Nashik Simhastha Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी १२०० कोटींचा निधी वितरित करण्यास मान्यता

Nashik Simhastha Kumbhmela : नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात विकासकामे सुरु आहे. अशातच राज्य सरकारने कुंभमेळा प्राधिकरणाला( Nashik-Trimbakeshwar Kumbh Mela Authority )  १ हजार २०० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे आधी वेगात आणि उत्तम होण्यास मदत होणार आहे. नगरविकास विभागाने शुक्रवारी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला. हा निधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आवश्यक कामासाठी वापरला जाणार आहे. (Simhastha Kumbh Mela 2027)


नुकत्याच पार पडलेल्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या. या पुरवणी मागणीत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आवश्यक कामासाठी तीन हजार कोटी रुपयांची मागणी मंजूर झाली आहे. या मंजूर तरतुदीतील १२०० कोटी रुपये वितरित करण्यास वित्त विभागाने मान्यता दिली आहे. राज्य सरकारने यापूर्वी ऑक्टोबर २०२५ मध्ये २८३ कोटी, डिसेंबर २०२५ मध्ये ७१७ कोटी, फेब्रुवारी २०२६ मध्ये ५०१ कोटी तर मे २०२६ मध्ये ३९६ कोटी असा एकूण १ हजार ८९७ कोटी रुपयांचा निधी कुंभमेळा प्राधिकरणाला दिला आहे.(Simhastha Kumbh Mela 2027)



नाशिकमधील ७० प्रमुख चौकांचा होणार कायापालट


तर दुसरीकडे 'सिंहस्थ कुंभमेळा २०२७' (Simhastha Kumbh Mela 2027) आता काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे आरोग्यसुविधा, रस्त्यांची कामे तसेच विविध विकासकामांवर मनपाकडून विशेष भर दिला जात आहे. कुंभमेळ्यात भाविकांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता, नाशिक महानगरपालिकेने (Nashik Municipal Corporation) आता शहरातील ७० प्रमुख वाहतूक चौकांची पुनर्रचना आणि श्रेणीसुधारणा (अपग्रेडेशन) करण्याची योजना हाती घेतली आहे. या उपक्रमाचा उद्देश पादचाऱ्यांची सुरक्षा वाढवणे, वाहतुकीचा वेग नियंत्रित करणारे उपाय (ट्रॅफिक-काल्मिंग) राबवणे आणि वाहनांची सुरळीत ये-जा सुनिश्चित करणे हा आहे. त्यामुळे शहरातील ७० प्रमुख चौकांचा कायापालट होण्यास मदत होणार आहे. (Simhastha Kumbh Mela 2027)


या प्रकल्पाचा आराखडा अंतिम करण्यासाठी महानगरपालिका(Nashik Municipal Corporation) आणि 'नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण' ( Nashik-Trimbakeshwar Kumbh Mela Authority ) यांच्यात बैठक झाली. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निवडलेल्या चौकांची पुनर्रचना आधुनिक वाहतूक-अभियांत्रिकी तत्त्वांचा वापर करून केला जाईल. प्रस्तावित सुधारणांमध्ये चौकांची सुधारित रचना (जिओमेट्री), पादचाऱ्यांसाठी उत्तम सुविधा, वाहतूक मार्ग निश्चितीचे उपाय (चॅनेलायझेशन) आणि वाहनांचा वेग नियंत्रित करणाऱ्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे, ज्यामुळे अपघात कमी होतील आणि वाहतूक कोंडीची समस्या सुटेल

Comments
Add Comment

Ganapti Special Trains : कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी, पश्चिम रेल्वेच्या गणपती स्पेशल ट्रेनची घोषणा

मुंबई : दरवर्षी प्रमाणे यंदाही पश्चिम रेल्वेने कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या सोयीसाठी निवडक गणपती स्पेशल

Nitesh Rane : सिंधुदुर्गातील १ हजार ५६९ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ; पालकमंत्री नितेश राणे

तांत्रिक अडचणी दूर करण्याची मुख्यमंत्र्यांकडे

Megablock : मध्य,पश्चिम रेल्वेचा रविवारी मेगाब्लॉक; अनेक लोकल सेवा रद्द, काहींच्या मार्गात बदल

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून रविवारी विविध अभियांत्रिकी, संकेत व्यवस्था आणि पायाभूत सुविधांच्या

Nashik : नाशिकच्या रस्त्यांवरून राजकारण तापलं, राज ठाकरेंना गिरीश महाजनांचे खुले आव्हान

Nashik : नाशिकमधील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्य सरकारवर केलेल्या टीकेला

Pratik Karpe : भविष्यातील ग्लोबल वॉर्मिंगचा धोका लक्षात घेता मुंबईतील नैसर्गिक जलस्रोतांचे एआय व सॅटेलाईट मॅपिंग द्वारे सर्वेक्षण करा; नगरसेवक प्रतीक कर्पे यांची मागणी

मुंबई : भविष्यात उद्भवणाऱ्या ग्लोबल वॉर्मिंगच्या (जागतिक तापमानवाढ) गंभीर धोक्याचा आणि वातावरणीय बदलांचा सामना

Jumbo Block : पश्चिम रेल्वेचा हार्बर मार्गावर जम्बो ब्लॉक

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या हार्बर मार्गावर रविवार ९ ऑगस्ट २०२६ रोजी जम्बो ब्लॉक आहे. प्रवाशांनी या जम्बो ब्लॉकची