BMC HQ : महापालिका मुख्यालय इमारतीला वाळवी, कंत्राट कामांची स्थायी समितीने मागवली माहिती

संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची केली मागणी


मुंबई : मुंबई महापालिका (BMC) मुख्यालयातील दरवाज्यांना वाळवी लागल्याने याचे पडसाद महापालिका स्थायी समितीच्या बैठकीत उमटले असून तब्बल १४ वर्षांपासून या विस्तारीत इमारतींचे काम होते होते. त्या कामांमध्ये जर अशाप्रकारची निकृष्ठ दर्जाची कामे झाली असतील तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे या सर्व कामांची माहिती स्थायी समितीच्या पटलावर ठेवण्यात यावी अशाप्रकारचे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांन प्रशासनाला दिले आहे. तसेच याप्रकरणी कंत्राटदारांवर कडक कारवाई करण्यात यावी असेही निर्देश दिले आहेत.



मुंबई महापालिका मुख्यालयातील विस्तारीत इमारतीच्या पोटमाळ्यावरील दरवाजाला वाळवी लागल्याची बातमी दैनिक प्रहारने प्रकाशित केली. या बातमीची दखल घेत स्थायी समितीच्या बैठकीत भाजप नगरसेवक ऍड. मकरंद नार्वेकर यांनी हरकतीच्या मुद्दयाद्वारे या गोष्टीकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. महापालिका मुख्यालयात वाळवी लागलेली आहे. या कार्यालयाचे नुतनीकरण करताना चांगली सागाची लाकडे काढून फर्निचर प्लायवूडचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे हा प्रकार घडला आहे. त्याची याची चौकशी व्हायला हवी अशी मागणी केली. यावर शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर यांन आपल्या दालनातील टेबल योग्यप्रकारची नसल्याचे सांगितले. तर अमेय घोले यांनी किटक नाशक विभागाची ही जबाबदारी असल्याचे सांगितले. तर सईदा खान यांनी महापालिका सचिव विभागाचे जुने दस्तऐवजांना वाळवी लागत असल्याने याबाबतची कल्पना दिली होती. पण त्याकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही. तर याला टिकूड प्लायवूडचा वापर करण्यात आल्याचे तुलिफ मिरांडा यांनी सांगितले.


यावर सभागृहनेत्यांनीही याबाबत गंभीर बाब व्यक्त केले. त्यावर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी मुख्यालय इमारतीला वाळवी लागते, स्लॅब पडते असे किती घटना घडत आहे. या मुख्यालयात नगरसेवक बसत असून तिथेच जर असा प्रकार घडत असेल तर गंभीर आहे. या वास्तूचे नुतनीकरण हे २००९मध्ये हाती घेण्यात आले होते आणि याचे वाढीव कालावधीसह हे काम २०२३ पर्यंत सुरु होते. त्यामुळे हे काम कधी झाले आहे, किती वाढीव कामाचा कालावधी किती होती, किती खर्च केला आहे. ज्या शानदार कंपनीला हे काम दिले होते त्यांनी हे काम किती आहे याची विस्तृत माहिती दिली जावी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जावी असे निर्देश दिले.

Comments
Add Comment

MLA Nilesh Rane : आनंदाची बातमी, गणेशभक्तांसाठी १२ सप्टेंबरला धावणार शिवसेना एक्सप्रेस

मुंबई : कोकणात राहणाऱ्यांसाठी गणेशोत्सव आणि शिमगा अर्थात होळी हे दोन अतिशय महत्त्वाचे सण. नोकरी व्यवसायाच्या

Mumbai Anti-Narcotics Cell : मुंबईत ९ कोटी ४८ लाखांचे मेथॅम्फेटामाइन जप्त; अमली पदार्थविरोधी पथकाची मोठी कारवाई

मुंबई : मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई करत मुंबई आणि ग्रेटर

Kurla Landslide : कुर्ला-राजावाडी रुग्णालयातील मृतांचा आकडा वाढला; आणखी एका तरुणाचा मृत्यू

मुंबई : कालच्या घटनेनंतर जखमी आणि मृतांची संख्या अद्ययावत करण्यात आली आहे. 13 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 1.15 वाजता

New AC Local : २०२९-३० पर्यंत मुंबईच्या सर्व लोकल एसी होणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; द्वितीय श्रेणीचे तिकीट वाढवणार नाही मुंबई : मुंबईच्या उपनगरीय रेल्वे सेवेचे

GeM : जेमच्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राची दुहेरी बाजी; पंचायतस्तरीय खरेदीतील उत्कृष्टतेसह सर्वाधिक खरेदी मूल्यासाठी महाराष्ट्राचा गौरव

मुंबई : शासकीय ई-बाजारपेठ अर्थात जेमच्या दशकपूर्तीनिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित ‘हॉनरिंग एक्सलन्स’ पुरस्कार

One-day Seminar : ‘पडद्यावरचा सिनेमा, पडद्यामागचं गणित’ या विषयावर रंगणार एकदिवसीय परिसंवाद

महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या