नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला. ध्वजारोहणानंतर पंतप्रधानांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशाला संबोधित करण्यास सुरुवात केली. लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे १३वे स्वातंत्र्यदिनाचे भाषण आहे. (Independence Day 2026)
यंदाच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याला ‘वंदे मातरम्’च्या १५०व्या वर्षाची विशेष पार्श्वभूमी आहे. याच निमित्ताने लाल किल्ल्यावरील सोहळ्यात ‘वंदे मातरम्’ला विशेष स्थान देण्यात आले. ८०वा स्वातंत्र्यदिन आणि ‘वंदे मातरम्’च्या १५० वर्षांच्या गौरवशाली प्रवासाचा संगम या सोहळ्यात पाहायला मिळाला. (Independence Day 2026)
तिरंग्यासोबत २१ तोफांची सलामी :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून राष्ट्रध्वज फडकवल्यानंतर भारतीय सैन्याच्या वतीने २१ तोफांची सलामी देण्यात आली. यावेळी ‘वंदे मातरम्’च्या धुनांनी लाल किल्ल्याचा परिसर देशभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला. भारतीय वायुदलाच्या हेलिकॉप्टरमधून लाल किल्ल्यावर उपस्थित नागरिकांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच ‘वंदे मातरम्’च्या १५०व्या वर्षानिमित्त विशेष स्मारक बॅनरही आकाशात झळकवण्यात आला. (Independence Day 2026)
नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त Google ने आपल्या होमपेजवर खास आणि रंगीबेरंगी Doodle सादर करून देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवात ...
भाषणापूर्वी राजघाटावर श्रद्धांजली :
लाल किल्ल्यावर पोहोचण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर ते लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य सोहळ्यासाठी दाखल झाले. (Independence Day 2026)
ज्ञानपथवर ‘वंदे मातरम्’ची खास रचना :
स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यादरम्यान ज्ञानपथवर २,५०० एनसीसी कॅडेट्स आणि ‘माय भारत’च्या स्वयंसेवकांनी ‘वंदे मातरम्’ची विशेष रचना साकारली. त्यामुळे संपूर्ण परिसरात देशभक्तीचा उत्साह पाहायला मिळाला.(Independence Day 2026)
नवी दिल्ली : देशभरात आज ८०वा स्वातंत्र्यदिन (Independence Day 2026) मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) दिल्लीतील लाल किल्ल्यावर ...
लाल किल्ल्याभोवती कडेकोट सुरक्षा :
स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. लाल किल्ला आणि आसपासच्या परिसरात तब्बल १५ ते २० हजार सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये दिल्ली पोलीस, सुरक्षा यंत्रणा आणि निमलष्करी दलांचा समावेश आहे. सुरक्षेसाठी १,००० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे परिसरावर नजर ठेवली जात आहे. संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी विविध सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत. (Independence Day 2026)
५ हजार विशेष पाहुणे उपस्थित :
यंदाच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी देशभरातून सुमारे ५ हजार विशेष अतिथींना आमंत्रित करण्यात आले आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि नागरिक या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार झाले आहेत. लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवतानाचा भव्य सोहळा, २१ तोफांची सलामी, आकाशातून झालेली पुष्पवृष्टी आणि ‘वंदे मातरम्’च्या विशेष सादरीकरणामुळे यंदाचा स्वातंत्र्यदिन सोहळा विशेष ठरला आहे. (Independence Day 2026)