Ashok Kharat Case : अशोक खरातसह पत्नी कल्पना खरातविरुद्ध ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगचा ठपका, 'इतक्या' कोटींची मालमत्ता जप्त

Ashok Kharat Case : नाशिक काय तर संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या अशोक खरातच्या अडचणीत नव्याने वाढ झाली आहे. धर्माच्या नावाखाली आणि चमत्काराचा खोटा आव दाखवत निष्पाप भक्तांना कोट्यवधी रुपयांना लुटणाऱ्या आणि महिलांवर अत्याचार करणाऱ्या अशोक खरातच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबई येथील विभागीय कार्यालयाने त्याच्यासह त्याची पत्नी संशयित कल्पना खरात व अन्य चार जणांविरोधात 'मनी लॉन्ड्रिंग'चा ठपका ठेवला आहे. येथील विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे, तसेच ३६.९० कोटी रूपयांची मालमत्ता जप्त केली आहे.


नाशिक शहरासह ग्रामीण भागात, तसेच शिर्डी, राहता पोलिस ठाण्यांमध्ये भोंदू अशोक खरात याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल झालेल्या अनेक गुन्ह्यांच्या आधारे ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा तपास सुरू केला होता. राज्यभरातून शेकडो भक्तांना धार्मिक श्रद्धेच्या नावाखाली गंडवून कोट्यवधी रुपयांची संपत्ती उभी केल्याचा आरोप अशोक खरातवर आहे. ईडीच्या माहितीनुसार, आरोपीने एका कर्मचाऱ्याच्या संगनमताने विविध बँक खाती आणि बेनामी खात्यांचा वापर करून मोठ्या प्रमाणात रोख व्यवहार केले. दोन सहकारी पतसंस्थांमार्फत गुन्ह्यातून मिळालेल्या रकमेचे मनी लॉन्ड्रिंग केले, त्यानंतर हा पैसा त्याने त्याच्या विश्वासू साथीदारांकडे ठेवला, तसेच नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, पुणे आणि मुंबई येथील स्थातर मालमत्तांमध्ये कुटुंबीयांच्या नावाने गुंतविल्याचा दावा ईडीने केला आहे.



अशोक खरात विरोधात 3000 पानांचे आरोपपत्र


दरम्यान, अशोक खरात विरोधात तब्बल 3000 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले. अंमलबजावणी संचालनालयाने ही कारवाई केली आली या आरोपपत्रात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहे. आरोपपत्रात भोंदू खरातच्या आजवरच्या काळ्या कारनाम्यांचा संपूर्ण लेखाजोखा मांडण्यात आला आहे. तब्बल 30 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. भोंदूबाबा खरातच्या संपत्तीचा संपूर्ण तपशीलच यात देण्यात आला आहे. लोकांना लुटून कमावलेली ही काळी कमाई पांढरी करण्यासाठी खरातने मोठा कट रचला होता. त्याने तब्बल 142 बेनामी खात्यांमधून कोट्यवधी रुपयांची उलाढाल केली. सहकारी पतसंस्था, बेनामी बँक खाती, त्याचे कुटुंबीय आणि निकटच्या साथीदारांच्या माध्यमातून त्याने या पैशांचे कथित मनी लॉन्ड्रिंग केले. हा सगळा पैसा त्याने महाराष्ट्रातील विविध भागांत रिअल इस्टेट आणि आलिशान मालमत्तांमध्ये गुंतवल्याचा गंभीर आरोप ईडीने केला आहे. ईडीच्या या 3000 पानांच्या आरोपपत्रामुळे आता या भोंदू बाबाचा पाय आणखी खोलात गेला आहे.



अशोक खरातचा मुक्काम कारागृहात


अशोक खरातचा सध्या न्यायालयीन कोठडीत मुक्काम आहे. त्याच्याविरुद्ध विशेष न्यायालयात दोषारोपपत्रही दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात आणखी आर्थिक व्यवहार, मालमत्ता आणि संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू असून, पुढील काळात आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : मराठा आंदोलनप्रश्नी मार्ग काढू, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

नागपूर : मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्यातील कायद्याच्या चौकटीत बसणाऱ्या मागण्यांवर सकारात्मक विचार

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Mumbai Goa Highway Accident : मुंबई गोवा महामार्गावर अपघात, दोघींनी उडवल्यानंतर वाहन २५ फूट खोल खड्ड्यात

खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावर लवेल येथे अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटले

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

Eknath Shinde : डबल इंजिन सरकार शेतकऱ्यांसह महिला व युवकांच्या पाठीशी खंबीर - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

परभणी : राज्यातील शेतकऱ्यांसह लाडक्या बहिणी व युवकांच्या पाठीशी केंद्र व राज्यातील हे डबल इंजिन सरकार खंबीरपणे