Kangana Ranaut on CJP : "आमचं सरकार जनतेने निवडलंय, कसं चालवायचं ते आम्ही ठरवू"; सीजेपीच्या आंदोलनावर कंगना राणौतची कडाडून टीका

नवी दिल्ली : बॉलीवूडची 'क्वीन' (bollywood Queen) आणि विद्यमान लोकसभा खासदार कंगना राणौत (Kangna Ranaut) हिने आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. संसद भवनाच्या बाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कंगनाने आंदोलक आणि विरोधी पक्षांच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त केला. संसदेच्या कामकाजात सतत आणला जाणारा अडथळा अयोग्य असल्याचे सांगत, कुणाला पदावर ठेवायचे आणि कुणाला काढायचे यासाठी सरकारवर कोणताही दबाव टाकता येणार नाही, अशा स्पष्ट शब्दांत तिने विरोधकांना खडसावले आहे.







संसदेचे कामकाज सुरळीत चालण्याचे महत्त्व अधोरेखित करताना खासदार कंगना राणौत म्हणाली की, अधिवेशन हे प्रामुख्याने जनतेच्या प्रश्नांवर आणि विविध महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करण्यासाठी बोलावले जाते. त्यामुळे सभागृहाचे कामकाज विनाअडथळा सुरू राहणे अत्यंत गरजेचे आहे, जेणेकरून लोकप्रतिनिधींना आपले प्रश्न मांडता येतील. विनाकारण गोंधळ घालून कामकाजात व्यत्यय आणण्याची विरोधकांची कृती अत्यंत चुकीची आहे. "देशातील जनतेने आम्हाला बहुमताने निवडून दिले आहे. त्यामुळे हे सरकार कसे चालवायचे आणि कोणते निर्णय घ्यायचे, हा सर्वस्वी आमचा अधिकार आहे," असा ठाम युक्तिवाद तिने यावेळी केला. सरकारवर दबाव आणण्याच्या प्रयत्नांवरही कंगनाने सडकून टीका केली. कोणाला पदावर ठेवायचे आणि कोणाला हटवायचे, याबाबत विरोधक किंवा आंदोलक सरकारवर कोणतीही सक्ती करू शकत नाहीत. अशा प्रकारे निर्णय प्रक्रियेत दबाव आणणे म्हणजे एक प्रकारे 'सरकारचे हात पिरगळण्याचा' प्रकार असून, हे मुळातच योग्य नाही आणि असे कृत्य खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराच तिने आपल्या विधानांतून दिला.


दरम्यान, आज सोमवारी सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस विरोधकांच्या गदारोळामुळे चांगलाच वादळी ठरला. विरोधकांनी 'नीट-युजी २०२६' (NEET-UG 2026) परीक्षेतील कथित गैरव्यवहार, शिक्षण व्यवस्थेतील विविध त्रुटी आणि अयोध्येर्भातील अपहाराच्या आरोपांवरून आक्रमक पवित्रा घेतला. या गंभीर विषयांवर सभागृहात तत्काळ चर्चा व्हावी, या मागणीसाठी विरोधी पक्षाच्यातील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या देणग्यांसंद खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. विरोधकांचा हा गदारोळ न थांबल्यामुळे अखेर लोकसभेचे कामकाज दुपारी १२ वाजेच्या सुमारास तहकूब करावे लागले.

Comments
Add Comment

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

IST Mandatory 2027 : मार्च २०२७ पासून देशभरात इंडियन स्टँडर्ड टाइम बंधनकारक

नवी दिल्ली : देशातील सर्व संस्था, कंपन्या आणि संबंधित आस्थापनांना मार्च २०२७पासून कायदेशीर, व्यावसायिक, डिजिटल

Manjit Kaur : लिव्ह-इन पार्टनरच्या अत्याचारानंतर ५४ दिवस मृत्यूशी झुंज; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौरचा मृत्यू

मनजीत कौरचा लिव्ह-इन पार्टनर आणि त्याच्या एका साथीदाराच्या क्रूरतेनंतर ५४ दिवस रुग्णालयात जिद्दीने जगण्यासाठी

India Nepal Flood Relief Operation : नेपाळच्या पूरस्थितीत भारताची मदतकार्य मोहीम तीव्र; १०८ भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका

नवी दिल्ली : नेपाळमध्ये २६ ऑगस्ट रोजी भोटेकोशी परिसरात आलेल्या विनाशकारी पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले

Nepal Flood : नेपाळमध्ये महापुराचा कहर! ६ जलविद्युत प्रकल्पांमध्ये ५०० हून अधिक जण अडकले; बचावकार्याला खराब हवामानाचा अडथळा

डेहराडून : नेपाळमध्ये आलेल्या भीषण आणि विनाशकारी पुरानंतर परिस्थिती अद्याप गंभीर आहे. फ्लॅश फ्लडचा सर्वाधिक