मुंबई : सिंधुदुर्ग ग्लोबल इंडस्ट्रियल रिजन (SGIR) प्रकल्पाच्या विकासासाठी कृती आराखड्याला वेग देण्याच्या दृष्टीने मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. या बैठकीत प्रकल्पाची संकल्पना, विकास आराखडा आणि पुढील अंमलबजावणीच्या टप्प्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. ( Sindhudurg Global Industrial Region)
बैठकीला सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाल्या. तसेच प्रकल्पाशी संबंधित तांत्रिक पथकातील अधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते. (Nitesh Rane)
- महायुतीतील समन्वय आणि पक्षांतर्गत नाराजीवर चर्चा; राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते पार्थ पवार (Parth Pawar) ...
बैठकीत सिंधुदुर्गमध्ये औद्योगिक विकासासोबतच पर्यटन, शिक्षण आणि सामाजिक सुविधांचा समतोल राखणारी आधुनिक विकास व्यवस्था उभारण्यावर भर देण्यात आला. औद्योगिक क्षेत्रासोबत आवश्यक सामाजिक आणि संस्थात्मक पायाभूत सुविधा निर्माण करून संपूर्ण विकासाची परिसंस्था उभी करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती सादरीकरणात देण्यात आली. (Sindhudurg News)
उपलब्ध नैसर्गिक आणि औद्योगिक संसाधनांचा प्रभावी वापर करून विविध उद्योगांना चालना देण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याचबरोबर आधुनिक उत्पादन क्षेत्र विकसित करणे, तसेच 'युथ सिटी' संकल्पनेअंतर्गत शिक्षण, क्रीडा, पर्यटन आणि आधुनिक नागरी सुविधा
- महायुतीतील समन्वय आणि पक्षांतर्गत नाराजीवर चर्चा; राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते पार्थ पवार (Parth Pawar) ...







