नवी दिल्ली : एजबॅस्टन येथे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान आयसीसी आचारसंहितेच्या लेव्हल १ उल्लंघनासाठी दोषी आढळल्याने, युवा भारतीय वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारला ( Gurnoor Brar) अधिकृत ताकीद आणि एक डिमेरिट पॉइंट देण्यात आला आहे. ही घटना १४ जुलै रोजी इंग्लंडच्या डावातील आठव्या षटकात घडली. क्षेत्ररक्षण करताना, ब्रारने चेंडू उचलून तो फलंदाजाच्या दिशेने अयोग्य आणि संभाव्य धोकादायक पद्धतीने फेकला, जे आचारसंहितेचे उल्लंघन आहे. ( ICC Code of Conduct)
नवी दिल्ली : प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनस (Nick Jonas) या ग्लोबल कपलच्या प्रेमकहाणीची सुरुवात नेमकी कशी झाली, हा त्यांच्या चाहत्यांसाठी नेहमीच ...
आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान क्रिकेटपटूच्या दिशेने किंवा जवळ अयोग्य किंवा संभाव्य धोकादायक पद्धतीने चेंडू फेकण्याशी संबंधित असलेल्या, क्रिेकेटपटू आणि क्रिकेटपटूंच्या सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या आयसीसी आचारसंहितेच्या कलम २.९ चे उल्लंघन केल्याबद्दल ब्रार दोषी आढळला. ( India vs England)
आयसीसीने सांगितले की, गुरनूर ब्रारने आपली चूक कबूल केली आणि अमिरात आयसीसी एलिट पॅनेलचे सामनाधिकारी रिची रिचर्डसन यांनी सुचवलेली शिक्षा स्वीकारली. परिणामी, औपचारिक सुनावणीची आवश्यकता भासली नाही. गेल्या २४ महिन्यांत बरारने आचारसंहितेचे उल्लंघन करण्याची ही पहिलीच वेळ असून, त्यामुळे त्याच्या शिस्तभंगाच्या नोंदीत एक डिमेरिट पॉइंट जोडण्यात आला आहे. त्याच्यावरील हे आरोप मैदानातील पंच कुमार धर्मसेना आणि माईक बर्न्स, तिसरे पंच सॅम नोगाज्स्की आणि चौथे पंच रसेल वॉरेन यांनी केले आहेत. ( England vs India ODI)
फुटबॉलची जागतिक पंढरी मानल्या जाणाऱ्या 'फिफा विश्वचषका'चा (FIFA World Cup) इतिहास अत्यंत गौरवशाली आणि रहस्यांनी भरलेला आहे. १९३० मध्ये सुरू झालेली ही स्पर्धा ...
आयसीसीच्या नियमांनुसार, लेव्हल १ उल्लंघनामुळे क्रिकेटपटूला अधिकृत ताकीद, त्याच्या सामना शुल्काच्या ५० टक्क्यांपर्यंत दंड आणि एक किंवा दोन डिमेरिट पॉइंट्स मिळू शकतात. आयसीसीच्या शिस्तपालन प्रणालीनुसार, जर एखाद्या क्रिकेटपटूने २४ महिन्यांत चार किंवा अधिक डिमेरिट पॉइंट्स जमा केले, तर त्यांचे रूपांतर निलंबन पॉइंट्समध्ये केले जाते. दोन निलंबन पॉइंट्समुळे खेळाडूला एक कसोटी, दोन एकदिवसीय किंवा दोन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी निलंबित केले जाऊ शकते. डिमेरिट पॉइंट्स क्रिकेटपटूंच्या नोंदीत २४ महिने राहतात, त्यानंतर ते आपोआप रद्द होतात. ( Cricket News)





