Nashik : नाशिक शहरातील पेलिकन पार्क येथे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या विकासाभिमुख कार्याला कायमस्वरूपी अभिवादन करण्यासाठी त्यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित विविध समाजोपयोगी कार्यक्रमांमध्ये ते बोलत होते.
ठाणे : ठाण्यातील एका लॉजमध्ये तरुणीची हत्या (Murder) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फेसबुकवरून ओळख झालेल्या तरुण-तरुणीचे गेल्या 4 वर्षांपासून ...
पेलिकन पार्कमध्ये उभारणार स्मारक
पेलिकन पार्क येथे आयोजित कार्यक्रमात दिव्यांग नागरिकांना सहाय्यक साहित्याचे वाटप, ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप तसेच रक्तदान शिबिराचे उद्घाटन मंत्री छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विकासदृष्टीचा वारसा जपण्याचा संकल्प व्यक्त केला. मंत्री भुजबळ म्हणाले की, स्वर्गीय अजितदादा पवार यांनी शहर, ग्रामीण भाग आणि राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी दूरदृष्टीने काम केले. विकास हा केवळ पायाभूत सुविधांचा नसून तो लोककेंद्रित असावा, हा त्यांचा कायमचा दृष्टिकोन होता.
लोकहिताला प्राधान्य देत त्यांनी राबविलेल्या विकासकामांमुळे समाजजीवनावर त्यांनी अमिट ठसा उमटविला आहे. त्यांच्या विचारांची आणि विकासदृष्टीची प्रेरणा भावी पिढ्यांना मिळावी, यासाठी पेलिकन पार्क येथे त्यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. समाजातील गरजू घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविणे, सामाजिक उपक्रम राबविणे आणि लोकसेवेची भावना जपणे हीच स्वर्गीय अजितदादा पवार यांना खरी आदरांजली ठरेल, असेही भुजबळ यांनी यावेळी नमूद केले. तसेच प्रत्येक नागरिकाने आपल्या गावाच्या, शहराच्या आणि समाजाच्या विकासासाठी योगदान दिल्यास राज्याच्या प्रगतीला अधिक गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुंबई : यंदा कॉमनवेल्थ गेम्स २०२६ संक्षिप्तपणे खेळली जाणार आहे. भारताने १२६ सदस्यीयांची यादी जाहीर केली आहे. यात ॲथलेटिक्स, बॉक्सिंग, ज्युडो, ...
'शिस्त, निष्ठा आणि लोकहितासाठी झटणारे नेतृत्व'
कार्यक्रमात पोलीस आयुक्त डॉ. संदीप कर्णिक यांनीही स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या कार्याची आठवण सांगितली. पोलीस सेवेत कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्याचे सांगत त्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. कर्णिक म्हणाले की, अजितदादा पवार यांच्या कामामध्ये शिस्त, प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रमाला सर्वोच्च स्थान होते. सार्वजनिक जीवनातील मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळतानाही त्यांनी विकासकामांसाठी सातत्याने मेहनत घेतली. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत लोकांच्या प्रश्नांसाठी धावपळ करणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व आजही प्रेरणादायी आहे. सहकाऱ्यांशी त्यांनी नेहमीच आपुलकीने वागणूक दिली, त्यामुळे प्रत्येकाच्या मनात त्यांच्याविषयी विशेष आदर होता, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.






