CJP Protest Violence : सीजेपीच्या संसद मोर्च्यात हिंसाचार, पार्लमेंट स्ट्रीटजवळ आंदोलकांकडून दगडफेक; दिल्ली पोलीस उपनिरीक्षकांसह अनेक पोलीस कर्मचारी जखमी

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील पार्लमेंट स्ट्रीट भागात 'कॉकरोच जनता पार्टी'च्या संसदेवरील महामोर्च्यादरम्यान परिस्थिती अत्यंत चिघळली आहे. संसदेच्या दिशेने जाणाऱ्या आंदोलकांनी सुरक्षेचे अडथळे (बॅरिकेड्स) तोडण्याचा प्रयत्न केला असता आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार संघर्ष झाला. या चकमकीदरम्यान आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत दिल्ली पोलिसांचे एक उपनिरीक्षक आणि काही पोलीस जवान जखमी झाले आहेत. (CJP Protest Violence)


पार्लमेंट स्ट्रीटवर सुरक्षेसाठी तैनात असलेले आणि दगडफेकीत जखमी झालेले दिल्ली पोलिसांचे उपनिरीक्षक यांनी घटनेची माहिती देताना सांगितले, "आम्ही पार्लमेंट स्ट्रीटजवळील बॅरिकेड्सजवळ कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शांततेत उभे होतो. त्याच वेळी आंदोलकांच्या गर्दीतून अचानक आमच्यावर दगडफेक सुरू करण्यात आली, ज्यामध्ये माझ्या एका सहकाऱ्यासह मी जखमी झालो." (CJP Protest Violence)


संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच आंदोलकांनी संसदेच्या अति-सुरक्षित भागात घुसण्याचा प्रयत्न केला. जंतर-मंतरवरून पार्लमेंट स्ट्रीटच्या दिशेने निघालेल्या मोर्चाला पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. या वेळी आंदोलकांकडून अचानक दगडफेक सुरू झाली, ज्यामुळे परिसरात एकच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पोलीस अधिकारी जखमी झाल्यानंतर प्रशासनाने तातडीने रॅपिड ॲक्शन फोर्स आणि दंगल नियंत्रण पथकाची अतिरिक्त कुमक पार्लमेंट स्ट्रीटवर तैनात केली असून संपूर्ण परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे. (CJP Protest Violence)



गर्दी पांगवण्यासाठी अश्रूधुराचा वापर :


आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला. तसेच, गर्दी पांगवण्यासाठी अश्रूधुराचा वापर केला. संसदेच्या सुरक्षेच्या कारणास्तव संसदेची प्रवेशदारे बंद केली होती. शिवाय खबरदारी म्हणून अग्निशामक दलाचे जवान आणि सुरक्षा दलाचे जवान संसद परिसरात तैनात केले आहेत. संसद भवनाच्या बाहेर देखील पोलीस बंदोबस्त आणि बॅरिकेड्स लावले होते. (CJP Protest Violence)



सीजीपीच्या प्रतिनिधींनी घेतली मंत्री जे. पी. नड्डा यांची भेट :


नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत हजारो आंदोलक संसद भवनावर धडकले असताना, कॉकरोच जनता पार्टीच्या प्रतिनिधींनी केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांची भेट घेतली आहे. कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांनी नड्डा यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. नड्डा यांच्याशी झालेल्या चर्चेत त्यांनी पक्षाच्या मागण्यांचे निवेदन दिल्याची माहिती दास यांनी 'एक्स'वरील पोस्टमधून दिली आहे. (CJP Protest Violence)



केंद्र सरकार सकारात्मक :


“नड्डांनी याप्रकरणी योग्य पातळीवर चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे, मात्र ठोस हमी दिली नाही. तसेच जंतर-मंतर किंवा आसपासच्या परिसरात कारवाई देखील केली जाणार नाही, असे त्यांनी सांगितले. पण अद्याप पोलीस कारवाई थांबली नाही,” असे दास यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे. तत्पूर्वी, आंदोलनावर केंद्र सरकारची सकारात्मक भूमिका असून आंदोलनातील विविध मागण्या आणि प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवण्यासाठी सरकारने पुढाकार घेतल्याची माहिती समोर आली होती. (CJP Protest Violence)



पोलिसांनी फेटाळले अटकेचे वृत्त :


दरम्यान, पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांना 'संसद चलो' आंदोलनादरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा कॉकरोच जनता पक्षाने केला होता. काही तासांनंतर त्यांनीच, अभिजीत दिपके यांना ना ताब्यात घेण्यात आले आहे ना अटक केली आहे, असे स्पष्ट केले. (CJP Protest Violence)

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : मराठा आंदोलनप्रश्नी मार्ग काढू, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

नागपूर : मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्यातील कायद्याच्या चौकटीत बसणाऱ्या मागण्यांवर सकारात्मक विचार

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Mumbai Goa Highway Accident : मुंबई गोवा महामार्गावर अपघात, दोघींनी उडवल्यानंतर वाहन २५ फूट खोल खड्ड्यात

खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावर लवेल येथे अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटले

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

Eknath Shinde : डबल इंजिन सरकार शेतकऱ्यांसह महिला व युवकांच्या पाठीशी खंबीर - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

परभणी : राज्यातील शेतकऱ्यांसह लाडक्या बहिणी व युवकांच्या पाठीशी केंद्र व राज्यातील हे डबल इंजिन सरकार खंबीरपणे