शिक्षक सुनील मोरेंनी रचला बनवा; आत्महत्या पूर्वी दोन्ही लेकरांची हत्या, पोस्टमार्टम रिपोर्ट आले समोर
Teacher Suicide Case : नांदेड : नांदेड जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे शिक्षक सुनील मोरे यांनी दोन मुलांसह नदीत कार घालून आत्महत्या केल्याच्या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. सुरुवातीला ही सामूहिक आत्महत्या असल्याचे मानले जात होते. मात्र, शवविच्छेदन अहवालानुसार कार नदीत सोडण्यापूर्वीच दोन्ही मुलांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आता मयत सुनील मोरे यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. (Nanded News)
वसई : वसई पूर्वेतील मेधे ग्रामपंचायत हद्दीतील वडघर गावाकडे जाणारा पूल शनिवारी दुपारी अचानक कोसळल्याने परिसरात खळबळ उडाली. या दुर्घटनेत पुलावरून जात ...
मिळालेल्या माहितीनुसार, हिमायतनगर तालुक्यातील पोटा येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले 42 वर्षीय सुनील मोरे यांनी 16 जुलै रोजी नांदेड-मुदखेड मार्गावरील आमदुरा पुलावरून कार थेट गोदावरी नदीत नेली होती. कारमध्ये त्यांची 14 वर्षीय मुलगी सारा आणि 10 वर्षीय मुलगा सुमेध हे दोघेही होते. (Teacher Suicide News)
आत्महत्यापूर्वी मेसेज
घटनेपूर्वी सुनील मोरे यांनी व्हॉट्सॲप स्टेटस आणि मित्रांच्या व्हॉट्सअॅपवर मेसेज टाकत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कथित त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला होता. या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलिसांनी यापूर्वी चार जणांविरोधात ॲट्रॉसिटी कायदा आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. (Murder News)
मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठेचे मानले जाणारे 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाले असून यंदाच्या पुरस्कारांमध्ये मराठी ...
पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासे
दरम्यान, शवविच्छेदन अहवालात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. त्यानुसार, मुलगी सारा आणि मुलगा सुमेध यांच्या छाती व पोटावर धारदार शस्त्राचे वार झाल्याचे आढळले. या जखमांमुळे त्यांचा मृत्यू झाल्यानंतरच त्यांचे मृतदेह कारमध्ये ठेवून वाहन नदीत सोडण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. (Nanded Police)
या निष्कर्षानंतर पोलिसांनी स्वतः फिर्याद दाखल करून सुनील मोरे यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंदवला आहे. या संपूर्ण प्रकरणातील सर्व बाजूंचा तपास सुरू असून आत्महत्येपूर्वी घडलेल्या घटनाक्रमाचा शोध पोलीस घेत आहेत.






