Monsoon Update : देशात पावसाची ३२ टक्के तूट, अनेक ठिकाणी खरिपाची पेरणी संकटात

नवी दिल्ली : जुलै महिना संपायला दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधी उरला आहे. अद्याप देशात अपेक्षेप्रमाणे पाऊस पडलेला नाही. ताज्या आकडेवारीनुसार देशात पावसाची ३२ टक्के तूट आहे. अपुऱ्या पावसामुळे खरिपाची शेती संकटात सापडली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत खरीप पिकांच्या पेरणीचे क्षेत्र ४.२ दशलक्ष हेक्टरने कमी झाले आहे. यामुळे यंदाच्या अन्न उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे.



पावसाअभावी शेतकरी आणि सरकार चिंतेत आहे. दरवर्षी जून - जुलै दरम्यान देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये खरिपातील शेतीची कामं होतात. पेरणी आणि नंतरची शेतीची कामं मोठ्या प्रमाणावर केली जातात. पण यंदा अपेक्षेप्रमाणे पाऊस पडलेला नाही. याचा प्रतिकूल परिणाम शेतीवर झाला आहे. पिण्याच्या पाण्याच्या साठ्यावरही प्रतिकूल परिणाम झाला आहे. यामुळे यंदाच्या वर्षीच्या पाण्याच्या नियोजनाच्या बाबतीत प्रशासकीय यंत्रणा चिंतेत आहे.



ताज्या आकडेवारीनुसार दक्षिण द्वीपकल्पीय भारतात सरासरीपेक्षा २६ टक्के, वायव्य भारतात १८ टक्के, आणि मध्य भारतात १३ टक्के पावसाची तूट आहे. पावसाच्या तुटीचा फटका शेतीच्या कामांवर झाला आहे.


केंद्रीय कृषी मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार १७ जुलै २०२६ पर्यंत देशभरात खरीप हंगामात महत्त्वाच्या पिकांची एकूण ६५८.१९ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत ४२.२८ लाख हेक्टरने कमी आहे. मागच्या वर्षी म्हणजेच २०२५ मध्ये १७ जुलैपर्यंत देशात खरीप पिकांची एकूण ७००.४७ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती.


यंदा कडधान्य पिकाच्या पेरणी क्षेत्रात सर्वाधिक घट झाली आहे. यंदा जेमतेम १२.२९ लाख हेक्टर शेतात कडधान्यांची पेरणी झाली आहे. तेलबिया पिकांखालील क्षेत्रात ८.६३ लाख हेक्टर घट झाली आहे. भाताच्या पेरणीतही १.४१ लाख हेक्टरने घट झाली आहे.


वेधशाळेच्या ताज्या अहवालानुसार मान्सून पुढी चार दिवस वायव्य आणि ईशान्य भारतात सक्रीय असेल. पण पुढील सात दिवस पश्चिम-मध्य आणि दक्षिण द्वीपकल्पीय भारताचा पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे. जर पश्चिम-मध्य आणि दक्षिण द्वीपकल्पीय भारतामध्ये, जिथे आधीच मान्सूनची कमतरता आहे, पावसाची परिस्थिती सुधारली नाही, तर शेती मोठ्या संकटात सापडण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

'ATAGS' artillery gun is ready : १५ सेकंदात ३ हल्ले आणि ४८ किमीचा अचूक पल्ला; चीन-अमेरिकाही चकित

नवी दिल्ली: रणांगणावर भारताच्या सं

Delhi-Pune SpiceJet Flight : दिल्ली - पुणे विमानात तांत्रिक बिघाड; प्रवाशांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!

नवी दिल्ली : दिल्लीहून पुण्याकडे येणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानात उड्डाणापूर्वी तांत्रिक बिघाड झाल्याची घटना

Actor Prakash Raj : अभिनेते प्रकाश राज यांचा SIR वरचा दावा खोटा? निवडणूक आयोगाने दाखवला BLOचा व्हिडिओ; म्हणाले "जुन्या पत्त्यावर..."

नवी दिल्ली : अभिनेता प्रकाश राज (Actor Prakash Raj) आपल्या वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत असतात. आता कर्नाटकमधील Special Intensive Revision (SIR)

Jharkhand : पोलिसांच्या दडपशाहीविरोधात झारखंड बंद

रांची : झारखंडमध्ये स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमिततेविरोधात निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या

Arunachal Pradesh : "अरुणाचल हा भारताचा अविभाज्य भाग", चीनच्या आक्षेपाला भारताचे चोख प्रत्युत्तर

नवी दिल्ली : भारताने गेल्या आठवड्यात आपल्या अधिकृत नकाशावर अरुणाचल प्रदेशातील २७ ठिकाणे आणि भौगोलिक

Vande Mataram Law : ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीने ऐतिहासिक विधेयकाचे कायद्यात रूपांतर

नवी दिल्ली: राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’चा अवमान करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई केली जाणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी