Nashik Crime News: नाशिक हादरले ! इंदिरानगर परिसरात तरुणीची निर्घृण हत्या

Nashik Crime News: नाशिक शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या वाढणाऱ्या घटनांमुळे नाशिककरांमध्ये आधीच भीतीचे वातावरण पसरले असताना इंदिरानगर परिसरात घडलेल्या एका घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. नाशिकच्या इंदिरानगर परिसरात शुक्रवारी एका तरुण मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.



नेमकं काय घडलं ?


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नाशिकच्या इंदिरानगर येथे रात्री १०. ३० च्या सुमारास हत्येचा थरार घडला असून येथील वनसंपदा सोसायटीतील गार्डनजवळ ही घटना घडली. वैष्णवी अनिल आवारे असे मृत तरुणीचे नाव आहे. वैष्णवी ही मूळची जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील अमळनेर (Amalner) येथील रहिवासी असून ती नाशिकमध्ये वनसंपदा सोसायटीत पेईंग गेस्ट (PG) म्हणून राहत होती.



धारदार चाकूने सपासप वार


रात्री वैष्णवी सोसायटीजवळून जात असताना, एका माथेफिरू तरुणाने तिच्यावर अचानक हल्ला केला. धारदार चाकूने वैष्णवीवर सपासप वार केले आणि वैष्णवी रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळली. ती निपचित पडल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाला. वैष्णवी रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली पाहून स्थानिकांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच इंदिरानगर पोलिसांनी (Indiranagar Police) घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा करून वैष्णवीचा मृतदेह ताब्यात घेतला. आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला.



हत्या प्रेमप्रकरणातून झाल्याचा संशय


हा संपूर्ण प्रकार प्रेमप्रकरणातून घडला असावा, असा प्राथमिक संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात (Indiranagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. दरम्यान, नाशिक हा कायद्याचा किल्ला आहे, असं पोलीस गुन्हेगारांकडून वदवून घेत असले तरी प्रत्यक्षात मात्र शहरातील गुन्हेगारी जैसे थेच असल्याचं चित्र आहे. शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर नागरिकांनी संताप व्यक्त केलाय.



दुगारवाडी धबधबा अनिश्चित काळासाठी बंद


दरम्यान, नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावरती असलेला दुगारवाडी येथील धबधबा हा अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय वनविभागाने घेतला असून त्याबाबतचा आदेश हा काढण्यात आला आहे, त्यामुळे पावसाळ्यामध्ये दुगारवाडीचा धबधबा हा आता अनिश्चित काळासाठी बंद झाला आहे. दुगारवाडी धबधबा (Dugarwadi Waterfal) येथे फिरण्यासाठी आलेल्या नाशिक येथील २० वर्षीय युवकाचा खोल पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. मयत युवकाचे नाव अभिजीत नवनाथ पवार (वय २०, रा. जेलरोड, नाशिकरोड) असे आहे.


अभिजीत हा त्याचा मित्र प्रणव अविनाश खरे याच्यासोबत दुगारवाडी धबधबा येथे फिरण्यासाठी आला होता. माहितीनुसार दोघेही पाण्यात खेळत असताना अभिजीत याचा तोल जाऊन तो खोल पाण्यात बुडाला. गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता वरील घटना घडली उपस्थितांनी तातडीने त्याला पाण्याबाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.


वनविभागाने तसेच जिल्हा प्रशासनाने यापूर्वी नागरिकांना पर्यटन स्थळावरती जाताना काळजी घेण्याचे आवाहन केले होते. पण तरी देखील नागरिकांकडून फारशी काळजी घेतली जात नसल्याने तसेच या दुर्घटनंतर वनविभागाने अतिशय कडक पावलं उचलण्याचा निर्णय घेतला असून त्र्यंबकेश्वर परिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी शेखर देवकर यांनी शुक्रवारी सकाळी एक आदेश प्रकाशित केला असून जोपर्यंत पुढील आदेश होत नाही तोपर्यंत दुगारवाडी येथील धबधब्यावरती जाण्यासाठी पूर्णपणे बंदी करण्यात आलेली आहे.


Comments
Add Comment

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबई विमानतळावर आगमन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले स्वागत

मुंबई : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांचे आज छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथे

Mumbai Local News : लोकलमध्ये महिलेला मारहाण करणाऱ्या पुरुषाला १२ तासांत अटक

मुंबई : लोकलमध्ये महिलेला मारहाण करत असलेल्या पुरुषाचा व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ व्हायरल होताच अवघ्या १२

Jalna : कॉलेजचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू आणि चौघे जखमी

जालना : जालना जिल्ह्यातील भोकरदनमध्ये एका कॉलेजच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम सुरू असताना

Weather changes in Maharashtra : महाराष्ट्रात पुन्हा बदलले हवामान; शनिवारी अनेक भागांत पावसाचा अंदाज, ७ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी!

मुंबई : महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे वारे पुन्हा एकदा सक्रिय झाले असून, राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर

Boss Scam : अधिकारी बनून पैशांची मागणी; 'बॉस स्कॅम'पासून सावधान राहण्याचे केंद्राचे आवाहन

नवी दिल्ली : व्हॉट्सॲप, ई-मेल किंवा इतर संदेशवहन माध्यमांचा वापर करून आर्थिक फसवणूक करणाऱ्या सायबर

New IT Rules : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी नवीन आयटी नियम कठोर, आक्षेपार्ह मजकूर हटवण्याची मुदत २४ तासांवरून थेट २ तासांवर

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी आक्षेपार्ह आणि संवेदनशील मजकूर हटवण्याच्या मुदतीत