Tripura DGP Anurag Dhankar : त्रिपुरा पोलीस दलात मोठी खळबळ; राज्याचे पोलीस महासंचालक अनुराग धनकर यांचा कार्यालयातच आढळला मृतदेह

आगरतळा : सोमवारचा दिवस त्रिपुरा राज्यासाठी अत्यंत धक्कादायक ठरला. राज्याचे सर्वोच्च पोलीस अधिकारी म्हणजेच पोलीस महासंचालक (DGP) अनुराग धनकर (Anurag Dhankar) हे आगरतळा येथील पोलीस मुख्यालयातील त्यांच्याच दालनात मृतावस्थेत आढळले. या घटनेची माहिती मिळताच मुख्यालयात एकच खळबळ उडाली. त्यांना तातडीने गोविंद वल्लभ पंत (GB Pant) रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांचे प्राण वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र दुपारी १२.४८ वाजता त्यांना अधिकृतरीत्या मृत घोषित करण्यात आले.


प्राथमिक अहवालानुसार, या वरिष्ठ आयपीएस (IPS) अधिकाऱ्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, या धक्कादायक मृत्यूमागचे नेमकं कारण आणि परिस्थिती अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट झालेली नाही, अशी माहिती मुख्यमंत्र्यांचे सचिव किरण गिट्टे यांनी दिली. रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर डॉ. प्रदीप भौमिक यांनी सांगितले की, धनखड यांना दुपारी १२ च्या सुमारास रुग्णालयात आणले तेव्हा त्यांच्यात नाडीचे ठोके (Pulse), रक्तदाब (Blood Pressure) किंवा शरीराचे तापमान यांसारखी कोणतीही जिवंत असल्याची लक्षणे (Vital signs) आढळून येत नव्हती.



याबाबत अधिक माहिती देताना डॉ. भौमिक म्हणाले, "जेव्हा त्यांना दुपारी १२ च्या सुमारास येथे आणण्यात आले, तेव्हा आमच्या डॉक्टरांनी तत्काळ त्यांची तपासणी केली. त्यांच्यात कोणतीही हालचाल नसल्याने, आपत्कालीन विभागात तातडीने 'सीपीआर' (CPR) सुरू करण्यात आला. आमच्या तज्ज्ञांच्या पथकाने तब्बल ४८ मिनिटे त्यांना जीवनदान देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र दुर्दैवाने आमच्या प्रयत्नांना यश आले नाही." धनकर यांना रुग्णालयात आणले तेव्हा त्यांच्या शरीरात कोणतीही लक्षणे नसल्यामुळे त्या क्षणी मृत्यूचे प्राथमिक कारण सांगणे कठीण होते. आता त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी (Post-mortem) पाठवण्यात आल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. जेव्हा डॉक्टरांना विचारण्यात आले की, त्यांच्या शरीरावर गळफासाचे किंवा इतर कोणत्याही दुखापतीचे व्रण होते का? त्यावर उत्तर देताना डॉ. भौमिक यांनी स्पष्ट केले की, वैद्यकीय पथकाचे पहिले आणि मुख्य उद्दिष्ट रुग्णाचा जीव वाचवणे हेच होते. त्यामुळे शरीरावरील खुणा किंवा जखमांबाबतची पुष्टी केवळ शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच केली जाऊ शकते.


या घटनेची माहिती मिळताच राज्याच्या अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने पोलीस मुख्यालय गाठले आणि संपूर्ण परिसर सील करून सुरक्षित केला. धनकर यांच्या मृत्यूच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. मात्र, या गंभीर प्रकरणावर पोलीस प्रशासनाकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच या मृत्यूचे खरे रहस्य उलगडेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Comments
Add Comment

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

IST Mandatory 2027 : मार्च २०२७ पासून देशभरात इंडियन स्टँडर्ड टाइम बंधनकारक

नवी दिल्ली : देशातील सर्व संस्था, कंपन्या आणि संबंधित आस्थापनांना मार्च २०२७पासून कायदेशीर, व्यावसायिक, डिजिटल

Manjit Kaur : लिव्ह-इन पार्टनरच्या अत्याचारानंतर ५४ दिवस मृत्यूशी झुंज; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौरचा मृत्यू

मनजीत कौरचा लिव्ह-इन पार्टनर आणि त्याच्या एका साथीदाराच्या क्रूरतेनंतर ५४ दिवस रुग्णालयात जिद्दीने जगण्यासाठी

India Nepal Flood Relief Operation : नेपाळच्या पूरस्थितीत भारताची मदतकार्य मोहीम तीव्र; १०८ भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका

नवी दिल्ली : नेपाळमध्ये २६ ऑगस्ट रोजी भोटेकोशी परिसरात आलेल्या विनाशकारी पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले

Nepal Flood : नेपाळमध्ये महापुराचा कहर! ६ जलविद्युत प्रकल्पांमध्ये ५०० हून अधिक जण अडकले; बचावकार्याला खराब हवामानाचा अडथळा

डेहराडून : नेपाळमध्ये आलेल्या भीषण आणि विनाशकारी पुरानंतर परिस्थिती अद्याप गंभीर आहे. फ्लॅश फ्लडचा सर्वाधिक