Dhule Crime News : कंपनीवर 'हा' मोठा आरोप करत तरुणाची तापी नदीत उडी, आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडीओ बनवत म्हणाला...

Dhule Crime News : धुळे जिल्ह्यातील शिरपूर जवळील गिधाडे तापी नदीच्या पुलावरून उडी घेतलेल्या तरुणाचा मृतदेह अखेर सापडला आहे. तरुणाने नदीत उडी घेण्यापूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केला होता. कंपनीत होणाऱ्या छळाला कंटाळून आपण हे पाऊल उचलत असल्याचे त्याने या व्हिडिओत म्हटले आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या मृत तरुणाच्या नातेवाईकांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी ठिय्या आंदोलन केले. संदीप उदेसिंग गिरासे (28), रा. अहिल्यापूर, शिरपूर असे मृत तरुणाचे नाव आहे.



आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडीओ बनवत म्हणाला...


व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मृत संदीपने काम करत असलेल्या टेक्सटाईल पार्क कंपनी मोठा आरोप करत आपल्यावर मोठा अन्याय झाल्याचे म्हटले आहे. कंपनीमधील त्याच्यासोबत काम करणाऱ्या दोन मुलींनी आपल्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप त्याने केला. या प्रकरणानंतर कंपनीच्या मालकांनी आणि प्रशासनाने त्याला कामावरून काढून टाकले होते. तसेच औद्योगिक क्षेत्रात स्थानिक तरुणांना नाहक त्रास दिला जात असल्याचेही त्याने नमूद केले होते. कंपनीत परप्रांतीय लोकांना वाचवले जाऊ शकते, मात्र महाराष्ट्राच्या स्थानिक तरुणाला न्याय दिला जात नाही, अशी उद्विग्न भावनाही संदीपने व्हिडिओत मांडली होती. ( Dhule Crime News )



शिरपूर शहर पोलीस ठाण्यात आंदोलन


बेपत्ता संदीपचा तापी पुलावर मोबाईल, मोटरसायकल आणि चप्पल पोलिसांना आढळून आली होती. दोन दिवस स्थानिक प्रशासन आणि पट्टीचे पोहणारे नदीपात्रात त्याचा शोध घेत होते अखेर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. संदीपच्या मृत्यूची बातमी समजताच अहिल्यापूर आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने शिरपूर पोलीस ठाण्याबाहेर जमा झाले. संतप्त नातेवाईकांनी थेट शिरपूर शहर पोलीस ठाणे (Shirpur City Police Station) गाठून आवारात आंदोलन सुरू केले. ( Dhule Crime News )


मृत संदीपने आत्महत्या करण्यापूर्वी तयार केलेल्या व्हिडिओमध्ये ज्यांची नावे घेतली आहेत, त्यांच्याविरुद्ध तातडीने गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी आंदोलकांनी केली. यामुळे पोलीस ठाण्याच्या परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. अखेर पोलीस प्रशासनाने संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर वातावरण निवळले. या संदर्भात शिरपूर शहर पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.

Comments
Add Comment

FDA Inspections : गणेशोत्सवात महाप्रसादासाठी लागणार परवाना

- भंडाऱ्यावरही असणार ‘एफडीए’ची नजर मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांततर्फे

Pratap Sarnaik : ‘रॅपिडो’शी व्यावसायिक संबंधांचे पुरावे द्या!

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर; प्रत्येक गोष्टीला राजकीय रंग देणे योग्य

Nepal floods : नेपाळमधील पूरपरिस्थितीत नांदेडचे पर्यटक अडकले; मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने जारी केले तात्काळ संपर्क क्रमांक

नांदेड : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पूरस्थितीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले

CM Devendra Fadnavis : गडचिरोलीच्या विकासाला नवी दिशा; ‘ग्रीन स्टील हब’ म्हणून उदयास येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : गडचिरोली जिल्हा निर्मितीला २६ ऑगस्ट रोजी ४४ वर्षे पूर्ण होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

CM Devendra Fadnavis : चाकण ‘एमआयडीसी’मध्ये ४९ उद्योगांसोबत सामंजस्य करार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती; २ हजार ३२० कोटींची गुंतवणूक प्रस्तावित मुंबई : चाकण-भोसरीच्या

Sunetra Pawar : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे निर्देश

पुणे : चाकण परिसरातील अनेक समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित असून, त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्व