Nashik : ३५ लाखांची नोकरी सोडली अन् नाशिकला आली तरुणी; कुटुंब, आरोग्य आणि तणावमुक्त जीवन, सान्याची कहाणी काय शिकवते ?

Nashik : पैसा कमवण्यासाठी लोक मोठी मेहनत करतात. कधी कधी तर एकाच वेळी दोन ते तीन नोकऱ्या सांभाळतात. पैसा कुठून येईल यासाठी नेहमीच धडपड करतात. अर्थात जेवढ्या मोठ्या पगाराची नोकरी असते तेवढ्याच मोठ्या मग जबाबदाऱ्याही स्वीकाराव्या लागतात आणि जोडीला ताणतणावही असतो. साहजिकच मग अशावेळेस कुटुंब, आरोग्य या गोष्टींकडे दुर्लक्ष होते. मात्र मुंबईत वर्षाला ३० ते ३५ लाख रुपयांचा पगार जगप्रसिद्ध ॲमेझॉन मध्ये नोकरी तरीही सान्या देशमुख या तरुणीने भरगच्च पगाराची नोकरी सोडून नाशिकला स्थलांतर केले.



३५ लाखांची नोकरी सोडली अन् नाशिकला आली सान्या


सान्या देशमुख या ३१ वर्षांच्या असून डिजिटल मार्केटिंग क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. त्यांनी बाइटडान्स, इनमोबी आणि ॲमेझॉन सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम केले आहे. ॲमेझॉन मध्ये त्यांचा वार्षिक पगार तर ३५ लाख रुपये होता. त्यांच्या पतीचाही जवळपास तेवढाच पगार असल्याने दोघांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न ६० ते ६५ लाख रुपये होते. मात्र, एवढे उत्पन्न असूनही मुंबईतील धावपळ, सततचा प्रवास आणि कॉर्पोरेट ताण यामुळे त्यांचे वैयक्तिक आयुष्य तणावात असायचे. त्यांचे आई-वडील औरंगाबादमध्ये, तर पती नाशिकमध्ये राहत होते.


ॲमेझॉनच्या हायब्रीड वर्क पॉलिसीनंतर आठवड्यातील ऑफिसचे दिवस वाढत गेले आणि सतत मुंबई-नाशिक प्रवास करावा लागत होता. ऑफिसच्या कामकाजामुळे लग्नानंतर कुटुंबाला वेळ देणे कठीण झाले होते. सण-उत्सव, कौटुंबिक कार्यक्रम यासाठी प्रत्येक वेळेस उपस्थित राहणे शक्य नसायचे. याशिवाय मुंबईतील राहणीमानाचाही खर्च मोठा होता. ऑफिसजवळील एका फ्लॅटसाठी त्यांना दरमहा तब्बल ६५ हजार रुपये भाडे द्यावे लागत होते. एवढं कमावून , धावपळ करून हातात शिल्लक काय राहतंय असा विचार एक दिवस त्यांच्या मनात आला.



एसआयपी, पीपीएफ आणि इतर गुंतवणुकींवर भर


मोठा पगार असूनही बचत कमी होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले अन अखेर त्यांनी मोठा निर्णय घेतला आणि नाशिकला स्थलांतर केले. आज त्या एका भागीदारासोबत डिजिटल मार्केटिंगचा स्वतःचा व्यवसाय चालवतात. दोघांचे मिळून वार्षिक उत्पन्न आता सुमारे ४० लाख रुपये आहे. आधीपेक्षा उत्पन्न कमी झाले असले तरी खर्चही मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. भाडे वाचले, जीवनशैलीचा खर्च कमी झाला आणि विशेष म्हणजे बचत वाढली. सान्या यांनी आता एसआयपी, पीपीएफ आणि इतर गुंतवणुकींवर भर दिला असून आर्थिक नियोजनही अधिक सक्षम केले आहे. आरोग्याच्या बाबतीतही हा निर्णय फायदेशीर ठरल्याचं त्या आवर्जून सांगतात.



रविवारी सोमवारची भीती वाटत नाही


PCOS चा त्रास असलेल्या सान्या आता नियमित जिमला जातात, पिकलबॉल खेळतात आणि स्वतःसाठी वेळ काढतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना आता रविवारी सोमवारची भीती वाटत नाही. कामाचा ताणही खूपच कमी झाला आहे. कॉर्पोरेट जीवनातील परफॉर्मन्स रिव्ह्यू, प्रमोशनची चिंता आणि कर्मचारी कपातीच्या भीतीमुळे त्या मानसिकदृष्ट्या खचल्या होत्या. त्यांनी सांगितले की, काही वेळा त्या ऑफिसच्या वॉशरूममध्ये जाऊन रडतही असत. मात्र, नाशिकमध्ये आल्यापासून त्यांना कुटुंबासोबत वेळ घालवता येतो, स्वतःच्या गतीने काम करता येते आणि मानसिक शांतताही मिळाली आहे.


सान्या देशमुख यांची ही कहाणी सर्वांसाठी एक महत्त्वाचा आणि चांगला संदेश देते, मोठा पगार म्हणजेच समाधानी आणि आनंदी आयुष्य असे नेहमीच नसते. आर्थिक नियोजन, कुटुंब, आरोग्य आणि मानसिक शांतता यांनाही तितकेच महत्त्व आहे.

Comments
Add Comment

Bike Rider Riddhi Thakkar: बाईक राइडिंगसाठी गेली, पण काळाने घात केला; मुंबईच्या 24 वर्षीय तरुणीचा भीषण अपघाती मृत्यू

मुंबई :  मुंबईतील (Mumbai) कांदिवली पश्चिम परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय रिद्धी ठक्करचा छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यात

Bharat Gogawale : नाशिकला गिरीश महाजन आणि रायगडमध्ये भरत गोगावले करणार ध्वजारोहण

मुंबई : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या शासकीय समारंभासाठी राज्य शासनाकडून जिल्हा निहाय ध्वजारोहण

Weather Update : महाराष्ट्रातील विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

मुंबई : राज्यात श्रावणाचं आगमन धो धो पावसानं होणार आहे. महाराष्ट्रातील विविध भागांत गुरुवार १३ ते शनिवार १५ ऑगस्ट

NEET Students Protest : नीट विद्यार्थी आंदोलनावर संसदेत चर्चेचे गृहमंत्री अमित शहा यांचे आव्हान

नवी दिल्ली : जंतरमंतर येथे झालेल्या विद्यार्थी आंदोलनावर आणि नीट पेपर फुटीप्रकरणावरून संसदेत आक्रमक झालेल्या

PM Narendra Modi : शॉर्टकटचा मोह टाळा, मेहनत आणि संघर्षाचा मार्ग निवडा, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जेन-झी पिढीला मोलाचा सल्ला

नवी दिल्ली : सोशल मीडिया, रील्स आणि इन्फ्लुएन्सर्सच्या या आधुनिक युगात तरुणांनी क्षणिक यशाच्या मागे न धावता

CJP : 'सीजेपी'च्या समर्थनार्थ काढलेल्या मोर्चातील आंदोलकांवरील गुन्हे मागे

मुंबई : राज्यातील राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांवर दाखल झालेले खटले मागे