Nashik : नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून पाण्याच्या विसर्गात वाढ; गोदावरीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Nashik : नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर नांदूर मध्यमेश्वर (Nandur Madhmeshwar) बंधाऱ्यातून गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे. बुधवारी (२२ जुलै) दुपारी १ वाजल्यापासून बंधाऱ्यातून ४,७६९ क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन जलसंपदा विभागाने (Water Resources Department)  केले आहे.



विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता


जलसंपदा विभागाच्या (Water Resources Department) पूर नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी ३,२२८ क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू होता. मात्र दुपारी १ वाजता त्यात १,५४१ क्युसेक्सने वाढ करून एकूण विसर्ग ४,७६९ क्युसेक्स करण्यात आला आहे. पावसाचे प्रमाण लक्षात घेता येत्या काही तासांत विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.



गोदावरीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा


गोदावरी नदीकाठच्या तसेच नदीपात्रालगतच्या सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात उतरू नये, तसेच नदीकाठावर ठेवलेले साहित्य व जनावरे तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. संबंधित प्रशासकीय विभागांना आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Comments
Add Comment

Santacruz Chembur Link Road Phase 2 : सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज खुला; वाकोला-बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स प्रवास होणार अधिक वेगवान

मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज,

Radhakrishna Vikhe Patil : धरण क्षेत्रात मत्स्य व्यवसाय विकासासाठी सर्वेक्षण करणार

मुंबई : जलसंपदा विभाग आता मत्स्य व्यवसाय विकास विभागाशी सहक

Madhuri Dixit : कोण होणार करोडपतीच्या एका सीझनसाठी माधुरी घेणार इतके मानधन...

मुंबई : टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय आणि रंजक मनाला जाणारा क्विज शो म्हणजे 'कौन बनेगा करोडपती' नेहमीच

Supriya Sule and Vinod Tawde : सुप्रिया सुळे आणि विनोद तावडे बैठक सोडून अचानक निघाले, एका कारमधून गेले; चर्चेला उधाण

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच एक

Bike Rider Riddhi Thakkar: बाईक राइडिंगसाठी गेली, पण काळाने घात केला; मुंबईच्या 24 वर्षीय तरुणीचा भीषण अपघाती मृत्यू

मुंबई :  मुंबईतील (Mumbai) कांदिवली पश्चिम परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय रिद्धी ठक्करचा छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यात

Bharat Gogawale : नाशिकला गिरीश महाजन आणि रायगडमध्ये भरत गोगावले करणार ध्वजारोहण

मुंबई : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या शासकीय समारंभासाठी राज्य शासनाकडून जिल्हा निहाय ध्वजारोहण