Prataprao Jadhav : श्री संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त ₹150 चे स्मृती नाणे व टपाल तिकीट जारी करण्याची केंद्राकडे मागणी

नवी दिल्ली : केंद्रीय आयुष मंत्रालय (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी परमपूज्य श्री संत गजानन महाराज यांच्या 150 व्या प्रकट दिनाचे औचित्य साधून रु. 150 चे विशेष स्मृती नाणे आणि स्मृती टपाल तिकीट जारी करण्याचे आवाहन केंद्र सरकारला केले आहे.(Prataprao Jadhav)



या संदर्भात त्यांनी केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय दळणवळण आणि ईशान्य क्षेत्र विकास मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया आणि केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांना पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये जाधव यांनी संबंधित मंत्रालयांना या प्रस्तावावर विचार करण्याची आणि संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश देण्याची विनंती केली आहे. फेब्रुवारी 1878 मध्ये महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे प्रथम प्रकट झालेल्या श्री संत गजानन महाराजांना महाराष्ट्र आणि भारताच्या आध्यात्मिक व सांस्कृतिक वारशात अत्यंत आदराचे स्थान आहे. त्या काळापासून शेगाव हे भारतातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र बनले असून, देश-विदेशातून लाखो भाविकांना आकर्षित करत असल्याचे जाधव यांनी आपल्या पत्रांमध्ये अधोरेखित केले आहे.(Shri Sant Gajanan Maharaj)



संत गजानन महाराजांचे जीवन आणि त्यांची शिकवण; अध्यात्म, भक्तिभाव, करुणा, नि:स्वार्थ सेवा आणि मानव कल्याणाच्या संदेशाद्वारे पिढ्यानपिढ्यांना प्रेरणा देत आहे. त्यांचे जीवन आणि त्यांची शिकवण 'श्री गजानन विजय' या पूजनीय ग्रंथात नोंदवलेली असून, त्यांच्या अनुयायांमध्ये या ग्रंथाला विशेष स्थान आहे, असे जाधव यांनी नमूद केले.


शिक्षण, आरोग्य सेवा, ग्रामीण विकास, समाजकल्याण आणि मानवतावादी सेवेच्या क्षेत्रातील श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव यांचे महत्त्वपूर्ण योगदान प्रतापराव जाधव यांनी अधोरेखित केले. यामुळे आध्यात्मिक आणि सामाजिक सेवेचे केंद्र म्हणून शेगावची ओळख अधिक मजबूत झाली आहे, असे त्यांनी सांगितले. हा प्रस्तावित उपक्रम संत गजानन महाराज यांना एक यथोचित राष्ट्रीय अभिवादन ठरेल आणि त्यांच्या जीवन व शिकवणीने प्रेरित झालेल्या लाखो भाविकांच्या श्रद्धा आणि भावनांचा सन्मान करेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आयुष मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 'राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याचे' उद्घाटन करण्यासाठी 25 फेब्रुवारी 2026 रोजी भारताच्या राष्ट्रपतींनी शेगावला दिलेल्या भेटीचेही आयुष राज्यमंत्र्यांनी आपल्या पत्रात स्मरण केले आहे. राष्ट्रपतींच्या या भेटीमुळे अध्यात्म, संस्कृती आणि जनसेवेचे केंद्र म्हणून शेगावचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले असल्याचे त्यांनी नमूद केले.



हा प्रस्ताव सकारात्मकतेने स्वीकारला जाईल आणि श्री संत गजानन महाराजांच्या अखंड अध्यात्मिक व सांस्कृतिक वारशाला योग्य राष्ट्रीय मान्यता मिळेल, असा विश्वास प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केला. श्री संत गजानन महाराजांचा 150 वा प्रकट दिन 17 फेब्रुवारी 2028 रोजी साजरा केला जाणार असून, तो देशभरातील भाविकांसाठी एक महत्त्वाचा अध्यात्मिक आणि सांस्कृतिक सोहळा ठरेल.

Comments
Add Comment

PM Modi Speech : एका वर्षात एक कोटी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य प्रशिक्षण देण्याची पंतप्रधानांची घोषणा

नवी दिल्ली : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र

Narendra Modi : 'सेमीकंडक्टरपासून अणुऊर्जेपर्यंत...'; जाणून घ्या पंतप्रधान मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला

Independence Day 2026 : तिरंगा, २१ तोफांची सलामी आणि ‘वंदे मातरम्’चा निनाद; लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाचा दिमाखदार सोहळा

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील ऐतिहासिक लाल

Independence Day 2026 : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त Google Doodleची खास कलाकृती; भारतीय वस्त्रकलेतून दिसली सांस्कृतिक विविधता

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त Google ने आपल्या होमपेजवर खास आणि रंगीबेरंगी Doodle सादर करून

Independence Day 2026 : लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदी फडकवणार तिरंगा; स्वातंत्र्यदिनासाठी दिल्ली हाय अलर्टवर, वाहतुकीपासून सुरक्षेपर्यंत कडेकोट बंदोबस्त

नवी दिल्ली : देशभरात आज ८०वा स्वातंत्र्यदिन (Independence Day 2026) मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी

Ajit Doval : "जमीन, आकाश किंवा पाताळात... आम्ही त्यांचा माग काढू" , 'ऑपरेशन सिंदूर'बाबत पंतप्रधान मोदींचा संदेश ; अजित डोवाल यांच्याकडून आठवणींना उजाळा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा स्पष्ट संदेश होता की, पहलगाम दहशतवादी हल्ल्याला जबाबदार असणारे मग ते