Supreme Court Verdict : मृतदेह सापडला नाही तरी सिद्ध होणार खुनाचा गुन्हा, सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

नवी दिल्ली : एखाद्या खुनाच्या प्रकरणात मृतदेह सापडला नाही, तर आरोपी निर्दोष सुटू शकत नाही, असा अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती प्रसन्न बी. वरले यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, खुनाच्या गुन्ह्यात मृतदेह सादर करणे ही कायद्याची अनिवार्य अट नाही, तर गुन्हा घडल्याचा ठोस पुरावा असणे आवश्यक आहे. ( Supreme Court)


न्यायालयाने 'कॉर्पस डेलिक्टी' या कायदेशीर संकल्पनेचा अर्थ स्पष्ट करताना सांगितले की, याचा अर्थ केवळ 'गुन्हा घडला आहे' इतकाच होतो, मृतदेह सापडणे असा होत नाही. जर मृतदेह सापडणे हीच अट ठेवली, तर पुरावे नष्ट करण्यात यशस्वी झालेल्या गुन्हेगारांना कायद्याच्या कचाट्यातून सुटण्याची संधी मिळेल, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. खुनाच्या खटल्यात मुख्यत्वे दोन गोष्टी सिद्ध होणे आवश्यक असते. संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे याचा पुरावा. तसेच तो मृत्यू दुसऱ्या व्यक्तीच्या गुन्हेगारी कृत्यामुळेच झाला आहे. ( Supreme Court Verdict)




 

काय होते आसाममधील प्रकरण?


हे प्रकरण २०१५ मधील असून आसाममधील देबोजित पंकिका याला १० वर्षीय दत्तक मुलीच्या हत्येप्रकरणी (Murder Case) दोषी ठरवण्यात आले होते. मुलीच्या आईने वैद्यकीय उपचारांसाठी घराबाहेर असताना मुलीची जबाबदारी पंकिकावर सोपवली होती, त्यानंतर ती मुलगी बेपत्ता झाली. ती मुलगी २२ दिवस बेपत्ता असतानाही आरोपी कोणतीही समाधानकारक माहिती देऊ शकला नाही. या प्रकरणात एका साक्षीदाराने अत्यंत महत्त्वाचा जबाब दिला. आरोपीने चोरीच्या संशयावरून मुलीची हत्या केली आणि मृतदेह पोत्यात भरून सायकलवरून नेऊन नदीत टाकला, असे साक्षीदाराने सांगितले. जरी तपास यंत्रणेला नदीतून मृतदेह शोधून काढण्यात यश आले नसले, तरी साक्षीदाराची साक्ष आणि पुराव्यांची साखळी लक्षात घेऊन न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले. ( Supreme Court News)



न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण



न्यायालयाने नमूद केले की, साक्षीदाराचा जबाब विश्वासार्ह आहे आणि २२ दिवस मुलगी बेपत्ता असूनही आरोपीने त्याबाबत ठोस स्पष्टीकरण न देणे, ही बाब त्याच्या विरोधात गेली. पुराव्यांवरून गुन्हा सिद्ध होत असेल, तर केवळ मृतदेह न सापडल्यामुळे आरोपीला सोडून देणे हे न्यायव्यवस्थेच्या दृष्टीने घातक ठरू शकते. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे भविष्यातील अशा जटिल प्रकरणांमध्ये तपास यंत्रणेला आणि न्यायदानाला मोठी मदत मिळणार आहे. ( Criminal Law)

Comments
Add Comment

Narendra Modi : आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध; पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, २१ व्या शतकासाठी आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्यास

Kanpur Plane Crash : धक्कादायक! कानपूरमध्ये प्रशिक्षण विमान शेतात कोसळले; अनुभवी पायलटसह सह-पायलटचा अंत

कानपूर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूर (Kanpur) येथे एक अत्यंत दुःखद घटना घडली आहे. गुरुवारी गंगा नदीच्या

Rule Change From 1st September : LPG गॅस सिलेंडर, आयटीआर अन् थेट तुमच्या...; १ सप्टेंबरपासून बदलणार ५ मोठे नियम!

ऑगस्ट महिना (August Month) अखेरच्या टप्प्यात आला असून १ सप्टेंबरपासून देशात अनेक महत्त्वाच्या आर्थिक आणि प्रशासकीय

Nepal Floods Impact on Bihar and UP : नेपाळच्या पुराचा बिहार-उत्तर प्रदेशालाही धोका; ७ जिल्ह्यांना अलर्ट, पुढील ४८ तास महत्त्वाचे

पाटणा : नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुराचा परिणाम आता भारतातील सीमावर्ती राज्यांवरही होण्याची शक्यता आहे.

Dating App Gang : 'नको तेच केलं!' डेटिंग ॲपवरून तरुणाला जाळ्यात ओढले अन्...; जयपूरमध्ये ‘गे डेटिंग ॲप गँग’चा पर्दाफाश

जयपूर : गे डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून तरुणांशी मैत्री करून त्यांना भेटण्यासाठी बोलावायचे आणि त्यानंतर हल्ला

Gandak River : गंडक नदीची पाणीपातळी घटली; बिहारवरील पुराचा धोका टळला

नेपाळ आणि बिहारमधील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. गंडक म्हणजेच नारायणी नदीची पाणीपातळी वेगाने कमी होत