Mangal Prabhat Lodha : विरोधकांच्या खोट्या प्रचाराला कृतज्ञतेतून उत्तर; कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या वतीने उद्या ‘धन्यवाद मोदीजी’ कार्यक्रम

मुंबई : “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच देशाच्या युवा पिढीचा विचार केला आहे आणि भविष्यातही त्यांच्या शिक्षण, कौशल्य विकास, रोजगार आणि सक्षमीकरणासाठी ते तितक्याच बांधिलकीने कार्य करत राहतील, याचा आम्हाला विश्वास आहे. आज भारताकडे जगातील सर्वाधिक युवा शक्ती आहे, हीच आपल्या देशाची सर्वात मोठी ताकद आहे. देशविरोधी शक्तींनाही ही ताकद माहिती आहे. त्यामुळेच खोटे आरोप, संभ्रम आणि फेक नॅरेटिव्हच्या माध्यमातून या युवा शक्तीची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र आम्ही हा अपप्रचार यशस्वी होऊ देणार नाही. ‘धन्यवाद मोदीजी’ कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी आणि युवकांसाठी मोदीजींनी घेतलेला प्रत्येक ऐतिहासिक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणार आहोत,” असे प्रतिपादन कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.


भारतीय जनता पक्षाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी आणि युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी घेण्यात आलेल्या ऐतिहासिक निर्णयांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘धन्यवाद मोदीजी’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सोमवार, दि. २७ जुलै २०२६ रोजी दुपारी ४.०० वाजता स्व. तुकाराम ओंबळे चौक, चौपाटी, गिरगाव, मुंबई येथे होणार आहे.



या कार्यक्रमात राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP 2020), मल्टिपल एन्ट्री आणि एक्झिट प्रणाली, PM SHRI शाळा, PM e-VIDYA, DIKSHA, प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना, प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजना, IIT, IIM आणि AIIMSचा विस्तार, स्किल इंडिया अभियान, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना (PMKVY), PM-SETU, ऑपरेशन गंगा अशा विद्यार्थी आणि युवकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणाऱ्या विविध निर्णयांची माहिती फलकांच्या माध्यमातून नागरिकांसमोर मांडण्यात येणार आहे.


लोढा पुढे म्हणाले, “विरोधकांकडे विकासाची दृष्टी नसल्याने ते खोट्या प्रचाराचा आधार घेत आहेत. आंदोलने, अपप्रचार आणि फेक नॅरेटिव्हच्या माध्यमातून देशातील युवकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र सत्य जनतेसमोर मांडणे ही आमची जबाबदारी आहे. ‘धन्यवाद मोदीजी’ हा केवळ कार्यक्रम नसून देशाच्या युवा शक्तीने अनुभवलेल्या सकारात्मक परिवर्तनाबद्दल व्यक्त होणारी कृतज्ञतेची भावना आहे. मोदीजींनी विद्यार्थ्यांसाठी, युवकांसाठी आणि त्यांच्या भविष्याच्या उभारणीसाठी घेतलेला प्रत्येक निर्णय आम्ही जनतेपर्यंत पोहोचवणार आहोत.”


भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, युवा मोर्चा, महिला मोर्चा, विविध शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थी, युवक तसेच नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी होणार असून, युवकांच्या भविष्याला दिशा देणाऱ्या निर्णयांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणार आहेत.

Comments
Add Comment

Eknath Shinde:  'शिवसेना जनतेच्या दारी' अभियान राज्यभर राबवणार; एकनाथ शिंदेंची घोषणा

मुंबई: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विकास, जनसेवा आणि युवा सक्षमीकरण या तीन मुद्द्यांवर भर देत 'शिवसेना

Eknath Shinde : विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे श्रेय लाटणे म्हणजे 'बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना'; उद्धव-राज, राहुल गांधींवर शिंदेंचा घणाघाती हल्ला

विद्यार्थ्यांच्या आंदोलना आडून विरोधकांचा अराजकतेचा डाव सरकारने उधळला मुंबई : विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा

Gold Smuggling : देशभरात विशेष मोहिमेत तस्करांनी आणलेले 27 किलो सोने जप्त, 12 जणांना अटक

नवी दिल्ली : सोन्याची तस्करी करणाऱ्या संघटित टोळ्यांच्या जाळ्याविरोधातील आपली मोहीम तीव्र करत, महसूल गुप्तचर

Pralhad Joshi : शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी यांची पदभार स्वीकारताच मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर आढावा बैठक

नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच प्रल्हाद जोशी यांनी मंत्रालयाच्या

Narendra Modi : सुरक्षित, सक्षम आणि आत्मनिर्भर-स्वावलंबी भारताच्या उभारणीचा निर्धार दृढ करूया - पंतप्रधान

नवी दिल्ली : आज संरक्षण उत्पादन असो, संरक्षण निर्यात असो किंवा मित्र देशांसोबतचं राजकीय सहकार्य असो, भारत

Dog Attack : रेबीजमुळे चिमुकल्या समर्थ स्वामीचा दुर्दैवी मृत्यू; भटक्या कुत्र्यांवर कारवाईची मागणी

सोलापूर : भवानी पेठ परिसरातील घोंगडे वस्ती येथे कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या समर्थ स्वामी या