AAI Apprentice Recruitment 2026: विमानतळावर नोकरीचं स्वप्न पूर्ण होणार! भारतीय विमानतळ प्राधिकरणात अप्रेंटिस भरती जाहीर; 'या' तारखेपूर्वी करा अर्ज

मुंबई : विमान वाहतूक क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) ने अप्रेंटिसशिप भरतीची घोषणा केली आहे. AAI च्या पश्चिम विभागीय मुख्यालयामार्फत पदवीधर आणि डिप्लोमा धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना एक वर्षाचे प्रशिक्षण देण्यात येणार असून, प्रशिक्षणादरम्यान मासिक विद्यावेतनही मिळणार आहे. विशेष म्हणजे, या भरतीसाठी पूर्व अनुभवाची आवश्यकता नसून फ्रेशर्सनाही अर्ज करता येणार आहे. (AAI Recruitment)



कुठे मिळणार प्रशिक्षण?


निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई, कोल्हापूर, जामनगर, जबलपूर, कांडला, भुज, दीव, गोंदिया, सोलापूर आणि पोरबंदर येथील AAI केंद्रांमध्ये प्रशिक्षण दिले जाईल. या प्रशिक्षणामध्ये विमानतळ संचालन, देखभाल आणि हवाई वाहतूक व्यवस्थापनाशी संबंधित कामांचा प्रत्यक्ष अनुभव मिळेल. ( Airport Authority of India)


पात्रता


मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून संबंधित शाखेतील चार वर्षांची अभियांत्रिकी पदवी किंवा तीन वर्षांचा नियमित डिप्लोमा आवश्यक.


उमेदवार महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश किंवा दीव या पश्चिम विभागातील रहिवासी असावा.


31 जुलै 2026 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 26 वर्षांदरम्यान असावे.


अनुसूचित जाती/जमातीसाठी 5 वर्षे आणि इतर मागासवर्गीय (नॉन-क्रीमी लेयर) उमेदवारांसाठी 3 वर्षांची वयोमर्यादा सवलत लागू राहील.


 मासिक विद्यावेतन


पदवीधर अप्रेंटिस: ₹15,000 प्रति महिना


डिप्लोमा अप्रेंटिस: ₹12,000 प्रति महिना


हे विद्यावेतन केंद्र सरकार आणि AAI यांच्या संयुक्त विद्यमाने दिले जाणार आहे.


निवड प्रक्रिया


पात्रता परीक्षेतील गुणांच्या आधारे उमेदवारांची शॉर्टलिस्ट तयार केली जाईल.


कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही.


शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी, मुलाखत (लागू असल्यास), वैद्यकीय तपासणी आणि पोलीस पडताळणी केली जाईल.


अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना ई-मेलद्वारे माहिती दिली जाईल.


अर्जाची अंतिम तारीख


इच्छुक उमेदवार 30 सप्टेंबर 2026 पर्यंत अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापूर्वी NATS पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य आहे. भरती प्रक्रियेदरम्यान चुकीची किंवा खोटी माहिती आढळल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल. ( Govt Jobs India)

Comments
Add Comment

Kanpur Plane Crash : धक्कादायक! कानपूरमध्ये प्रशिक्षण विमान शेतात कोसळले; अनुभवी पायलटसह सह-पायलटचा अंत

कानपूर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूर (Kanpur) येथे एक अत्यंत दुःखद घटना घडली आहे. गुरुवारी गंगा नदीच्या

Rule Change From 1st September : LPG गॅस सिलेंडर, आयटीआर अन् थेट तुमच्या...; १ सप्टेंबरपासून बदलणार ५ मोठे नियम!

ऑगस्ट महिना (August Month) अखेरच्या टप्प्यात आला असून १ सप्टेंबरपासून देशात अनेक महत्त्वाच्या आर्थिक आणि प्रशासकीय

Nepal Floods Impact on Bihar and UP : नेपाळच्या पुराचा बिहार-उत्तर प्रदेशालाही धोका; ७ जिल्ह्यांना अलर्ट, पुढील ४८ तास महत्त्वाचे

पाटणा : नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुराचा परिणाम आता भारतातील सीमावर्ती राज्यांवरही होण्याची शक्यता आहे.

Dating App Gang : 'नको तेच केलं!' डेटिंग ॲपवरून तरुणाला जाळ्यात ओढले अन्...; जयपूरमध्ये ‘गे डेटिंग ॲप गँग’चा पर्दाफाश

जयपूर : गे डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून तरुणांशी मैत्री करून त्यांना भेटण्यासाठी बोलावायचे आणि त्यानंतर हल्ला

Gandak River : गंडक नदीची पाणीपातळी घटली; बिहारवरील पुराचा धोका टळला

नेपाळ आणि बिहारमधील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. गंडक म्हणजेच नारायणी नदीची पाणीपातळी वेगाने कमी होत

Nepal's flood situation : नेपाळमधील पूरस्थितीवर पंतप्रधान मोदींची बालेन्द्र शाह यांच्याशी चर्चा, भारताकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन

नवी दिल्ली : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी