Rajvardhini Chavan: वयाच्या अवघ्या ३ वर्षे ४ महिन्यांत ऐतिहासिक पराक्रम; बाल दुर्गप्रेमी राजवर्धिनी चव्हाणने सर केले तब्बल १०० गड-कोट

पुणे: सह्याद्रीच्या कडेकपारीत आणि दुर्गम वाटांवर वयाच्या अवघ्या ३ वर्षे आणि ४ महिन्यांच्या बालवयात एका चिमुरडीने इतिहास रचला आहे. बाल दुर्गप्रेमी राजवर्धिनी प्रसाद चव्हाण हिने सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये तब्बल १०० गड-कोट सर करण्याचा आपला अद्वितीय संकल्प अत्यंत यशस्वीपणे पूर्ण केला आहे. या प्रेरणादायी आणि ऐतिहासिक कामगिरीनिमित्त पुण्याच्या ऐतिहासिक रायरेश्वर किल्ल्यावर अत्यंत भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात 'संकल्पसिद्धी सोहळा' पार पडला.



चिमुकल्या पावलांनी पालथा घातला सह्याद्री


स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पवित्र मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली, त्याच ऐतिहासिक रायरेश्वर मंदिरात श्री रायरेश्वराच्या अभिषेकाने आणि शिवप्रेमींच्या उपस्थितीत या विशेष सोहळ्याची सांगता झाली. वयाच्या अवघ्या दहाव्या महिन्यात किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन राजवर्धिनीने आपल्या गिर्यारोहण प्रवासाचा श्रीगणेशा केला होता.


त्यानंतर सिंहगड, शिवनेरी, रायगड, राजगड, तोरणा, प्रतापगड, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग आणि साल्हेर यांसह महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाचे व ऐतिहासिक गड-कोट तिने आपल्या छोट्या पावलांनी सर केले.



विश्वविक्रमांची नोंद आणि सर्वत्र कौतुक


अवघ्या तीन वर्षे आणि चार महिन्यांच्या बालवयात १०० गडांचा टप्पा पूर्ण करत राजवर्धिनीने एक नवा आदर्श निर्माण केला आहे. तिच्या या अद्वितीय कार्याची दखल घेत 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स' मध्ये दोन वेळा तसेच 'इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स' मध्ये तिच्या या विश्वविक्रमाची नोंद झाली आहे. या चिमुरडीच्या देदिप्यमान यशाने संपूर्ण महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली असून, तिचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Comments
Add Comment

Mumbai Port Crane Accident : मुंबई पोर्टवर कार्गो उचलताना मोठी दुर्घटना; क्रेनला आग, दोन ऑपरेटर जखमी

मुंबई : मुंबई पोर्ट परिसरातील बीपीएस (BPS) पोर्ट येथे कार्गो उचलण्याच्या कामादरम्यान रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी

Pune Ganeshotsav : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ध्वनिप्रदूषण आणि

Ganeshotsav 2026 Sound Restrictions : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर होणार थेट कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी महत्त्वाच्या

Samruddhi Expressway Traffic Diversion : टाकळीवाडीत गॅस वाहिनीला गळती; खबरदारी म्हणून समृद्धी महामार्गावरील वाहतूक वळवली

छत्रपती संभाजीनगर : गंगापूर तालुक्यातील टाकळीवाडी येथे गेल कंपनीच्या गॅस वाहिनीला गळती लागल्याने प्रशासनाने

Nepal Flood : नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांचे शर्थीचे प्रयत्न; ४०४ नागरिक सुरक्षित, ३३८ जणांशी संपर्क

मुंबई : नेपाळ येथील महापुरामध्ये अडकलेले महाराष्ट्रातील नागरिक व धार्मिक पर्यटनासाठी गेलेले पर्यटक यांच्या