Monday, July 27, 2026

Ganpati Special Train: गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेची मोठी घोषणा; 246 विशेष गाड्या धावणार, मुंबई-कोकण प्रवास होणार सुलभ

Ganpati Special Train:  गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेची मोठी घोषणा; 246 विशेष गाड्या धावणार, मुंबई-कोकण प्रवास होणार सुलभ
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या भाविक आणि प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने मोठा दिलासा दिला आहे. यंदाच्या गणेशोत्सवात एकूण 246 गणपती विशेष गाड्या चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये 184 वातानुकूलित, शयनयान आणि अनारक्षित डब्यांसह मिश्र विशेष गाड्या, तर 62 पूर्णपणे अनारक्षित विशेष गाड्यांचा समावेश आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, पुणे आणि कोकणादरम्यानचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.

 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–सावंतवाडी रोड–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

दरम्यान विशेष दैनिक गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष गाडी क्रमांक 01103 ही 11 सप्टेंबर 2026 ते 26 सप्टेंबर 2026 या कालावधीत दररोज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी 3.30 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे 4.00 वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल. तर विशेष गाडी क्रमांक 01104 ही 12 सप्टेंबर 2026 ते 27 सप्टेंबर 2026 या कालावधीत दररोज सावंतवाडी रोड येथून पहाटे 4.35 वाजता सुटून त्याच दिवशी सायंकाळी 4.40 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल. या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, कामथे, सावरडा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप येथे थांबे असतील. गाडीमध्ये 2 वातानुकूलित तृतीय श्रेणी, 12 शयनयान, 6 सामान्य द्वितीय श्रेणी आणि 2 द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन असे एकूण डबे असतील.

मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–सावंतवाडी रोड–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

दरम्यान आणखी एक विशेष दैनिक गाडी चालवण्याची घोषणा केली आहे. विशेष गाडी क्रमांक 01151 ही 11 सप्टेंबर 2026 ते 27 सप्टेंबर 2026 या कालावधीत दररोज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री 12.25 वाजता सुटून त्याच दिवशी दुपारी 2.20 वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल. तर विशेष गाडी क्रमांक 01152 ही 11 सप्टेंबर 2026 ते 27 सप्टेंबर 2026 या कालावधीत दररोज सावंतवाडी रोड येथून दुपारी 3.35 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे 4.35 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल. या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप येथे थांबे असतील. गाडीमध्ये 2 वातानुकूलित तृतीय श्रेणी, 12 शयनयान, 6 सामान्य द्वितीय श्रेणी आणि 2 द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन असे डबे असतील.

 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–रत्नागिरी–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

दरम्यान विशेष दैनिक गाडी चालवण्याची घोषणा केली आहे. विशेष गाडी क्रमांक 01153 ही 11 सप्टेंबर 2026 ते 26 सप्टेंबर 2026 या कालावधीत दररोज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 11.30 वाजता सुटून त्याच दिवशी रात्री 8.25 वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल. तर विशेष गाडी क्रमांक 01154 ही 12 सप्टेंबर 2026 ते 27 सप्टेंबर 2026 या कालावधीत दररोज रत्नागिरी येथून पहाटे 4.00 वाजता सुटून त्याच दिवशी दुपारी 1.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल. या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, कामथे, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड येथे थांबे असतील. गाडीमध्ये 2 वातानुकूलित तृतीय श्रेणी, 12 शयनयान, 6 सामान्य द्वितीय श्रेणी आणि 2 द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन असे डबे असतील.

मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस–सावंतवाडी रोड–लोकमान्य टिळक टर्मिनस

दरम्यान द्वि-साप्ताहिक आणि साप्ताहिक विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. विशेष गाडी क्रमांक 01131 ही 17 सप्टेंबर 2026 ते 27 सप्टेंबर 2026 या कालावधीत दर गुरुवारी आणि रविवारी सकाळी 8.45 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटून त्याच दिवशी रात्री 10.10 वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल. तर विशेष गाडी क्रमांक 01132 ही दर गुरुवारी आणि रविवारी रात्री 11.20 वाजता सावंतवाडी रोड येथून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी 11.45 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. याशिवाय विशेष गाडी क्रमांक 01129 ही 15 आणि 22 सप्टेंबर 2026 रोजी (मंगळवारी) सकाळी 8.45 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटून त्याच दिवशी रात्री 10.10 वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल. परतीची विशेष गाडी क्रमांक 01130 ही 15 आणि 22 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 11.20 वाजता सावंतवाडी रोड येथून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी 11.45 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. या सर्व विशेष गाड्यांना ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप येथे थांबे असतील. गाडीमध्ये 2 वातानुकूलित तृतीय श्रेणी, 12 शयनयान, 6 सामान्य द्वितीय श्रेणी आणि 2 द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन असतील.

