Pune Jagannath Rath Yatra 2026 : पुणेकरांनो अलर्ट! जगन्नाथ रथयात्रेमुळे उद्या 'या' प्रमुख रस्त्यांवर ट्रॅफिक डायव्हर्जन; घराबाहेर पडण्यापूर्वी मार्ग तपासा

पुणे : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या म्हणजेच रविवारी १९ जुलै रोजी भगवान जगन्नाथ रथयात्रेनिमित्त शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे दुपारी ३ ते रात्री ८.३० या वेळेत प्रवास करणाऱ्या नागरिकांनी घराबाहेर पडण्यापूर्वी वाहतुकीतील बदल आणि पर्यायी मार्गांची माहिती घेण्याचे आवाहन पुणे वाहतूक पोलिसांनी केले आहे. (Pune Jagannath Rath Yatra 2026)



'या' मार्गावरून निघणार भव्य रथयात्रा :


भगवान जगन्नाथाची रथयात्रा उद्या दुपारी ३ वाजता एस. पी. महाविद्यालय येथून सुरू होईल. त्यानंतर टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, शनिपार चौक, नगरकर तालीम, रमणबाग शाळा, ओंकारेश्वर मंदिर, बालगंधर्व रंगमंदिर, जंगली महाराज रस्ता, खंडुजीबाबा चौक आणि टिळक चौक मार्गे पुन्हा एस. पी. महाविद्यालय येथे यात्रेची सांगता होईल. (Pune Jagannath Rath Yatra 2026)



'या' रस्त्यांवर होणार वाहतुकीत बदल :


रथयात्रेच्या पार्श्वभूमीवर टिळक रस्ता, बाजीराव रस्ता आणि लक्ष्मी रस्ता परिसरातील वाहतूक परिस्थितीनुसार वळवण्यात येणार आहे. गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनचालकांनी या मार्गांवर जाणे शक्यतो टाळावे आणि पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (Pune Jagannath Rath Yatra 2026)



वाहतूक पोलिसांचे नागरिकांना आवाहन :


वाहतूक उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी सांगितले की, रथयात्रेदरम्यान वाहतूक सुरळीत राहावी यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे आणि शक्यतो पर्यायी मार्गांचा वापर करून प्रवासाचे नियोजन करावे. रविवारी शहरातील मध्यवर्ती भागात जाण्याचा विचार करत असाल, तर ट्रॅफिकमध्ये अडकण्यापेक्षा आधीच पर्यायी मार्ग निवडून वेळ आणि त्रास दोन्ही वाचवा. (Pune Jagannath Rath Yatra 2026)

Comments
Add Comment

Pro Govinda Season 4 : प्रो गोविंदा सीझन ४ चा थरार रंगला; विजेत्यांवर बक्षिसांची लयलूट, दहीहंडी ऑलिम्पिकपर्यंत नेण्याचा निर्धार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांच्या हस्ते

Eknath Shinde : नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी महाराष्ट्र सरकार सक्रिय

मुंबई : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील

CM Devendra Fadnavis : औंढा नागनाथ मंदिराच्या विकासाला १९३ कोटींची मंजुरी

मुंबई : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढा नागनाथ (Aundha Nagnath) मंदिराच्या प्राचीन शिल्पकलेचे जतन करताना

Dada Bhuse : शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा! पवित्र पोर्टलद्वारे १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस

मुंबई : राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला मोठी गती मिळाली असून, पवित्र पोर्टलमार्फत १३ हजार ११९ शिक्षक पदांसाठी

CM Devendra Fadnavis : पंढरपूरचा विकास आराखडा सर्वांना विश्वासात घेऊनच अंतिम करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पंढरपूरचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा वारकरी, भाविक, स्थानिक नागरिक, व्यापारी, मठाधिपती आणि

Amravati : अमरावतीतील नवजात बालकांच्या मृत्यूची NHRCकडून स्वतःहून दखल; महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना नोटीस

अमरावती येथील जिल्हा महिला रुग्णालयाच्या नवजात बालकांच्या देखभाल विभागात (SNCU) लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा