Rohit Sharma Retirement News : रोहित शर्माच्या निवृत्तीची चर्चा; इंग्लंडविरुद्धचा सामना ठरणार शेवटचा?

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज (Batsman) रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या वनडे (ODI) कारकिर्दीबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे. इंग्लंडविरुद्धच्या (England) एकदिवसीय मालिकेनंतर (ODI Series) रोहित शर्मा संघाबाहेर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, १९ जुलै रोजी होणारा तिसरा वनडे सामना त्याच्या कारकिर्दीतील अखेरचा सामना ठरू शकतो, असा दावा काही माध्यमांच्या अहवालांमध्ये करण्यात आला आहे.


इंडियन एक्सप्रेसच्या (Indian Express) अहवालानुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) वरिष्ठ निवड समितीने (Selection Committee) रोहित शर्माला इंग्लंड मालिकेनंतर त्याला संघात स्थान मिळण्याची शक्यता कमी असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे आता वनडे क्रिकेटमधील त्याच्या भवितव्याबाबत अंतिम निर्णय रोहित शर्माच घेणार असल्याचे सांगितले जात आहे.


अहवालानुसार, मुख्य प्रशिक्षक (Head Coach) गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि निवड समितीने अलीकडेच रोहित शर्मासोबत बैठक घेत त्याच्या भविष्यातील योजनांवर चर्चा केली. २०२७ च्या वनडे विश्वचषक (ODI World Cup 2027) लक्षात घेऊन युवा खेळाडूंना (Young Players) अधिक संधी देण्याचा विचार निवड समिती करत असल्याचे समोर आले आहे. यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal) याच्यासारख्या खेळाडूंना भविष्यासाठी तयार करण्यावर भर दिला जात असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.



सूत्रांच्या माहितीनुसार, रोहित शर्मा अद्याप क्रिकेट खेळण्यास उत्सुक असून, तंदुरुस्तीवर (Fitness) मेहनत घेतल्यानंतर संघात कायम राहण्याची त्याची इच्छा होती. मात्र निवड समितीने त्याला पुढील वाटचालीचा निर्णय स्वतः घेण्यास सांगितल्याचे वृत्त आहे.


रोहित शर्माने यापूर्वी भारताला टी-२० विश्वचषक (T20 World Cup) जिंकून दिल्यानंतर टी-२० आंतरराष्ट्रीय (T20I) क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर ७ मे २०२५ रोजी त्याने कसोटी (Test Cricket) क्रिकेटलाही रामराम ठोकला. आता वनडे क्रिकेटमधील त्याच्या भविष्यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.



दरम्यान, या वृत्ताबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) कोणतीही अधिकृत (Official) घोषणा केलेली नाही. त्यामुळे रोहित शर्मा खरोखरच वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेणार की नाही, याबाबत अंतिम चित्र १९ जुलैनंतरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

WCL Season 3 : डब्ल्यूसीएलचा तिसरा हंगाम संयुक्त अरब अमिरातीत होणार

नवी दिल्ली : वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स (डब्ल्यूसीएल) आपल्या बहुप्रतिक्षित तिसऱ्या हंगामासह परत येण्यास

Sanjay Manjrekar : वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वालच्या आक्रमक वर्तनावर मांजरेकरांचा संताप; BCCI-ICC कडे कारवाईची मागणी

मुंबई : माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी युवा भारतीय क्रिकेटपटूंच्या

Anaya Bangar : पुरूषाची महिला झाल्यानंतर आता अनाया बांगरच्या कमबॅकचा मार्ग मोकळा; 'या' लीगमधून उतरणार मैदानावर

Anaya Bangar WBBL : अनाया बांगरने (Anaya Bangar) क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. क्रिकेट

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी

Rahul Dravid : टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी, पण मार्ग खडतर - राहुल द्रविड

नवी दिल्ली : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी)

Kedar Jadhav : क्रिकेटच्या पिचवरून राजकारणाच्या मैदानात; केदार जाधवला भाजपमध्ये मिळाली मोठी जबाबदारी!

Mumbai : टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू केदार जाधव आता राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात एका नव्या भूमिकेत झळकणार आहे.