा पर्दाफाश; १४ राज्यांतून २५३ जण ताब्यात

नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात मोठ्या दहशतवादी कटाचा पर्दाफाश केल्याचा दावा केंद्र

Smriti Irani News : भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महिलांना मोठं स्थान; स्मृती इराणींचे मुख्य संघटनेत दणकेबाज कमबॅक!

नवी दिल्ली : आगामी राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (भाजप) आपल्या नव्या

Lakshmanan Meyyappan Youngest CA : अवघ्या १६ व्या वर्षी कमाल! लक्ष्मणन मेय्यप्पन ठरला जगातील सर्वात तरुण 'चार्टर्ड अकाउंटंट'

दुबई : वयाच्या सोळाव्या वर्षी जिथे बहुतेक तरुण आपल्या भविष्याची आणि करिअरची दिशा शोधत असतात, तिथे एका भारतीय