Kalidas Maharaj : कालीदास महाराजांचे अपघाती निधन, ४० वर्षांत उच्चारला नव्हता एकही शब्द

परभणी : मराठवाड्यातील एक अध्यात्मिक गुरु अशी ख्याती असलेल्या आणि मागील चार दशकांपासून एकही शब्द न बोलता केवळ आपल्या अस्तित्वाने लाखो भाविकांना सन्मार्ग दाखवणाऱ्या दत्त संप्रदायाच्या कालीदास महाराजांचे बीड बायपास येथे रस्ते अपघातात निधन झाले. या अपघातात महाराजांसह त्यांची भावजय स्मिता बोरीकर यांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेमुळे मराठवाड्यातील अध्यात्मिक विश्वात दुःखाचे वातावरण आहे.



परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील श्री क्षेत्र गुंजचे कालीदास महाराज हे वासुदेवानंद सरस्वती यांच्या पुण्यतिथी निमित्त गुजरातच्या श्री क्षेत्र गरुडेश्वर येथे दर्शनासाठी गेले होते. दर्शन झाल्यानंतर वाहनाने गुंज येथे परतत असताना अपघात झाला. छत्रपती संभाजीनगरच्या बीड बायपासवर वाहनाचा अपघात झाला. या अपघातात कालीदास महाराज आणि त्यांची भावजय स्मिता बोरीकर या दोघांचा मृत्यू झाला. वाहनाचा चालक गंभीर जखमी आहे. चालकावर रुग्णालयात अती दक्षता विभागात उपचार सुरू आहेत.



कालीदास महाराज मूळचे परभणी जिल्ह्यातील बोरी गावचे रहिवासी होते. बालपणी त्यांना सावत्र आईकडून प्रचंड त्रास सहन करावा लागला. त्यांनी घर सोडले. घर सोडल्यानंतर ते गुंज येथील चिंतामणी महाराज यांच्याकडे गेले. महाराजांकडे स्वतःची व्यथा मांडली. चिंतामणी महाराजांनी आणखी त्रास होऊ नये म्हणून मौनव्रताचा सल्ला दिला. हा सल्ला कालीदास महाराजांनी आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत तंतोतंत पाळला. तब्बल ४० वर्षे त्यांनी अवाक्षरही उच्चारले नाही. महाराज सर्वांचे म्हणणे ऐकून घ्यायचे आणि त्यांचे म्हणणे मोजक्या आणि अचूक शब्दात एका डायरीत लिहून दाखवत होते. संवादाची ही पद्धत त्यांनी मौनव्रत धारण केल्यापासून अखेरच्या संवादापर्यंत जपली. डोळ्यांतील करूणा आणि डायरीतून संवाद साधत कालीदास महाराजांनी हजारो भाविकांना व्यसनमुक्ती, सदाचार, लोककल्याण यांचा मार्ग दाखवला. यामुळेच कालीदास महाराजांच्या निधनाचे वृत्त कळताच सामाजिक, राजकीय आणि धार्मिक क्षेत्रातून तीव्र दुःख व्यक्त करण्यात आले.

Comments
Add Comment

Nepal Flood : नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांचे शर्थीचे प्रयत्न; ४०४ नागरिक सुरक्षित, ३३८ जणांशी संपर्क

मुंबई : नेपाळ येथील महापुरामध्ये अडकलेले महाराष्ट्रातील नागरिक व धार्मिक पर्यटनासाठी गेलेले पर्यटक यांच्या

FSSAI Raid : निकृष्ट दर्जाच्या हिंगावर FSSAIची कारवाई; दोन मोठ्या मसाला ब्रँडच्या विक्रीवर बंदी

मुंबई : ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी, भारतीय अन्न सुरक्षा आणि

Jalgaon News : नदीत बुडणाऱ्या लेकाला वाचवण्यासाठी बाप धावला पण नियतीनं बापालाच हिरावलं , मुलगाही बेपत्ता

Jalgaon News : जळगावमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील खडके गावातील पिता-पुत्र

Jalgaon : खानदेशातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! जबलपूर-कोयंबतूर विशेष गाडी आता नियमित धावणार

Jalgaon : मध्य रेल्वेने प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, जबलपूर-कोयंबतूर मार्गावर धावणाऱ्या

Tuljapur News : आई तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्रोत्सव ११ ऑक्टोबरपासून; जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम पत्रिका आणि धार्मिक विधी

तुळजापूर: महाराष्ट्रासह देशभरातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या

Smart Ration Card : स्मार्ट रेशन कार्ड वाटप सुरू; QR कोड असलेल्या अत्याधुनिक कार्डाची वैशिष्ट्ये आणि प्रक्रिया

महाराष्ट्रातील शिधापत्रिकाधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी असून, पारंपारिक कागदी रेशन कार्डऐवजी आता QR कोड