Nashik : खाकीला काळीमा लावण्याचे काम नाशिकमधील दोन पोलिसांकडून करण्यात आले आहे. नाशिक शहरातील उपनगर पोलीस ठाण्यात गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत ३० हजार रुपयांची लाच मागून यातील १० हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना शहरातील उपनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या सहायक पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस अमलदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे.
सहायक पोलीस उपनिरीक्षक मिलिंद हिरामण शेजवळ (५५, रा. मिलिंद रो-हाऊस, व्हिजन अकॅडमीमागे, जेलरोड, नाशिकरोड) आणि पोलीस अमलदार गणेश मुकुंद कुमावत (३८, कुलस्वामिनी अपार्टमेंट, औटी मळा, सामनगाव रोड) अशी या संशयितांची नावे आहेत. दोघेही शहरातील उपनगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.
Nashik : मराठी शाळांकडे पालकांचे होणारे दुर्लक्ष, मराठी शाळांची दिवसेंदिवस कमी होत जाणारी संख्या, याविषयी अनेक लोक गळा काढत असले तरी हे सर्व ...
नेमकं प्रकरण काय ?
१५ जुलै २०२६ रोजी तक्रारदाराच्या दाजीने (जावयाने) घराशेजारील जंगलातील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या बाबत उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. या घटनेच्या चौकशीसाठी सहायक पोलीस उपनिरीक्षक मिलिंद शेजवळ आणि पोलीस अमलदार गणेश कुमावत यांनी तक्रारदाराला उपनगर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या बिटको चौकीत बोलावून घेतले. ‘तुमच्या दाजीने तुमच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली असून तुम्हाला ३० हजार रुपये द्यावे लागतील, नाहीतर आम्ही सरकारतर्फे तुमच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करू,’ असे सांगून लाचेची मागणी केली.
शिर्डी साई मंदिराबाहेर महिलेवर चाकूने जीवघेणा हल्ला; परिसरात खळबळ मुंबई: साईबाबांच्या शिर्डी मंदिर (Shirdi Temple) परिसरात शनिवारी एक धक्कादायक घटना घडली. साई ...
10 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात ताब्यात
तपासाऐवजी आपल्यावरच गुन्हा दाखल करण्याची धमकी पोलिसांकडून देण्यात आल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार करण्यात आली. या संदर्भात तक्रार आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणी केली असता सहायक उपनिरीक्षक शेजवळ आणि अमलदार कुमावत यांनी तक्रारदाराकडे ३० हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून लाचेचा पहिला हप्ता म्हणून १० हजार रुपये स्वीकारताना संशयितांना रंगेहात पकडण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली. सहायक पोलीस उपनिरीक्षक शेजवळ आणि पोलीस अमलदार गणेश कुमावत या दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सभागृहातील कामकाज पद्धतीवर प्रश्नचिन्ह मुंबई : मुंबई महापालिकेचे (BMC) सभागृहाच्या कामकाज हे १८८८ च्या अधिनियमातील तरतुदीनुसार आणि प्रथा आणि ...
...तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला संपर्क करा
दरम्यान, शासकीय कार्यालयात कोणत्याही कामासाठी लाचेची मागणी झाल्यास अथवा भ्रष्टाचारासंदर्भात काही माहिती असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या शरणपूर रस्त्यावरील तिबेटीयन भाजीपाला मार्केट येथील कार्यालयात तसेच १०६४ या टोल-फ्री क्रमांकासह ९९३०९९७७००, ९५४५०३१०६४ या व्हॉट्सॲप क्रमांकांवर संपर्क साधता येईल.






