Mumbai News : 'तो पायाचा तुकडा कोणाचा?',CSMT स्थानकावर अमृतसर एक्स्प्रेसमध्ये धक्कादायक प्रकार

सीएसएमटी स्थानकावर धक्कादायक प्रकार; एक्स्प्रेसमध्ये आढळला मानवी पायाचा तुकडा, पोलीस तपास सुरु



मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे आलेल्या अमृतसर–CSMT एक्स्प्रेसमध्ये मानवी पायाचा तुकडा आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. रेल्वे यार्डात गाडीच्या स्वच्छतेचे काम सुरू असताना हा प्रकार उघडकीस आला. या घटनेनंतर सरकारी रेल्वे पोलीस (GRP) आणि रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) तपास सुरू केला आहे. (Mumbai News)


मिळालेल्या माहितीनुसार, अमृतसरहून आलेली एक्स्प्रेस सकाळी CSMT येथे दाखल झाली होती. त्यानंतर गाडी नेहमीप्रमाणे यार्डात नेऊन स्वच्छता आणि देखभालीचे काम सुरू करण्यात आले. यावेळी M-2 डब्याखाली गुडघ्याखालचा मानवी पायाचा तुकडा आढळून आला. हा प्रकार लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी तातडीने रेल्वे प्रशासन आणि पोलिसांना माहिती दिली. (Amritsar express)


घटनास्थळी दाखल झालेल्या GRP पथकाने पंचनामा करून संबंधित मानवी अवयव ताब्यात घेतला. पुढील तपासासाठी तो सेंट जॉर्ज रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. (Railway)



पोलीस तपास सुरु


या मानवी अवयवाचा नेमका संबंध कोणाशी आहे, तो गाडीत कसा अडकला आणि ही घटना नेमकी कुठे घडली, याचा शोध पोलीस घेत आहेत. यासाठी अमृतसर एक्स्प्रेसच्या संपूर्ण प्रवासाची माहिती तपासली जात असून, मार्गावरील विविध रेल्वे विभागांशी संपर्क साधण्यात आला आहे. तसेच प्रवासादरम्यान कोणता रेल्वे अपघात झाला होता का किंवा एखादी व्यक्ती बेपत्ता असल्याची नोंद आहे का, याची पडताळणी सुरू आहे. (Crime News)


रेल्वे प्रशासनाच्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित व्यक्तीला रेल्वे रुळ ओलांडताना अपघात (Accident) झाला असण्याची शक्यता तपासली जात आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.


या घटनेमुळे रेल्वे सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून, संबंधित व्यक्तीची ओळख आणि घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी GRP कडून सखोल तपास सुरू आहे.


Comments
Add Comment

प्रो गोविंदा २०२६ : आर्यन गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी; ७५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफीवर कब्जा

मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार आणि खेळाडूंचा जोश अनुभवणाऱ्या 'प्रो गोविंदा सीझन ४' (Pro Govinda Season 4 2026) चा अंतिम सामना अत्यंत

Nagpur citizens : काठमांडूमधील नागपूरचे ११० नागरिक सुरक्षित; भारताकडे रवाना

नेपाळमधील काठमांडू येथे गेलेले नागपूर जिल्ह्यातील ११० नागरिक सुरक्षित नागरिकांच्या परतीच्या प्रवासासाठी

Eknath Shinde : राखीच्या धाग्यातून महिलांना मोठी ग्वाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ‘लाडक्या बहिणीं’ना आश्वासन

राखीच्या धाग्यातून महिलांच्या सर्वांगीण विकासाचा शब्द - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही माविम आणि उमेद

Central Railway : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; मुंबई-मडगांव दरम्यान ४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या धावणार

Mumbai : गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्

Mumbai Indians : मुंबईत उतरलं ‘मुंबई इंडियन्स’चं खास विमान; Malaysia Airlinesच्या A330ची पहिली लँडिंग, क्रिकेट चाहत्यांना सुखद धक्का

मुंबई : मुंबई इंडियन्सच्या निळ्या-गोल्डन रंगांनी सजलेलं Malaysia Airlinesचं खास Airbus A330-300 विमान बुधवारी, २६ ऑगस्ट रोजी मुंबईत

Devendra Fadnavis : 'एमपीएससी' पेपरफुटीप्रकरणी कोणालाही सोडणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)