US Airstrikes : दोन अमेरिकी सैनिकांच्या मृत्यूनंतर अमेरिकेकडून इराणवर नवे हवाई हल्ले

वॉशिंग्टन : जॉर्डनमध्ये झालेल्या इराणी हल्ल्यात दोन अमेरिकी सैनिकांचा मृत्यू झाल्यानंतर अमेरिकेने रविवारी इराणविरोधात नवीन हवाई हल्ले केले. हे हल्ले सलग आठव्या रात्री करण्यात आले आहेत.अमेरिकी लष्कराच्या सेंट्रल कमांड (सेंटकॉम)ने सांगितले की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार हे हल्ले करण्यात आले. सेंटकॉमने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, होर्मुझ सामुद्रधुनीत व्यापारी जहाजांना धमकावण्याची इराणची क्षमता आणखी कमकुवत करण्याच्या उद्देशाने हे हल्ले करण्यात आले. (US Airstrikes )



शुक्रवारी जॉर्डनमध्ये इराणकडून करण्यात आलेल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना दोन अमेरिकी सैनिकांचा मृत्यू झाला, तर एक सैनिक अद्याप बेपत्ता असल्याची माहिती देण्यात आली आहे. सेंटकॉमच्या माहितीनुसार, जखमी झालेल्या चार सैनिकांना जॉर्डनमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. किरकोळ जखमी झालेले इतर सैनिक पुन्हा सेवेत रुजू झाले आहेत.दरम्यान, इराणच्या सरकारी दूरदर्शनने दावा केला आहे की जॉर्डनमधील अल-अजराक येथील अमेरिकी लष्करी तळावरील इंधन साठवण टाक्यांना लक्ष्य करण्यात आले होते. (US Airstrikes )



अमेरिकेच्या माहितीनुसार, २८ फेब्रुवारी रोजी संघर्ष सुरू झाल्यापासून आतापर्यंत १६ अमेरिकी सैनिकांचा मृत्यू झाला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकेने होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांना लक्ष्य केल्याचा आरोप इराणवर केला होता. त्यानंतर दोन्ही देशांमधील संघर्ष आणि हल्ल्यांची तीव्रता वाढली आहे.हे हल्ले १७ जून रोजी झालेल्या १४ सूत्रीय युद्धविराम करारानंतर अवघ्या एका महिन्याने झाले आहेत. या करारावर अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या. मात्र, ८ जुलै रोजी ट्रम्प यांनी हा करार समाप्त झाल्याची घोषणा केली. त्यानंतर इराणनेही अमेरिकेवर करारातील आश्वासने मोडल्याचा आरोप करत सामंजस्य करार (एमओयू) स्थगित केला.इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांनी एक्सवरील पोस्टद्वारे अमेरिकेला इशारा दिला. त्यांनी म्हटले की, अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या स्वाक्षरीला कोणतीही किंमत नाही आणि अमेरिकेला कधीही न विसरता येईल असा धडा शिकवला जाईल.त्याचवेळी इराणचे वरिष्ठ लष्करी कमांडर मेजर जनरल मोहसेन रेझाई यांनीही कठोर भूमिका मांडली. त्यांनी म्हटले की, अमेरिकेचे हल्ले सुरू राहिल्यास इराण पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने आक्रमक लष्करी मोहीम सुरू करेल. आता इराण केवळ प्रतिहल्ल्यांपुरता मर्यादित राहणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (Donald Trump)

Comments
Add Comment

Switzerland Rave Shooting : स्वित्झर्लंडमध्ये रेव्ह पार्टीत अंदाधुंद गोळीबार; एकाचा मृत्यू, पाच गंभीर जखमी

बर्न : स्वित्झर्लंडमधील आराऊ शहरात रविवारी पहाटे रेव्ह पार्टीदरम्यान झालेल्या अंदाधुंद गोळीबारात एका

Quetta Gurdwara Demolition : बलुचिस्तानात ऐतिहासिक गुरुद्वारा पाडला, शीख समाजात संताप; भारतातूनही तीव्र विरोध

क्वेटा : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेटा येथे असलेले सुमारे २०० वर्षे जुने ऐतिहासिक श्री

PM Narendra Modi Uzbekistan Visit : भारत-उझबेकिस्तान संबंधांना व्यापक धोरणात्मक भागीदारीचा दर्जा देण्याची घोषणा

ताश्कंद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी उझबेकिस्तानचे राष्ट्रपती शौकत मिर्ज़ियोयेव यांच्यासोबत

India-Nepal Flood Relief : भारताचे चौथे विमान ११ टन मदत सामग्री घेऊन नेपाळमध्ये पोहोचले

काठमांडू : भारताचे चौथे विमान रविवारी मदत सामग्रीची चौथी खेप घेऊन काठमांडूमध्ये पोहोचले आणि आपत्तीग्रस्त देश

PM Narendra Modi Uzbekistan Visit : पंतप्रधान मोदींना उझबेकिस्तानकडून सर्वोच्च सन्मान ‘ओली दराजाली दोस्तलिक’ प्रदान

ताश्कंद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उझबेकिस्तानचा सर्वोच्च राजकीय सन्मान ‘ओली दराजाली दोस्तलिक’ देऊन

Kyiv Ukraine Weapons Depot Explosion : कीवजवळ शस्त्रसाठ्यावर ड्रोन हल्ला; भीषण स्फोटात ३७ जणांचा मृत्यू, ४२ जखमी

कीव : रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनची राजधानी कीवजवळील मिला गावात मोठी दुर्घटना घडली आहे.