Ahmedabad : अहमदाबादमधील फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, ८ जणांचा मृत्यू

Ahmedabad : अहमदाबाद मधून एक मोठी बातमी समोर आली आहे. गुजरातच्या अहमदाबादमधील महमूदपुरा (Mahmudpura) परिसरात फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत आठ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला असून १५ जण जखमी झाल्याची माहिती पुढे येत आहे. (Massive explosion at firecracker factory)



नेमकं काय घडलं ?


गुजरातच्या अहमदाबाद येथील महमूदपुरा भागातील गॅट्रेड रोड येथील टॅलेंट फायरवर्क्स फॅक्ट्रीत शनिवारी मोठा स्फोट झाला आणि क्षणात आगीचा भडका उडाला, हा स्फोट इतका भीषण होता की संपूर्ण भागात मोठा आवाज झाला आणि परिसरात घबराट पसरली आहे. या भीषण दुर्घटनेत आता पर्यंत आठ जणांचे प्राण गेले आहेत. या स्फोटाची माहिती समजताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आणि जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करीत बचाव मोहीम सुरु केली. (Massive explosion at firecracker factory)


दरम्यान, जखमींना तातडीने विविध हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे यातील पाच जखमींवर एलजी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून चार जणांना सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवत आणखी कोणी अडकले आहे का याचा तपास सुरु आहे.

Comments
Add Comment

Udhampur Accident: धमपूरमध्ये टँकरची डंपरला जोरदार धडक लागताच लागली भीषण आग; महामार्गावर थरकाप उडवणारी परिस्थिती

उधमपूर : जम्मू-काश्मीरमधील उधमपूर परिसरात जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर काल रात्री उशिरा तेल टँकर आणि

Narendra Modi : आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध; पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, २१ व्या शतकासाठी आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्यास

Kanpur Plane Crash : धक्कादायक! कानपूरमध्ये प्रशिक्षण विमान शेतात कोसळले; अनुभवी पायलटसह सह-पायलटचा अंत

कानपूर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूर (Kanpur) येथे एक अत्यंत दुःखद घटना घडली आहे. गुरुवारी गंगा नदीच्या

Rule Change From 1st September : LPG गॅस सिलेंडर, आयटीआर अन् थेट तुमच्या...; १ सप्टेंबरपासून बदलणार ५ मोठे नियम!

ऑगस्ट महिना (August Month) अखेरच्या टप्प्यात आला असून १ सप्टेंबरपासून देशात अनेक महत्त्वाच्या आर्थिक आणि प्रशासकीय

Nepal Floods Impact on Bihar and UP : नेपाळच्या पुराचा बिहार-उत्तर प्रदेशालाही धोका; ७ जिल्ह्यांना अलर्ट, पुढील ४८ तास महत्त्वाचे

पाटणा : नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुराचा परिणाम आता भारतातील सीमावर्ती राज्यांवरही होण्याची शक्यता आहे.

Dating App Gang : 'नको तेच केलं!' डेटिंग ॲपवरून तरुणाला जाळ्यात ओढले अन्...; जयपूरमध्ये ‘गे डेटिंग ॲप गँग’चा पर्दाफाश

जयपूर : गे डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून तरुणांशी मैत्री करून त्यांना भेटण्यासाठी बोलावायचे आणि त्यानंतर हल्ला