Ashish Shelar : दशावतार कलेला राजाश्रय दिल्याबद्दल कलाकारांनी घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

- आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे न्याय मिळाल्याची भावना


मुंबई : राज्याश्रयापासून वर्षानुवर्षे दूर राहिलेल्या कोकणच्या समृद्ध ‘दशावतार’ लोककलेला आणि कलाकारांना अखेर न्याय मिळाला आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडलेल्या मागणीची दखल घेत सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी दशावतार कलाकारांसाठी शासकीय अनुदान जाहीर केले आहे. या निर्णयाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 'दशावतार हितवर्धक नाट्य संस्था, मुंबई'चे पदाधिकारी आणि कलाकारांनी बुधवारी मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले.


कोकणची पारंपरिक कला जिवंत ठेवण्यासाठी कलाकारांनी अतोनात मेहनत घेतली असून, उपाशीपोटी राहून व कुटुंबाकडे दुर्लक्ष करत हिंदू संस्कृतीचे रक्षण केले. मात्र, या कलाकारांना राजाश्रय मिळत नव्हता. पावसाळी अधिवेशनात कुडाळ-मालवणचे शिवसेना आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी या कलाकारांची व्यथा आणि त्यांच्या मागण्या सभागृहात अत्यंत आक्रमकपणे मांडल्या होत्या. आमदार राणे यांच्या या पाठपुराव्यामुळेच सांस्कृतिक कार्य विभागाने तातडीने पावले उचलत कलाकारांसाठी अनुदानाची घोषणा केली.



नगरसेवक सुषम सावंत यांच्या पुढाकारातून आणि सुहास चव्हाण यांच्या प्रयत्नातून ही भेट घडवून आणण्यात आली. मुंबईत वास्तव्यास असलेल्या १२ नोंदणीकृत दशावतार (Dashawatar Artist) नाट्य मंडळांचे प्रतिनिधित्व ही संस्था करते. या भेटीदरम्यान सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मुंबईतील कलाकारांना आणखी एक दिलासा दिला. सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतार कलाकारांची अधिकृत नोंदणी प्रक्रिया सुरू असून, ती पूर्ण होताच मुंबईतील कलाकारांची नोंदणीही तातडीने सुरू केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.



या प्रसंगी दशावतार हितवर्धक नाट्य संस्थेचे अध्यक्ष आशिष गावडे, खजिनदार रतन परब, तसेच राजाराम धुरी, उमेश धुरी, शंकर मेस्त्री, तुकाराम नाईक, दिगंबर लाड, सुधीर धुरी, नामदेव घाटकर यांच्यासह मुंबईतील अनेक ज्येष्ठ दशावतार कलाकार आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Add Comment

Santacruz Chembur Link Road Phase 2 : सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज खुला; वाकोला-बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स प्रवास होणार अधिक वेगवान

मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज,

Radhakrishna Vikhe Patil : धरण क्षेत्रात मत्स्य व्यवसाय विकासासाठी सर्वेक्षण करणार

मुंबई : जलसंपदा विभाग आता मत्स्य व्यवसाय विकास विभागाशी सहक

Bike Rider Riddhi Thakkar: बाईक राइडिंगसाठी गेली, पण काळाने घात केला; मुंबईच्या 24 वर्षीय तरुणीचा भीषण अपघाती मृत्यू

मुंबई :  मुंबईतील (Mumbai) कांदिवली पश्चिम परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय रिद्धी ठक्करचा छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यात

Weather Update : महाराष्ट्रातील विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

मुंबई : राज्यात श्रावणाचं आगमन धो धो पावसानं होणार आहे. महाराष्ट्रातील विविध भागांत गुरुवार १३ ते शनिवार १५ ऑगस्ट

Nitesh Rane : मच्छीमार बांधवांसाठी आधुनिक व सर्व सुविधांयुक्त वास्तू उभारणार – मंत्री नितेश राणे

· मरोळ मच्छी मार्केटच्या विकासकामांना गती देणार मुंबई, दि. 12: मुंबईतील मच्छीमार बांधवांसाठी महत्त्वपूर्ण

Water Metro : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी; वॉटर मेट्रोसह विविध प्रकल्पांना मिळणार गती

मुंबई : महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने अनेक