PM Narendra Modi Uzbekistan Visit : पंतप्रधान मोदींना उझबेकिस्तानकडून सर्वोच्च सन्मान ‘ओली दराजाली दोस्तलिक’ प्रदान

ताश्कंद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उझबेकिस्तानचा सर्वोच्च राजकीय सन्मान ‘ओली दराजाली दोस्तलिक’ देऊन गौरवण्यात आले. उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शौकत मिर्झियोयेव यांनी रविवारी पंतप्रधान मोदी यांना या सन्मानाने गौरवले. (PM Narendra Modi Uzbekistan Visit)


जुलै २०२६ मध्ये इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘बिंतांग आदिपूर्णा ऑफ द रिपब्लिक ऑफ इंडोनेशिया’ मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परदेशी देशांकडून मिळालेल्या आंतरराष्ट्रीय सन्मानांची संख्या आता ३६ झाली आहे.


https://www.prahaar.in/2026/08/30/rise-in-h1n1-cases-is-paracetamol-enough-for-fever-or-are-antivirals-needed-learn-about-treatment-and-warning-signs/

भारत आणि उझबेकिस्तानने रविवारी व्यापार आणि गुंतवणूक, डिजिटल संपर्क, संरक्षण तसेच ऊर्जा क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यावर सहमती दर्शवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ताश्कंद येथे उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शौकत मिर्झियोयेव यांच्यासोबत शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा केली. दोन्ही देशांनी धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्यासोबतच सामायिक विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्यावर भर दिला. (PM Narendra Modi Uzbekistan Visit)


पंतप्रधान मोदी उझबेकिस्तानच्या दोन दिवसीय राजकीय दौऱ्यावर आहेत. राष्ट्राध्यक्ष मिर्झियोयेव यांच्या निमंत्रणावरून हा दौरा होत आहे. ताश्कंद येथे पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदी यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या उपाययोजनांवर चर्चा केली. (PM Narendra Modi Uzbekistan Visit)

Comments
Add Comment

Switzerland Rave Shooting : स्वित्झर्लंडमध्ये रेव्ह पार्टीत अंदाधुंद गोळीबार; एकाचा मृत्यू, पाच गंभीर जखमी

बर्न : स्वित्झर्लंडमधील आराऊ शहरात रविवारी पहाटे रेव्ह पार्टीदरम्यान झालेल्या अंदाधुंद गोळीबारात एका

Quetta Gurdwara Demolition : बलुचिस्तानात ऐतिहासिक गुरुद्वारा पाडला, शीख समाजात संताप; भारतातूनही तीव्र विरोध

क्वेटा : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेटा येथे असलेले सुमारे २०० वर्षे जुने ऐतिहासिक श्री

PM Narendra Modi Uzbekistan Visit : भारत-उझबेकिस्तान संबंधांना व्यापक धोरणात्मक भागीदारीचा दर्जा देण्याची घोषणा

ताश्कंद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी उझबेकिस्तानचे राष्ट्रपती शौकत मिर्ज़ियोयेव यांच्यासोबत

India-Nepal Flood Relief : भारताचे चौथे विमान ११ टन मदत सामग्री घेऊन नेपाळमध्ये पोहोचले

काठमांडू : भारताचे चौथे विमान रविवारी मदत सामग्रीची चौथी खेप घेऊन काठमांडूमध्ये पोहोचले आणि आपत्तीग्रस्त देश

Kyiv Ukraine Weapons Depot Explosion : कीवजवळ शस्त्रसाठ्यावर ड्रोन हल्ला; भीषण स्फोटात ३७ जणांचा मृत्यू, ४२ जखमी

कीव : रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनची राजधानी कीवजवळील मिला गावात मोठी दुर्घटना घडली आहे.

US Shooting : अमेरिकेत पार्कमध्ये गोळीबार; संशयितासह २ जण आणि पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू, आणखी एक अधिकारी जखमी

कोलंबिया : अमेरिकेतील साउथ कॅरोलिनाच्या कोलंबिया शहरात पार्कमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेत संशयितासह दोन