Tribal Reservation : धर्मांतर केलेल्या आदिवासींच्या सवलती बंद होणार?

- राज्य सरकार ऍक्शन मोडवर; सर्वसमावेशक धोरणासाठी २७ जणांची समिती


मुंबई : धर्मांतरानंतरही अनुसूचित जमातीचे (आदिवासी) सर्व लाभ मिळवणाऱ्या व्यक्तींच्या शासकीय सोयी-सवलती रद्द कराव्यात का, यावर आता राज्य सरकार अत्यंत गांभीर्याने विचार करत आहे. ख्रिश्चन किंवा इतर धर्मात धर्मांतर केलेल्या आदिवासींच्या सवलतींबाबत राज्याचे सर्वसमावेशक धोरण ठरवण्यासाठी सरकारने २७ जणांची उच्चस्तरीय समिती गठित केली असून, समितीच्या अहवालानंतर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. ( Tribal Reservation)



पावसाळी अधिवेशनात याबाबतचा मुद्दा उपस्थित झाला होता. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात ख्रिश्चन धर्मगुरू आणि मिशनऱ्यांकडून प्रलोभने देऊन मोठ्या प्रमाणावर आदिवासींचे धर्मांतर केले जात असल्याचा मुद्दा भाजपचे आमदार अनुप अग्रवाल आणि इतर सदस्यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे सभागृहात उपस्थित केला होता. या लक्षवेधीवरील चर्चेदरम्यान आमदारांनी, धर्मांतर करणाऱ्या व्यक्तींना अनुसूचित जमाती किंवा अनुसूचित जातीच्या नात्याने मिळणाऱ्या सरकारी सवलती, आरक्षण आणि इतर लाभ तातडीने रद्द करण्यात यावेत, अशी आग्रही मागणी केली होती. यावर तोडगा काढण्यासाठी आदिवासी आमदारांची एक विशेष समिती स्थापन करण्याचे आश्वासन महसूल मंत्र्यांनी दिले होते. याच आश्वासनाची पूर्तता म्हणून आदिवासी विकास विभागाने शासन निर्णय जारी करून समितीची स्थापना केली आहे. ( Religious Conversion)



धर्मांतरित व्यक्तींना अनुसूचित जमातीचे फायदे मिळावेत की नाही, यावरून देशपातळीवर मोठे कायदेशीर व सामाजिक वाद प्रलंबित आहेत. या पार्श्वभूमीवर, नव्याने स्थापन झालेली ही उच्चस्तरीय समिती देशभरातील कायद्यांचा सखोल अभ्यास करणार आहे. यामध्ये प्रामुख्याने केंद्र सरकारचे नियम तसेच देशातील इतर राज्यांनी (उदा. मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड) धर्मांतर आणि आरक्षण सवलतींबाबत काय कायदे केले आहेत, याचा अभ्यास केला जाईल. आदिवासींचे मूळ हक्क अबाधित राखताना, धर्मांतरितांबाबत राज्यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करण्याचे मोठे आव्हान या समितीसमोर असणार आहे. ( Maharashtra Government)





समितीत कोण?


या २७ सदस्यीय समितीचे अध्यक्षपद राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक वुईके भूषवणार असून, उपाध्यक्ष म्हणून आदिवासी विकास राज्यमंत्री इंद्रनिल नाईक काम पाहणार आहेत. या समितीमध्ये राज्यातील सर्वपक्षीय आदिवासी विधानसभा सदस्यांना प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. यामध्ये अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ, माजी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, माजी मंत्री आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमश्या पाडवी, राजेश पाडवी, शिरिशकुमार नाईक, मंजुळा गावित, काशिराम पावरा, विनोद निकोले यांसारख्या २५ प्रमुख आमदारांचा समावेश आहे. तर पुणे येथील 'आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थे'चे आयुक्त या समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील. ते या धोरणासाठी आवश्यक असणारा तांत्रिक व सांख्यिकीय अहवाल तयार करण्यात मदत करणार आहेत. या समितीच्या शिफारशींनंतर राज्य सरकार धर्मांतरित आदिवासींच्या आरक्षणावर आणि सवलतींवर कात्री लावणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Comments
Add Comment

FDA Inspections : गणेशोत्सवात महाप्रसादासाठी लागणार परवाना

- भंडाऱ्यावरही असणार ‘एफडीए’ची नजर मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांततर्फे

Pratap Sarnaik : ‘रॅपिडो’शी व्यावसायिक संबंधांचे पुरावे द्या!

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर; प्रत्येक गोष्टीला राजकीय रंग देणे योग्य

Nepal floods : नेपाळमधील पूरपरिस्थितीत नांदेडचे पर्यटक अडकले; मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने जारी केले तात्काळ संपर्क क्रमांक

नांदेड : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पूरस्थितीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले

CM Devendra Fadnavis : गडचिरोलीच्या विकासाला नवी दिशा; ‘ग्रीन स्टील हब’ म्हणून उदयास येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : गडचिरोली जिल्हा निर्मितीला २६ ऑगस्ट रोजी ४४ वर्षे पूर्ण होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

CM Devendra Fadnavis : चाकण ‘एमआयडीसी’मध्ये ४९ उद्योगांसोबत सामंजस्य करार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती; २ हजार ३२० कोटींची गुंतवणूक प्रस्तावित मुंबई : चाकण-भोसरीच्या

Sunetra Pawar : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे निर्देश

पुणे : चाकण परिसरातील अनेक समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित असून, त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्व