लोकमान्य टिळक टर्मिनस - रत्नागिरी - लोकमान्य टिळक टर्मिनस (आठवड्यातून ५ दिवस) विशेष गाडी (२२ सेवा)

गाडी क्रमांक 01167 विशेष गाडी दिनांक १२.०९.२०२६ ते दिनांक २६.०९.२०२६ या कालावधीत दर मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी, शनिवारी आणि रविवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २१.०० वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ०५.०० वाजता पोहोचेल. (११ सेवा) गाडी क्रमांक 01168 विशेष गाडी दिनांक १३.०९.२०२६ ते दिनांक २७.०९.२०२६ या कालावधीत दर बुधवारी, गुरुवारी, शुक्रवारी, रविवारी आणि सोमवारी रत्नागिरी येथून १५.१५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी मध्यरात्री ००.४० वाजता पोहोचेल. (११ सेवा)

 लोकमान्य टिळक टर्मिनस – रत्नागिरी – लोकमान्य टिळक टर्मिनस (आठवड्यातून 5 दिवस) विशेष गाडी (22 सेवा)

गणेशोत्सवानिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस–रत्नागिरी–लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान आठवड्यातून पाच दिवस विशेष गाडी चालवण्याची घोषणा केली आहे. विशेष गाडी क्रमांक 01167 ही 12 सप्टेंबर 2026 ते 26 सप्टेंबर 2026 या कालावधीत दर मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी, शनिवारी आणि रविवारी रात्री 9.00 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे 5.00 वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल. तर विशेष गाडी क्रमांक 01168 ही 13 सप्टेंबर 2026 ते 27 सप्टेंबर 2026 या कालावधीत दर बुधवारी, गुरुवारी, शुक्रवारी, रविवारी आणि सोमवारी दुपारी 3.15 वाजता रत्नागिरी येथून सुटून दुसऱ्या दिवशी रात्री 12.40 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. या गाडीला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड येथे थांबे असतील. गाडीमध्ये 2 वातानुकूलित तृतीय श्रेणी, 12 शयनयान, 6 सामान्य द्वितीय श्रेणी आणि 2 द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन असतील.

लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक वातानुकूलित विशेष गाडी (4 सेवा)

लोकमान्य टिळक टर्मिनस–मडगाव दरम्यान साप्ताहिक वातानुकूलित विशेष गाडीही चालवण्यात येणार आहे. विशेष गाडी क्रमांक 01165 ही 15 आणि 22 सप्टेंबर 2026 रोजी (मंगळवारी) मध्यरात्री 12.45 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटून त्याच दिवशी दुपारी 2.30 वाजता मडगाव येथे पोहोचेल. परतीची विशेष गाडी क्रमांक 01166 ही त्याच दिवशी सायंकाळी 4.30 वाजता मडगाव येथून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी 7.10 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. या गाडीला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, मदुरे, थिवी आणि करमळी येथे थांबे असतील. गाडीमध्ये 1 वातानुकूलित प्रथम श्रेणी, 3 वातानुकूलित द्वितीय, 15 वातानुकूलित तृतीय आणि 2 जनरेटर व्हॅन्स असतील.

 लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष गाडी (4 सेवा)

विशेष गाडी क्रमांक 01185 ही 16 आणि 23 सप्टेंबर 2026 रोजी (बुधवारी) मध्यरात्री 12.45 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटून त्याच दिवशी दुपारी 2.30 वाजता मडगाव येथे पोहोचेल. परतीची विशेष गाडी क्रमांक 01186 ही त्याच दिवशी सायंकाळी 4.30 वाजता मडगाव येथून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी 7.10 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. या गाडीला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, मदुरे (केवळ गाडी क्रमांक 01185), थिवी आणि करमळी येथे थांबे असतील. गाडीमध्ये 1 वातानुकूलित प्रथम श्रेणी, 1 वातानुकूलित द्वितीय, 6 वातानुकूलित तृतीय, 8 शयनयान, 4 सामान्य द्वितीय श्रेणी, 1 द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि 1 जनरेटर व्हॅन असे डबे असतील.

 पुणे – रत्नागिरी वातानुकूलित साप्ताहिक विशेष गाडी (4 सेवा)

गणेशोत्सवानिमित्त पुणे–रत्नागिरी दरम्यान वातानुकूलित साप्ताहिक विशेष गाडीही चालवण्यात येणार आहे. विशेष गाडी क्रमांक 01445 ही 15 आणि 22 सप्टेंबर 2026 रोजी (मंगळवारी) पहाटे 12.25 वाजता पुणे येथून सुटून त्याच दिवशी सकाळी 11.50 वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल. परतीची विशेष गाडी क्रमांक 01446 ही त्याच दिवशी सायंकाळी 5.50 वाजता रत्नागिरी येथून सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे 5.20 वाजता पुणे येथे पोहोचेल. या गाडीला चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड येथे थांबे असतील. गाडीमध्ये 3 वातानुकूलित द्वितीय, 15 वातानुकूलित तृतीय, 1 द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि 1 जनरेटर कार असे डबे असतील.

