One-day Seminar : ‘पडद्यावरचा सिनेमा, पडद्यामागचं गणित’ या विषयावर रंगणार एकदिवसीय परिसंवाद

महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या सयुक्तविद्यमाने उपक्रम



मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मर्या. आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पडद्यावरचा सिनेमा, पडद्यामागचं गणित’ (समजूया मराठी चित्रपटाचे अर्थकारण) या महत्त्वपूर्ण विषयावर मंगळवार, दिनांक १८ ऑगस्ट २०२६ , सकाळी १०:०० ते संध्याकाळी ६:०० पर्यंत मिनी थिएटर, तिसरा मजला, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई येथे एकदिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.


राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाली हा उपक्रम संपन्न होणार आहे. चित्रपट निर्मितीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या या परिसंवादामध्ये चित्रपट क्षेत्रातील दिग्गज मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये अशोक राणे (ज्येष्ठ चित्रपट समीक्षक व अभ्यासक), महेश मांजरेकर (प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेते व निर्माते), मेघराज राजेभोसले (अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ), राजेश मापुसकर (राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक व लेखक)आदी समावेश आहे.



मराठी चित्रपटसृष्टीची आर्थिक गणिते, वितरण, आणि पडद्यामागचे व्यवस्थापन समजून घेण्यासाठी चित्रपटप्रेमी, विद्यार्थी व व्यावसायिकांनी या परिसंवादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाने केले आहे.

Comments
Add Comment

New AC Local : २०२९-३० पर्यंत मुंबईच्या सर्व लोकल एसी होणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; द्वितीय श्रेणीचे तिकीट वाढवणार नाही मुंबई : मुंबईच्या उपनगरीय रेल्वे सेवेचे

GeM : जेमच्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राची दुहेरी बाजी; पंचायतस्तरीय खरेदीतील उत्कृष्टतेसह सर्वाधिक खरेदी मूल्यासाठी महाराष्ट्राचा गौरव

मुंबई : शासकीय ई-बाजारपेठ अर्थात जेमच्या दशकपूर्तीनिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित ‘हॉनरिंग एक्सलन्स’ पुरस्कार

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य शासकीय सोहळ्याची मंत्रालयात रंगीत तालीम

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १५ ऑगस्टला होणार ध्वजारोहण मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या

Uday Samant : चाकणमधील उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी १६ ऑगस्टला प्रत्यक्ष बैठक घेणार; मंत्री उदय सामंत

मुंबई : चाकण औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये विविध

Independence Day 2026 : महाराष्ट्रात स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष! जाणून घ्या मुख्यमंत्र्यांपासून पालकमंत्र्यांपर्यंत कुठे कोण फडकवणार तिरंगा?

मुंबई : भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी देशभर उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

Pratap Sarnaik : एसटीच्या NCMC स्मार्ट कार्डला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली माहिती

१ कोटींहून अधिक प्रवाशांची नोंदणी; ६४ लाखांहून अधिक कार्डे