Monday, July 20, 2026

BEST Bus Accident : मानखुर्दमध्ये बेस्ट बसचा भीषण अपघात, एका वृद्धाचा मृत्यू, अनेक जण जखमी

BEST Bus Accident : मानखुर्दमध्ये बेस्ट बसचा भीषण अपघात, एका वृद्धाचा मृत्यू, अनेक जण जखमी
मुंबई: मुंबईतील मानखुर्द परिसरात सोमवारी सकाळी बेस्ट बसचा अपघात झाला. सायन-पनवेल (Sion Panvel Highway) महामार्गावरील विश्वकर्मा रुग्णालयासमोर मार्ग क्रमांक ५०१ ची बेस्ट बस रस्त्यावरील दुभाजकावर धडकली. या अपघातात दुभाजकाजवळ उभ्या असलेल्या एका ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असून चालक, वाहक आणि प्रवाशांसह एकूण ८ जण जखमी झाले आहेत. (BEST Bus Accident) ही घटना सकाळी सुमारे ९.१४ वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातानंतर पोलिस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना उपचारासाठी राजावाडी रुग्णालय आणि गोवंडी शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. (Mankhurd) राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्यांमध्ये बसचे वाहक वैभव वाघमारे (४१) आणि चालक बनवारी श्रीराम प्रसाद शर्मा (५१) यांचा समावेश असून दोघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. तसेच रस्त्याच्या दुभाजकाजवळ उभे असलेले भास्कर रावसाहेब पांडे (६५) यांना रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले. (Road Accident)

पाच जणांवर उपचार सुरु

गोवंडी शताब्दी रुग्णालयात पाच जखमींवर उपचार सुरू आहेत. त्यामध्ये शिवमंगल मैती (४२), गणेश पटेल (२४), लता वाघेला (४३), राजेश वरुगामिना (३५) आणि अंकिता जाधव (२२) यांचा समावेश आहे. सर्वांवर आपत्कालीन विभागात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही. (Mumbai News)
 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास पोलीस करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार बसने नियंत्रण गमावल्याने ती दुभाजकावर आदळल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे सायन-पनवेल महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. (Accident news)    
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा