Water crisis : पावसाच्या लपंडावामुळे राज्यावरील जलसंकट कायम

 गेल्या वर्षापेक्षा १२ टक्के कमी साठा; २२ जिल्ह्यांतील ७३७ गावांना आजही टँकरचा आसरा


मुंबई : राज्याच्या बहुतांश भागात गेल्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावली असली, तरी राज्यावरील पाणीटंचाईचे संकट अद्याप पूर्णपणे दूर झालेले नाही. प्रमुख धरणक्षेत्रात काही प्रमाणात पाऊस झाल्याने पाणीसाठ्यात किरकोळ वाढ झाली असली तरी, राज्यातील प्रमुख दहा धरणांतील उपयुक्त पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल १२ टक्क्यांनी कमी आहे. पावसाचे असमान वितरण आणि भूजल पातळीतील घसरणीमुळे राज्यातील २२ जिल्ह्यांतील ७३७ गावे आणि १ हजार ९१८ वाड्यांना आजही ७९० टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. पावसाने पुन्हा ओढ दिल्यास राज्यात पाणी आणीबाणी निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.



राज्यातील कोयना, जायकवाडी, उजनी, पेंच प्रकल्प समूह, गोसीखुर्द, खडकवासला, मुठा, अप्पर वर्धा, भंडारधारा आणि इसापूर या प्रमुख दहा धरणांमध्ये सध्या १८४.४७ टीएमसी (४५ टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच काळात हा साठा २७८.४४ टीएमसी इतका होता. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पाणीसाठा घटल्यामुळे चिंता वाढली आहे. नाशिक विभागात पाण्याची परिस्थिती अधिकच गंभीर असून, तिथे सर्वाधिक ३०० टँकर्सद्वारे पाणी पुरवले जात आहे. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये पावसाचे प्रमाण अद्याप समाधानकारक नसल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न 'जैसे थे' आहे. (Water Crisis)



मुंबईची स्थिती काय?


दुसरीकडे, मुंबई आणि ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा मात्र तुलनेने समाधानकारक आहे. मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) मागील आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे जलचिंता काहीशी कमी झाली आहे. मुंबई-ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या सहा धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत केवळ एक टक्का कमी पाणीसाठा नोंदविण्यात आला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्यास मुंबईच्या पाणी नियोजनावर त्याचा परिणाम होऊ शकतो, असा इशारा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला आहे. (Mumbai Update)

Comments
Add Comment

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Makarand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; मंत्री मकरंद जाधव-पाटील

नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : “खरीप २०२५ मध्ये

Hasan Mushrif : किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून

Bharat Gogawale : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या; मंत्री भरत गोगावले

मुंबई : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून

Prabhadevi Water Pipeline : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटली

मुंबई : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाहून गेले. सेनापती बापट मार्गावर ही

Arrested for throwing eggs : माझगावच्या मोरया गणपतीच्या मिरवणुकीवर अंडी फेकल्याप्रकरणी दानिश शेर खानला अटक, भायखळा पोलिसांची कारवाई

Mumbai : २३ ऑगस्ट रोजी माझगावच्या मोरया गणपती मंडळाच्या मिरवणुकीत अंडी फेकल्याच्या आरोपानंतर मुंबईच्या भायखळा