MPSC Paper Leak : MPSC औषध निरीक्षक परीक्षा वादाला नवे वळण; पेपरफुटीची तक्रारच बनावट असल्याचा दावा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक पदाच्या भरती परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या परीक्षेत गैरव्यवहार झाल्याची तक्रार समोर आल्यानंतर मोठी चर्चा सुरू झाली होती. मात्र, आता ही तक्रारच खोटी असल्याचा दावा समोर आला आहे. एमपीएससीमधील सूत्रांच्या माहितीनुसार, पुन्हा परीक्षा व्हावी या उद्देशाने तक्रारदाराने कथित बनाव रचल्याची शक्यता तपासली जात आहे.



या प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर एमपीएससीने या तक्रारीची गंभीर दखल घेत चौकशी सुरू केली. (Rohit Pawar)


मिळालेल्या माहितीनुसार, औषध निरीक्षक पदासाठीची लेखी परीक्षा 22 मार्च रोजी ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आली होती. त्यानंतर 12 जून रोजी निकाल जाहीर झाला. पात्र उमेदवारांच्या मुलाखती 1 ते 21 जुलैदरम्यान पार पडल्या आणि 22 जुलै रोजी अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली. (MPSC Paper Leak)


अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर 23 जुलै रोजी आयोगाला ई-मेलद्वारे पेपरफुटीची तक्रार प्राप्त झाली. आयोगाने तातडीने तक्रारदाराकडे पुरावे मागवले आणि तक्रारदार तसेच संबंधित उमेदवारांना चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले. (Paper leak)


दरम्यान, या प्रकरणात नवे वळण आले असून तक्रारदाराने नंतर पाठवलेल्या आणखी एका ई-मेलमध्ये यापूर्वी केलेली तक्रार खोटी असल्याचे नमूद केल्याचा दावा केला जात आहे. पुन्हा परीक्षा घेण्यात यावी, या उद्देशाने पेपरफुटीची खोटी माहिती दिल्याचे त्याने कबूल केल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. (MPSC Re Exam)


याशिवाय, कथित संभाषण 20 मार्च रोजी झाले असल्याचा दावा असताना तक्रार इतक्या उशिरा का करण्यात आली, याचाही तपास सुरू आहे. संबंधित ई-मेल, तक्रारीतील माहिती आणि इतर पुराव्यांची पडताळणी एमपीएससीकडून केली जात असून, चौकशीनंतरच या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.


Comments
Add Comment

Pune Crime : पुण्यात रीलस्टार तरुणीचा 19 वर्षीय तरुणावर हल्ला; दोन तरुणींसह तिघांना अटक

पुणे :  पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरात किरकोळ वादातून 19 वर्षीय तरुणावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली

Maharashtra Weather : पावसाची प्रतीक्षा कायम! कोकण-घाटमाथा वगळता राज्यात जोरदार सरींची शक्यता कमी

मुंबई : ऑगस्टचा पंधरवडा संपत आला असतानाही महाराष्ट्रातील अनेक भागांत अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला नाही.

Sunetra Pawar : 'दादांचे प्रगत, पुरोगामी महाराष्ट्राचे स्वप्न सर्वांच्या साथीने पूर्ण करायचे आहे'

पुणे : दादांनी (अजित पवार) तुम्हाला आणि मला दिलेला हा जो विकासाचा वारसा आहे तो वारसा अर्ध्यावर सोडून देणे हे

Meghna Sakore Bordikar : 'परभणी गुंतवणूक परिषदेतून १,६०० कोटींची गुंतवणूक; स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी'

परभणी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात परभणी जिल्ह्यात उद्योगवाढीसाठी पोषक वातावरण निर्माण

Suman Kale Murder Case : पारधी समाजाच्या सुमन काळे हत्या प्रकरणात राज्य शासनाची नव्याने एसआयटी; विशेष तपास पथक गठित

अहिल्यानगर : अहिल्यानगर येथील पारधी समाजातील सुमन काळे यांच्या सन २००७ मधील संशयास्पद पोलिस कोठडीतील मृत्यू

Ashish Shelar : दहिहंडी उत्सवाला युनेस्कोमध्ये घेऊन जाणार, सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री अँड आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्र शासनातर्फे दहिहंडी उत्सवाला युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा यादीत नेण्यासाठी प्रयत्न करीत