Ashish Shelar : गोरेगाव 'फिल्म सिटी'च्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

पुनर्विकास आराखड्यासह चित्रपट धोरणाचा मसुदा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांना सादर


मुंबई(Mumbai) : गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीचा (film city) सर्वांगीण पुनर्विकास आणि महाराष्ट्राला जागतिक दर्जाचे चित्रपट निर्मिती केंद्र बनवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे. चित्रनगरीच्या प्राथमिक पुनर्विकासाचा आराखडा आणि राज्याच्या नवीन चित्रपट धोरणाचा मसुदा चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांनी बुधवारी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्याकडे सादर केला. या नव्या आराखड्यामुळे रखडलेल्या पुनर्विकासाला गती मिळून चित्रनगरीच्या कायापालटाचा मार्ग सुकर झाला आहे.(Goregaon)



मंत्रालयात आयोजित या विशेष बैठकीला सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, उपसचिव महेश वाव्हळ, सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, वित्तीय सल्लागार चित्रलेखा खातू आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्यामध्ये चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी आणि डिजिटल कंटेंट निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी या पुनर्विकास आराखड्यात अत्याधुनिक स्टुडिओ संकुल, पोस्ट-प्रॉडक्शन सुविधा, व्हर्च्युअल प्रॉडक्शन स्टुडिओ, आधुनिक साउंड स्टेजेस, फिल्म टेक्नॉलॉजी सेंटर आणि पर्यटनाभिमुख सुविधांची आखणी करण्यात आली आहे.




वैशिष्ट्ये काय?
- महाराष्ट्राला देशातील सर्वाधिक चित्रपटस्नेही राज्य बनवण्याच्या उद्देशाने हे नवीन धोरण आखण्यात आले आहे. हे मसुदे स्वीकारताना सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार म्हणाले की, या आराखड्याचा सविस्तर अभ्यास करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच धोरणाला अंतिम स्वरूप देऊन मंजुरी दिली जाईल.
- या प्रकल्पामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाची निर्मिती केंद्रे उभारली जाऊन राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक, रोजगारनिर्मिती आणि चित्रपट पर्यटनाल मोठी गती मिळेल, असा विश्वास शेलार यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

Santacruz Chembur Link Road Phase 2 : सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज खुला; वाकोला-बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स प्रवास होणार अधिक वेगवान

मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज,

Radhakrishna Vikhe Patil : धरण क्षेत्रात मत्स्य व्यवसाय विकासासाठी सर्वेक्षण करणार

मुंबई : जलसंपदा विभाग आता मत्स्य व्यवसाय विकास विभागाशी सहक

Bike Rider Riddhi Thakkar: बाईक राइडिंगसाठी गेली, पण काळाने घात केला; मुंबईच्या 24 वर्षीय तरुणीचा भीषण अपघाती मृत्यू

मुंबई :  मुंबईतील (Mumbai) कांदिवली पश्चिम परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय रिद्धी ठक्करचा छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यात

Weather Update : महाराष्ट्रातील विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

मुंबई : राज्यात श्रावणाचं आगमन धो धो पावसानं होणार आहे. महाराष्ट्रातील विविध भागांत गुरुवार १३ ते शनिवार १५ ऑगस्ट

Nitesh Rane : मच्छीमार बांधवांसाठी आधुनिक व सर्व सुविधांयुक्त वास्तू उभारणार – मंत्री नितेश राणे

· मरोळ मच्छी मार्केटच्या विकासकामांना गती देणार मुंबई, दि. 12: मुंबईतील मच्छीमार बांधवांसाठी महत्त्वपूर्ण

Water Metro : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी; वॉटर मेट्रोसह विविध प्रकल्पांना मिळणार गती

मुंबई : महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने अनेक