रायगड : कर्जत तालुक्यातील हलीवली परिसरातील सिग्नेचर डिझायर इमारतीत अंमली पदार्थांची विक्री होत असल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने छापा टाकत एका नायजेरियन नागरिकासह स्थानिक संशयिताला ताब्यात घेतले. या कारवाईमुळे हलीवली परिसरात एकच खळबळ उडाली असून कर्जत परिसरातील अंमली पदार्थांच्या व्यवहाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अंमली पदार्थविरोधी पथकाने सिग्नेचर डिझायर इमारतीत कारवाई केली. अचानक झालेल्या या कारवाईदरम्यान एका नायजेरियन नागरिकाला तसेच एका स्थानिक संशयिताला ताब्यात घेण्यात आले. दोघांची चौकशी सुरू असून त्यांचे अंमली पदार्थांच्या व्यवहारातील संभाव्य संबंध तपासले जात आहेत.
कोलंबो : श्रीलंका दौऱ्यावर, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये सहज विजय मिळवून परतण्याच्या तयारीत होता. पण, गॉलनंतर, ...
ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांकडून अंमली पदार्थांचा साठा किंवा अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे का, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, या कारवाईमुळे परिसरात अंमली पदार्थांची विक्री अथवा पुरवठा करणारे जाळे कार्यरत आहे का, याबाबत चर्चेला उधाण आले आहे. पोलिसांकडून दोन्ही संशयितांची कसून चौकशी करण्यात येत असून अंमली पदार्थांचा पुरवठा नेमका कुठून होत होता, त्यांचे स्थानिक पातळीवरील संपर्क कोण आहेत आणि या व्यवहारामागे आणखी व्यक्तींचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे. त्यामुळे या कारवाईतून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दुबई : संयुक्त अरब अमिरातीचा (UAE) अनुभवी फलंदाज आसिफ खान याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) डोपिंग नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १५ ...
कर्जतसह रायगड जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या वाढत्या व्यवहारामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. विशेषतः तरुणांना या विळख्यात ओढणाऱ्या टोळ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. पुणे पोलिसांच्या या कारवाईनंतर कर्जत परिसरातील अंमली पदार्थांच्या व्यवहारावर पोलिसांची नजर अधिक कडक झाली असून पुढील तपासात आणखी कोणाची नावे समोर येतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.