Accident News : प्रसिद्ध अभिनेत्रीचा कार अपघातात मृत्यू, वयाच्या १८ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

Accident News : एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. भीषण अपघातात प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्री 'केली हॉटल' हीच अपघातात मृत्यू झाला आहे. केलीने आपल्या प्रतिभेने जगभरातील प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले होते. तिच्या अचानक जाण्याने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.



केली हॉटलचा कार अपघातात मृत्यू


केली हॉटलचा (Kelly Hotel) मॅलँड इथं कार अपघातात मृत्यू झाला आहे. तिच्या कुटुंबाने आणि स्कूलने तिच्या निधनाची बातमी दिली आहे. केलीचे वडील जोशुआ हॉटल यांनी 'अमेरिकन साईन लँग्वेज' (ASL) मध्ये फेसबुक लाईव्हद्वारे तिच्या निधनाची माहिती दिली. फ्रेडरिक काउंटी शेरीफ कार्यालयाच्या माहितीनुसार, पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. गाडी अचानक रस्त्यावरून बाजूला गेली आणि एका पुलाला धडकली. अधिकाऱ्यांच्या मते, गाडीचा अतिवेग हे या अपघाताचे एक कारण होते असे सांगितले जात आहे. गाडी चालवणाऱ्या 19 वर्षीय तरुणाला किरकोळ दुखापत झाली.



'गॉडझिला एक्स काँग: द न्यू एम्पायर' या चित्रपटात काम


केली हॉटलने 2021 मधील 'गॉडझिला एक्स काँग: द न्यू एम्पायर' (Godzilla x Kong: The New Empire) या चित्रपटात जियाची भूमिका साकारली होती. जिया ही एक मूक-बधीर अनाथ मुलगी होती, जिचं 'किंग काँग'सोबत एक अतिशय खास नातं दाखवण्यात आलं होते. त्यानंतर ती 2024 मध्ये आलेल्या 'गॉडझिला एक्स काँग: द न्यू एम्पायर' (Godzilla x Kong: The New Empire) मध्येही याच भूमिकेत दिसली होती.



चाहत्यांना मोठा धक्का


या चित्रपटातील तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी तिला 'सॅटर्न अवॉर्ड्स'मध्ये 'बेस्ट परफॉर्मन्स बाय अ यंगर ॲक्टर' ('Best Performance by a Younger Actor') या श्रेणीत नामांकन मिळालं होतं. 2021 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत केलीने सांगितलं होतं की, तिच्यासाठी संवाद लक्षात ठेवणं कठीण नव्हतं, पण अमेरिकन साईन लँग्वेजनुसार संवादांना जुळवून घेणं हे खूप आव्हानात्मक होतं. दरम्यान वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी केलीने आपल्या प्रतिभेने जगभरातील प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले होते. तिच्या अचानक जाण्याने हॉलीवूड आणि तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

Comments
Add Comment

Madhuri Dixit : कोण होणार करोडपतीच्या एका सीझनसाठी माधुरी घेणार इतके मानधन...

मुंबई : टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय आणि रंजक मनाला जाणारा क्विज शो म्हणजे 'कौन बनेगा करोडपती' नेहमीच

Dilip Kumar : ७८ वर्षांपूर्वी गाजलेलं बॉलिवूडचं देशभक्तीपर गाणं! मोहम्मद रफींचा आवाज, दिलीप कुमार यांच्यामुळे अजरामर झालेला इतिहास

मुंबई : स्वातंत्र्यदिन जवळ आला की देशभक्तीपर गाण्यांनी वातावरण भारून जातं. ‘ऐ मेरे वतन के लोगों’, ‘मेरे देश की

Swara Bhasker News : स्वरा भास्करचा ट्रोलर्सवर जोरदार हल्लाबोल! 'त्या' एका वाक्याने बंद केली नेटकऱ्यांची बोलती

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. फहाद अहमद यांच्याशी

Rakesh Bedi : “भेसळ करणाऱ्यांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करा!”; ‘धुरंधर’ फेम राकेश बेदींची संतप्त मागणी, व्हिडिओ व्हायरल

मुंबई : आर्थिक फायद्यासाठी अन्न, पेये आणि मद्यामध्ये भेसळ करून लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली

Ajay Devgan : बाॅलिवूडचा सिंघम 'अजय देवगण' लवरकच झळकणार सूत्रसंचालकाच्या भूमिकेत

मुंबई : बॉलिवूडचा सिंघम म्हणून ओळखला जाणारा अभिनेता 'अजय देवगण' आता सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. अजय

Madhuri Dixit : लवकरच...! सोनी मराठी वाहिनीवरील 'कोण होणार करोडपती' चे सूत्रसंचालन करणार अभिनेत्री माधुरी दीक्षित

मुंबई : मराठी मनोरंजनविश्वात एका नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. सोनी मराठी वाहिनी आणि Sony LIV प्रेक्षकांचा ज्ञानावर