 पुणे – रत्नागिरी साप्ताहिक विशेष गाडी (6 सेवा)

विशेष गाडी क्रमांक 01447 ही 12, 19 आणि 26 सप्टेंबर 2026 रोजी (शनिवारी) पहाटे 12.25 वाजता पुणे येथून सुटून त्याच दिवशी सकाळी 11.50 वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल. परतीची विशेष गाडी क्रमांक 01448 ही त्याच दिवशी सायंकाळी 5.50 वाजता रत्नागिरी येथून सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे 5.20 वाजता पुणे येथे पोहोचेल. या गाडीला चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड येथे थांबे असतील. गाडीमध्ये 2 वातानुकूलित द्वितीय, 4 वातानुकूलित तृतीय, 8 शयनयान, 4 सामान्य द्वितीय श्रेणी, 1 द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि 1 जनरेटर कार असतील.

 दिवा – खेड – दिवा मेमू दैनिक अनारक्षित विशेष गाडी (32 सेवा)

प्रवाशांच्या सोयीसाठी दिवा–खेड–दिवा दरम्यान मेमू दैनिक अनारक्षित विशेष गाड्याही चालवण्यात येणार आहेत. विशेष गाडी क्रमांक 01155 ही 11 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर 2026 या कालावधीत (22 सप्टेंबर वगळून) दररोज सकाळी 7.15 वाजता दिवा येथून सुटून दुपारी 2.35 वाजता खेड येथे पोहोचेल. परतीची विशेष गाडी क्रमांक 01156 ही दररोज सायंकाळी 4.00 वाजता खेड येथून सुटून रात्री 10.50 वाजता दिवा येथे पोहोचेल. या गाडीला निळजे, तळोजा पंचनद, कळंबोली, पनवेल, सोमाटणे, रसायनी, आपटा, जिते, हमरापूर, पेण, कासू, नागोठणे, निडी, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी आणि कळंबणी बुद्रुक येथे थांबे असतील. या गाडीत 12 डब्यांची मेमू रेक असेल.

 दिवा – चिपळूण – दिवा मेमू दैनिक अनारक्षित विशेष गाडी (30 सेवा)

दिवा–चिपळूण–दिवा दरम्यानही मेमू दैनिक अनारक्षित विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. विशेष गाडी क्रमांक 01133 ही 11 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर 2026 या कालावधीत (23 सप्टेंबर वगळून) दररोज दुपारी 1.40 वाजता दिवा येथून सुटून रात्री 9.30 वाजता चिपळूण येथे पोहोचेल. परतीची विशेष गाडी क्रमांक 01134 ही 12 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर 2026 या कालावधीत (24 सप्टेंबर वगळून) दररोज सकाळी 7.30 वाजता चिपळूण येथून सुटून दुपारी 1.00 वाजता दिवा येथे पोहोचेल. या गाडीला निळजे, तळोजा पंचनंद, कळंबोली, पनवेल, सोमाटणे, रसायनी, आपटा, जिते, हमरापूर, पेण, कासू, नागोठणे, निडी, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड आणि अंजणी येथे थांबे असतील. या गाडीत 12 डब्यांची मेमू रेक असेल. मध्य रेल्वेने प्रवाशांना वेळेवर आरक्षण करण्याचे आवाहन केले असून विशेष गाड्यांचे संपूर्ण वेळापत्रक आणि आरक्षणाची माहिती रेल्वेच्या अधिकृत माध्यमांवर उपलब्ध असल्याचे सांगितले आहे. गणेशोत्सवाच्या काळात होणारी अतिरिक्त प्रवासी गर्दी लक्षात घेऊन ही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. गणपती विशेष आरक्षित गाड्यांसाठी तिकीट आरक्षणाची प्रक्रिया सर्व पीआरएस (PRS) केंद्रांवर तसेच आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू होणार आहे. 1 ऑगस्ट 2026 रोजी गाडी क्रमांक 01153, 01445, 01167 आणि 01447 साठी, 2 ऑगस्ट 2026 रोजी गाडी क्रमांक 01165 आणि 01185 साठी, तर 3 ऑगस्ट 2026 रोजी गाडी क्रमांक 01103, 01129, 01151, 01171 आणि 01131 साठी आरक्षण सुरू होईल. सामान्य दरातील अनारक्षित डब्यांसाठी यूटीएस (UTS) प्रणालीद्वारे तिकीट उपलब्ध असेल. प्रवासी तिकीट बुकिंगसाठी 'रेलवन' ॲपचाही वापर करू शकतात. विशेष गाड्यांचे थांबे आणि वेळापत्रक जाणून घेण्यासाठी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा एनटीईएस (NTES) ॲप डाउनलोड करावे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >