Devendra Fadnavis's Birthday : वाढदिवस समाजसेवेला अर्पण! मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजप प्रदेश कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त (Devendra Fadnavis's Birthday) भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयात बुधवारी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत, त्यांचा वाढदिवस केवळ समाजोपयोगी उपक्रमांद्वारे साजरा करण्याचा आदर्श कौतुकास्पद असल्याचे सांगितले.


राहुल नार्वेकर म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis's Birthday) यांनी वाढदिवसानिमित्त पोस्टर, बॅनर किंवा उत्सव साजरे करण्याऐवजी समाजासाठी उपयुक्त उपक्रम राबवण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या विचारातूनच राज्यभरात रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे आणि विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.



यावेळी नार्वेकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis's Birthday) यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांचाही उल्लेख केला. शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी आजपासून सुरू होत असून, लाखो शेतकऱ्यांना त्याचा थेट लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.


या रक्तदान शिबिरात आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी स्वतः रक्तदान करून कार्यकर्त्यांसमोर आदर्श निर्माण केला. तसेच भाजपा प्रदेश कार्यालय प्रभारी रविंद्र अनासपुरे, प्रदेश कार्यालय सहसचिव भरत राऊत, सदाशिव चौधरी यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. (Devendra Fadnavis's Birthday)


भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात कार्यालयातील कर्मचारी, पदाधिकारी तसेच राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत रक्तदान केले. रक्तदानासारख्या जीवनदायी उपक्रमातून समाजाप्रती आपली बांधिलकी व्यक्त करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. राज्याच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील, अशा शब्दांत त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. (Devendra Fadnavis's Birthday)



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त (Devendra Fadnavis's Birthday) राज्यभरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, रक्तदान, आरोग्य सेवा आणि जनहिताच्या कार्यक्रमांमधून वाढदिवस साजरा करण्याची भाजपची परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Santacruz Chembur Link Road Phase 2 : सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज खुला; वाकोला-बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स प्रवास होणार अधिक वेगवान

मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज,

Radhakrishna Vikhe Patil : धरण क्षेत्रात मत्स्य व्यवसाय विकासासाठी सर्वेक्षण करणार

मुंबई : जलसंपदा विभाग आता मत्स्य व्यवसाय विकास विभागाशी सहक

Bike Rider Riddhi Thakkar: बाईक राइडिंगसाठी गेली, पण काळाने घात केला; मुंबईच्या 24 वर्षीय तरुणीचा भीषण अपघाती मृत्यू

मुंबई :  मुंबईतील (Mumbai) कांदिवली पश्चिम परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय रिद्धी ठक्करचा छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यात

Weather Update : महाराष्ट्रातील विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

मुंबई : राज्यात श्रावणाचं आगमन धो धो पावसानं होणार आहे. महाराष्ट्रातील विविध भागांत गुरुवार १३ ते शनिवार १५ ऑगस्ट

Nitesh Rane : मच्छीमार बांधवांसाठी आधुनिक व सर्व सुविधांयुक्त वास्तू उभारणार – मंत्री नितेश राणे

· मरोळ मच्छी मार्केटच्या विकासकामांना गती देणार मुंबई, दि. 12: मुंबईतील मच्छीमार बांधवांसाठी महत्त्वपूर्ण

Water Metro : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी; वॉटर मेट्रोसह विविध प्रकल्पांना मिळणार गती

मुंबई : महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने अनेक