Israel Employment : इस्त्रायलमध्ये रोजगारासाठी निवडलेल्या उमेदवारांना इस्त्रायली मानकांनुसार निवासी प्रशिक्षण

पहिल्या टप्प्यातील १०६ उमेदवारांना औंध, पुणे येथे २७ ते ३१ जुलैदरम्यान प्रशिक्षण


मुंबई(Mumbai) : राज्यातील युवकांना दर्जेदार रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे. या उपक्रमांतर्गत इस्त्रायलमध्ये रोजगारासाठी निवड झालेल्या उमेदवारांना तेथील कामकाजाच्या पद्धती, गुणवत्ता निकष आणि व्यावसायिक अपेक्षांशी सुसंगत बनविण्यासाठी इस्त्रायली मानकांनुसार (Israeli Standards) निवासी प्रशिक्षण आयोजित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.



कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या निर्णयानुसार, इस्त्रायलमधील प्लेसमेंटसाठी निवड झालेल्या पहिल्या गटातील १०६ उमेदवारांना दि. २७ जुलै २०२६ ते दि. ३१ जुलै २०२६ या कालावधीत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), औंध, पुणे येथे पाच दिवसांचे निवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.


या प्रशिक्षणामध्ये इस्त्रायलमध्ये सेवा क्षेत्रातील रोजगारासाठी निवड झालेल्या उमेदवारांचा समावेश आहे. या उमेदवारांना संबंधित व्यवसायातील इस्त्रायली मानके, कामाच्या ठिकाणी पाळावयाची सुरक्षितता व गुणवत्ता मानके, आधुनिक बांधकाम पद्धती, व्यावसायिक शिस्त, कार्यसंस्कृती तसेच परदेशातील कामकाजासाठी आवश्यक कौशल्यांचे निवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.



या प्रशिक्षणामुळे उमेदवारांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार असून, इस्त्रायलमधील नियोक्त्यांच्या अपेक्षांनुसार काम करण्यासाठी त्यांची तयारी अधिक सक्षम होईल. परदेशातील कार्यसंस्कृतीशी जलद जुळवून घेणे, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण कामकाज करणे, रोजगार टिकवून ठेवण्याची क्षमता वाढविणे तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील कौशल्ये आत्मसात करून अधिक चांगल्या करिअरच्या संधी उपलब्ध करून घेण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार आहे.या संदर्भातील शासन आदेश कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत निर्गमित करण्यात आला असून तो महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळ www.maharashtra.gov.in वर उपलब्ध आहे.

Comments
Add Comment

Mumbai Healthcare : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री  प्रतापराव जाधव यांनी दुसऱ्यांदा घेतला मुंबईतील आरोग्य व्यवस्थेचा आढावा 

आरक्षित रूग्णशय्या तसेच केंद्रीय आरोग्य योजनांचे माहितीपर फलक रूग्णालयांनी दर्शनी भागात लावण्याचे दिले

Kalina Water Cut : मुंबईच्या रक्षकांचे पाण्याविना हाल, ऐन पावसाळ्यात कलिना पोलीस क्वार्टर्समध्ये पाणीपुरवठा खंडीत

कलिना पोलीस क्वॉटर; एक दिवस विथआउट वॉटर! मुंबई : सांताक्रुझमध्ये कलिना येथील पोलीस क्वार्टर्समध्ये राहणाऱ्या

मुंबईच्या कनेक्टिव्हिटीला नवी चालना! मेट्रो, लिंक रोड आणि ट्विन टनेल प्रकल्पांना नवी गती

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते मुंबई महानगर प्रदेश

MLA Nilesh Rane : आनंदाची बातमी, गणेशभक्तांसाठी १२ सप्टेंबरला धावणार शिवसेना एक्सप्रेस

मुंबई : कोकणात राहणाऱ्यांसाठी गणेशोत्सव आणि शिमगा अर्थात होळी हे दोन अतिशय महत्त्वाचे सण. नोकरी व्यवसायाच्या

Mumbai Anti-Narcotics Cell : मुंबईत ९ कोटी ४८ लाखांचे मेथॅम्फेटामाइन जप्त; अमली पदार्थविरोधी पथकाची मोठी कारवाई

मुंबई : मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई करत मुंबई आणि ग्रेटर

Kurla Landslide : कुर्ला-राजावाडी रुग्णालयातील मृतांचा आकडा वाढला; आणखी एका तरुणाचा मृत्यू

मुंबई : कालच्या घटनेनंतर जखमी आणि मृतांची संख्या अद्ययावत करण्यात आली आहे. 13 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 1.15 वाजता