FDA : मुंबईच्या प्रसिद्ध पारशी डेअरी फार्मवर अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; परवाना निलंबित

मुंबई : राज्यभर सुरू असलेल्या 'सेफ फूड, सेफ महाराष्ट्र' (Safe Food, Safe Maharashtra) या विशेष मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मुंबईतील शंभर वर्षांहून अधिक इतिहास असलेल्या पारशी डेअरी फार्मवर मोठी कारवाई केली आहे. तपासणीदरम्यान स्वच्छता (Hygiene) आणि अन्नसुरक्षा (Food Safety) नियमांचे गंभीर उल्लंघन आढळल्याने डेअरीचा अन्न व्यवसाय परवाना (Food License) निलंबित करण्यात आला आहे.


राज्यभर मंगळवार आणि बुधवारी राबविण्यात आलेल्या विशेष तपासणी (Inspection) मोहिमेदरम्यान अन्न व औषध प्रशासनाने एकूण २४ ठिकाणी छापे (Raid) टाकले. या कारवाईत भेसळयुक्त (Adulterated) दुग्धजन्य पदार्थ, बंदी घातलेली उत्पादने आणि निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ असा सुमारे १.९० कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.



मुंबई आणि पालघरमधील काही नामांकित डेअरी आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये स्वच्छता, उत्पादन प्रक्रिया (Manufacturing Process) आणि अन्नसुरक्षा नियमांचे पालन होत नसल्याचे आढळून आल्याने संबंधितांवर कारवाई करण्यात आली.


या राज्यव्यापी मोहिमेत हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि मिठाई उत्पादकांचीही कसून तपासणी करण्यात आली. निकृष्ट मसाले, भेसळयुक्त दूध तसेच बंदी असलेला गुटखा आणि पानमसाला जप्त करण्यात आला. यापूर्वीही अन्न व औषध प्रशासनाने पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील एका व्यावसायिक आस्थापनावर छापा टाकून ४,१७२ किलो अन्नपदार्थ जप्त केले होते. या कारवाईत सुमारे ८.१४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.


गेल्या काही दिवसांत अन्न व औषध प्रशासनाने अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अनेक हॉटेल्स, बेकरी आणि खाद्य आस्थापनांविरोधात कठोर कारवाई केली आहे. त्यामध्ये मुंबईतील काही प्रसिद्ध हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सचे परवानेही निलंबित करण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

Helpline : नेपाळच्या पुरात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या नातलगांसाठी हेल्पलाईन

मुंबई : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात बुधवारी सकाळी भोटे कोशी नदीला अचानक आलेल्या भीषण पुरामुळे किमान ५०० प्रवासी

FDA Inspections : अंगणवाडीतील खिचडी आणि शाळांमधील ‘मिड-डे मील’ची तपासणी होणार; अन्न व औषध प्रशासनाचे निर्देश

शासकीय आणि खासगी यंत्रणांवर कारवाईचा बडगा मुंबई : अन्न सुरक्षेच्या मुद्यावर राज्यभरात धडक मोहीम राबवणारे अन्न

SVKM : मुंबईत क्रीडा सुविधांना नवी दिशा, तीन ठिकाणी SVKM करणार विकास; जागेची मालकी सरकारचीच असल्याचे संस्थेचे स्पष्टीकरण

मुंबई : मुंबईतील क्रीडा पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी श्री विलेपार्ले केळवणी मंडळ (SVKM) शहरातील तीन ठिकाणी

Central Railway : लोकमान्य टिळक टर्मिनस-सूबेदारगंज विशेष ट्रेन आता 'अमृत भारत एक्सप्रेस' म्हणून नियमित सेवेत; प्रवाशांना मिळणार हाय-टेक सुविधा

मुंबई : सामान्य नागरिकांना उच्च-गुणवत्तेचे, आरामदायी आणि खिशाला पूर्णपणे परवडणारे प्रवासाचे पर्याय उपलब्ध करून

Tripartite agreement : राज्यातील २० लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत चष्मे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्रिपक्षीय करार

मुंबई : वाढत्या स्क्रीन टाईममुळे अनेक विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच डोळ्यांच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत.

Bhandup Incident : दहाव्या मजल्यावरून पडली अन् झाडात अडकली; भांडुपच्या घटनेचा VIDEO पाहून धक्का

मुंबई : मुंबईतील भांडुप परिसरातून एक धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. भांडुपमधील सनशाईन SRA इमारतीच्या